Login

स्वप्नांच्या पलीकडले (भाग 12)

Competition

स्वप्नांच्या पलीकडले ( भाग 12 ) 

( माघील भागात आपण पाहिले मयूरी सगळे गैरसमज मिटवून रूमकडे निघाली आता पुढे ..............

मी रूमकडे निघाले होते पण मनात विचार अजूनही चालूच होते विचारांचे कसे असते ना ????
आपला पाठलाग सोडतच नाहीत ते कधीच 

माझ्या माझ्या तंद्रीत च मी रूममध्ये प्रवेश केला 
समोर बघते तर काय एक सुंदर गुलाबाचे फुलं ठेवलेलं होत 
अगोदर वाटलं 
अरे देवा ......
चुकून दुसरीकडे च तर नाही आले ना , 
पण मनाची खात्री करून घेतली की माझीच रूमआहे, 

मग हे फुल कुणी ठेवले असेल व कुणासाठी 
हा विचार मनात येताच 
पुन्हा स्वतः शी च हसले व म्हणाले 
" मी पण किती मूर्ख आहे ना दुसऱ्या कुणासाठी असेल हे फुल माझ्यासाठी आहे व यांनी ठेवलं असेल
प्रिया ताई चे बोलणे मनावर घेतले बहुतेक " 

यांनी माझ्यासाठी फुल आणले या गोष्टीचा विचार करूनच मी खुप आनंदी झाले, 
मी कधी फुल पाहिले नाही असा भाग नव्हता पण यांनी आणले व तेही माझ्यासाठी ही फिलिंग च खुप वेगळी होती

त्या फुलाला हातात घेऊन 
त्याच्याकडे काही क्षण बघून मी मनाशी च हसले, 
कॉटवर बसणार तोच त्यावर असलेल्या कॅडबरी कडे माझे लक्ष गेले, 

खरच 
कुणी न मागता दिलेली छोटी शी गोस्ट देखील किती आनंद देऊन जाते हे मी आज अनुभवलं 
यांना मी मनातून माफ केल होत हे त्यांनी आणलेल्या गिफ्ट मुळे नाही तर त्यांच प्रेम आहे माझ्यावर फक्त त्यांना माझ्यासारख व्यक्त नाही होता येत,

मी यांची वाट बघत बसले होते 
व तितक्यात ते आले, 
अगोदर दोघांनाही काय बोलावे सुचेना कारण दोन दिवसांपासून घरात जे काही चालू होतं त्याचा नकळतपणे परिणाम आमच्या नात्यावर देखील झाला होता, 

ते आले व त्यांच्या स्टडी टेबल वर पुस्तक घेऊन बसले, 
मी मुद्दाम त्याना दिसावे म्हणून ते चॉकलेट व फुल हातासाहित पुन्हा पुन्हा वरती करत होते, 
"काय माणूस आहे इतकं छान सरप्राईज दिलं 
मग आता जे बोलायचं ते बोलावं ना पुन्हा झालं चालू ....
जाऊ दे मीच बोलते " 
असा विचार करून मीच सुरवात केली 

"फुल खुप छान आहे" 

"हो का ....
दाखव ....
अरे हो की खरच छान आहे ....
मी पाहिलं च नव्हतं 
कुणी दिल ......" 

ते खोचकपणे म्हणाले 

"कुणी नाही 
जाऊ द्या 
मीच मूर्ख आहे 
मी रागात ते फुल फेकून दिलं ....
व क्षणात पुन्हा उचललं आणि ठेऊन दिल ...." 


आता ते जोरात हसू लागले 
व त्यांना हसताना बघून माझा आणखी संयम सुटला
माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागले, 

"ये मयू .....
अग गम्मत केली मी 
तुला माहीत आहे ...." माझा हात पकडून जवळ घेत म्हणाले 

ते पुढे बोलणार तोच मी त्यांचे बोलणे मधेच कट करत म्हणाले 
मला माहित आहे 
आता तुम्ही म्हणाल मी रागावल्यावर खुप छान दिसते व हे ऐकून झालेय माझे 
मी त्याचा हात दूर करत म्हणाले , 


"बिल्कुल नाही 
तू रागात खुप छान दिसते" 
मला स्वतः च्या मिठीत घेत ते हसू लागले 


"काही नको 
तुम्ही नेहमी असेच करता 
अगोदर राग आणायचा व मग जवळ घ्यायचं आता सवय झाली मला या सगळ्यांची" 
मी त्यांच्या मिठीत विसावत म्हणाले ,

"हो का 
सॉरी बर ......
पण मी मुद्दाम नाही करत 
मी हुशार नाही ना तुझ्या इतका 
मग मला कुठे कळतं कुठे कसे वागावे 
हे माझ्याकडे बघत म्हणाले 


बर जाऊ द्या 
पण माझेच चुकले 
मी आई ला समजून घ्यायला हवं होतं, मी तोंड बारीक करत म्हणाले 

"अग वेडाबाई इथे कोण चूक व कोण बरोबर हा प्रश्न च नसतो प्रत्येक नात्याला असे अनेक वलय येतात पण त्यातही तुमचे नाते किती तक  धरून राहते ही त्या नात्याची खरी खोली असते, 
आता आपलेच बग ना चोवीस तासापूर्वी आपण एकमेकांकडे पाठ करून झोपलो होतो व आता तू माझ्या मिठीत हीच नवरा बायकोच्या नात्याची खरी वीण असते, 
ते भांडतात, रागावतात , एकमेकांना ओरडतात पण त्यात देखील प्रेम असते , काळजी असते, ते जसे छोट्या छोट्या गोष्टी वरून भांडतात तसेच ते छोट्या छोट्या गोष्टी नि जवळ देखील येतात" 
ते बोलत होते व बोलत बोलत जरा जास्तच जवळ येत होते 
हे जेव्हा मला जाणवलं 
"हो का चला तुमची नवरा बायकोची गोष्ट कळाली व तुमचे प्रेम देखील " 
असे म्हणून मी स्वतः ला सोडवून घेण्याचा निरर्थक प्रयत्न केला, 

" अजून स्टोरी आहे पुढे 
तुला इतकी काय घाई आहे" 
ते पुन्हा पकड मजबूत करत म्हणाले, 

खरच कसे नाते असते ना नवरा बायकोचे काल मला त्यांना बोलू देखील वाटत नव्हते व आज सोडू ..............

म्हणूनच जन्मजन्मांतरी हाच पती मिळू दे म्हणून बायका हट्ट करतात तो उगाच नाही हे आज मला कळले होते, 
त्या एका व्यक्ती भोवती अस्तित्व आपले फिरत राहते आयुष्यभर 

शेवटी यांना माझे अस्तित्व अर्पण करून माझा डोळा लागला ......


अस्तित्व माझे तू 
तूच माझा स्वास 
तू सतत असावे सोबती 
हाच मज ध्यास 


जन्मोजन्मी तूच मिळो 
हीच असते आस 
तुझ्याच साठी असतो 
माझा सगळं अट्टाहास 


तुझ्याच नावाने असतो 
माझा अलंकारिक साज 
आनंदाने असतो मजला 
तुझा मिळालेला सहवास 


आज आपल्या नात्यातील 
सर्व बंधने मी तोडले 
मी अनुभवत आहे एक गाव 
स्वप्नांच्या पलीकडले.


क्रमशः ........

🎭 Series Post

View all