स्वप्नांच्या पलीकडले (भाग11)

Competition

स्वप्नाच्या पलीकडले ( भाग 11)

( माघील भागात आपण पाहिले मयुरी ला आई ने समजावले होते पण ती अजूनही आई शी पूर्णपणे सहमत नव्हती) 

आता पुढे ....................

मला आई चे पटले होते असे नाही पण माझ्याकडे आता दुसरा पर्याय च नव्हता माझ्या समोर
दुसऱ्या दिवशी मी उठले 
नेहमीप्रमाणे माझी सर्व कामे आवरून घेतली, 
मनात राग असताना असे मनमोकळे कसे वागणार ना पन आई चे शब्द पुन्हा पुन्हा आठवत होते मग म्हणलं चला करून बघू सुरवात, 
मी नेहमीप्रमाणे वावरू लागले घरात, 
आई किचनमध्ये होत्या,
एरव्ही आई काही जरी करत असतील तर मी त्यांना थांबवून त्यांच्या हातातील काम घेते व सांगते 
"आई तुम्ही मला फक्त सागा कसे करायचे मी करते" 

पण आज माझी हिम्मत होत नव्हती मी गेले होते आई जवळ पण पुन्हा माघारी फिरले, 
मी आई ने सांगितलेले शब्द आठवून पुन्हा आई जवळ गेले 

"आई " 
मी घाबरत च आवाज दिला 

"बोल ना काय म्हणते"

 आई शांतपणे म्हणाल्या आज आई च्या बोलण्यात गोडवा व शांतता होती दोन मिनिटं मला वाटल मला भास तर होते नाहीये ना??
की त्या दिवशी त्या चिडलेल्या आई माझा भास होता.

दोनी व्यक्ती एकच पण वागण्यात तफावत होती तीही कमालीची 
पण आवाज मी दिला होता म्हणजे आता सुरवात पण करावी लागणार होती 
गप्प राहून कसे चालेल, 

"काही नाही तुमच्याशी थोडं बोलायचं होत" 
मी हळू व कापऱ्या आवाजात म्हणाले, 

"हो बोल ना " 
आई म्हणाल्या 


"आई त्या दिवशी माझे चुकलेच 
चूक माझी होती मी दूध वाया घातले व सर्वांसमोर चिडून दुसरी चूक केली, 
मला मान्य आहे मी चुकले,
 मी चिडायला नको होते, 
पण त्या परिस्थितीत कसे वागावे हेच मला कळले नाही, 
मी सॉरी म्हणून सगळं संपवू शकले असते पण नेमकं कस वागावं हेच मला कळलं नाही व मी चुकीच्या पद्धतीने रिऍक्ट झाले, पण यापुढे नाही करणार मी असे " 
मी थोडं घाबरत च सगळं बोलून टाकले
आई माझ्याकडे फक्त एकटक बघत होत्या 
माझे बोलणे संपले व त्या बोलू लागल्या, 

"हे बग मयू टाळी कधी एका हाताने वाजत नाही , 
तू चिडली कारण तुला माझे बोलणे लागले पण खरं सांगू मुळात मला तुला बोलायचे च नव्हते पण ते वाया गेलेलं दूध व गॅस बघितला आणि स्वतःवरील संयम सुटला मी हे च तुला शांतपणे देखील सांगू शकत होते पण मला ते करता आले नाही याचे च वाईट वाटतेय मला" 
आई करून चेहरा करून बोलत होत्या, 


आता मात्र मी ढासळले 
किती मूर्ख आहोत यार 
यांनी आपल्याला समजून घेतलं नाही असे म्हणते पण मी देखील कमीच पडले ना, 
मी कुठे समजून घेऊ शकले त्यांना, 
आणि त्या मोठ्या आहेत शिवाय यांची आई 
मग मी त्यांच्यावर कसा काय राग धरू शकते 
आईवर कुणी रागावते का? 
मग ती यांची असो की माझी काय फरक पडतो, 
असा मनात विचार करून मी म्हणाले 
"आई पण एक प्रॉमिस करा यापुढे आपल्या दोघीमध्ये काहीही झाले तरी त्याचे पडसाद घरात उमटता कामा नये" 

