Login

स्वप्नांच्या पलीकडले (भाग 10)

Competition

स्वप्नाच्या पलीकडले ( भाग 10 ) 
( माघील भागात आपण पाहिले मयुरी ला खुप राग आला होता व ती रूममध्ये जाऊन बसली) 

आता पुढे .........................

मी रूममध्ये जाऊन बसले खरे पण माझा राग अजून शांत झाला नव्हता, 

किती कमाल आहे ना या लोकांची कुणीच काही बोलले नाही आई ला 

मी काय मुद्दाम केलं होतं का???

यांनी तर हद्द च केली आज 
मान्य आहे ते प्रेम चार भीतीत करतात 
पण त्यांनी उघडपणे मत देखील मांडू नये, 
माझे डोळे लाल झाले होते तेवढ्यात हे रूममध्ये आले
 त्यांनी माझा राग शांत करण्याचा निरर्थक प्रयत्न केला, 
व बोलले काय फक्त दोन शब्द 

"मयू तू मनाला लावून घेऊ नको" 
बस झालं यांचं बोलून 

मला ना आई च्या बोलण्यापेक्षा यांच्या गप्प राहण्याचा जास्त त्रास होत होता, 

कसं समजत नाही याना माझी चिडचिड होतेय व हे व्यक्त पण होऊ शकत नाहीत, 

अशीच अबोल्यात एक पूर्ण रात्र व दुसरा दिवस देखील गेला, 

मी किचनमध्ये जाऊन कामे आवरू लागले आज मी कुणाशी च जास्त बोलले नाही शांतच होते व मलाही कुणी कामाव्यतिरिक्त बोललं नाही, 

आई तर अजूनही गप्प होत्या
 त्या फक्त कामपुरत बोलत होत्या, 
पण मी एक अनुभवलं होत जर मी शांत असेल तर घर देखील शांत असत, 

नेहमी बडबड करणारी मी 
मला ही शांतता खात होती, 
मी सर्व कामे आवरून रूममध्ये जाऊन बसले , 
हे ऑफिसमध्ये गेले होते, रोज दिवसातून दहावेळा एकमेकांना फोन करणारे आम्ही आज फक्त सकाळपासून एक कॉल आला होता जेवण झाले का म्हणून तो पण त्यांनी केला, 
मला प्रश्न पडला होता 
खरच स्त्री च स्त्री ची सर्वात मोठी शत्रू आहे असे म्हणतात हे खरंच खरे आहे का?????

मला सुचत नव्हते काय करावं तेवढ्यात आई चा कॉल आला, 
आई चा आवाज ऐकला व माझा बांध फुटला मी रडू लागले, 

"ये बाळ 
ये मयू 
काय झालं सांगशील का??" 
आई काळजीने कासावीस होऊन विचारात होती, 


"काही नाही आई तुझा आवाज ऐकला व कंट्रोल नाही झाले" 
मी सावरत म्हणाले 


"हो का अग .....आई आहे मी तुझी साग पटकन काय झालं" 

आई माझ्यावरील विश्वास दाखवण्यासाठी म्हणाली

मला आई कडे सासरच्याची चुगली करायची नव्हती,
 पण माझ्या मनाची देखील घुसमट होत होती मग कुणाला सांगणार ना ?? 
म्हणून