"हो ग बाई 
व ऐक तुझ्या नवऱ्यावर रागावू नको तो आतापर्यंत माझ्यापुढे कधीच नाही बोलला पण आता बोलेल अस वाटलं होतं पण नाही बोलला 
म्हणून त्याला देखील माफ कर" 
आई यांची वकिली करत होत्या


आई चे बोलणे ऐकून मी क्षणात आई समोर मोकळी झाले, 

"आई मला तुमचा खुप राग आला होता पण आई शी बोलल्यावर तुमची बाजू पटली, 
पण आई यांचे चुकले की नाही मान्य आहे ते माझ्यासाठी तुम्हांला रागावू शकत नव्हते व त्यांनी असे काही करावे हे मला अपेक्षित देखील नव्हते पण त्यांनी कमीत कमी मध्यस्ती करून तुम्हांला शांत तरी करायला हवे होते व तेही नाही जमले तर ते रूममध्ये माझी समजूत तरी काढू शकत होते साधे प्रेमाने जवळ पण घेतले नाही " मी अनावधानाने आई जवळ सगळं बोलून गेले दारात उभा प्रिया व आई एकमेकीकडे बघून हसत होते याचे देखील मला भान राहिले नाही,

"हो ना आई बग ना ग दादा नाही काहीतरी कमीत कमीत जवळ  तरी घ्यायचे असते किंवा अजून काही .........."
प्रिया असे  म्हणून त्या दोघी हसू लागल्या 

"ये प्रिया आगाऊपणा करू नको जा गुपचूप" 
आई च्या या वाक्याने मी भानावर आहे व डोक्याला हात मारत अरे देवा भावनेच्या भरात मी काय बोलून गेले, 

मी लाजून हॉलमध्ये निघून गेले, 
रात्री सर्वांनी मस्त सोबत जेवण केलं आज पुन्हा नेहमीप्रमाणे बोलत होते सगळे मी शांतच होते कारण वरती पाहिले की प्रिया काहीतरी खुनवयाच्या व मला लाजल्या सारखे व्हायचे. 

मला छळन्याचा एकही चान्स त्या सोडत नव्हत्या व आज तर मी स्वतःहून त्यांच्या तावडीत सापडले होते, 
त्यामुळे हातची आलेली संधी सोडतील त्या प्रिया ताई कसल्या 
त्या पुन्हा पुन्हा यांची फिरकी घेत होत्या व हे त्यांना साजेस उत्तर देत होते अर्थात त्यांना कुठे माहीत होते मी गाजवलेल्या पराक्रम,

आम्ही जेवण करताना नेहमी टीव्ही समोर बसायचो सिरीयल बघत नेमकं सिरीयल मध्ये रोमँटिक सिन आला व मी मान खाली घातली, 
आता तर प्रिया ताई ची मजा च झाली होती अगोदर मी व त्यात या सिरीयल ने भर घातली.

"मग दादा तू कधी देणार असे रोमँटिक वातावरणात वहिनीला गिफ्ट" 
प्रिया ताई माझ्याकडे बघत म्हणाल्या .....

मला वाटले आता बोलता काहीतरी पण त्याच्या या बोलण्याला यांनी काहीच प्रतिउत्तर दिले नाही, 

सर्वांची जेवणं झाली व मी काम आवरत होते मनात आले आज त्यांनी काहीतरी उत्तर द्यायला हवे होते. म्हणजे मला आवडेल त्यांचे असे सरप्राईज , 
पुन्हा माझी मीच हसू लागले 
मी किती मूर्खा सारखा विचार करते ना...... 
आपला नवरा माहीत आहे कसा आहे तरी उगाच नजरेने आकाशातील तारे तोडण्यात काय अर्थ आहे, 

चल मयुरी माणसाने नेहमी वास्तवात जगावे आज सगळे गैरसमज दूर झाले.
कमीत कमी झोप तरी निवांत लागेल
असे म्हणून मी रूम ची वाट धरली.......


स्वप्नांत आणि सत्यात
कधीच साम्य नसते 
वास्तवाच्या जीवनात 
हेच तर सत्य असते 


मनातील भावना 
ओठावर यायला लाजतात
स्वप्नांचा साज चढउन 
त्याच खऱ्या भासतात 


तरीही भावनांना 
मी वास्तवाशी जोडले 
मी अनुभवते एक गाव 
स्वप्नाच्या पलीकडले

क्रमशः ......

🎭 Series Post

View all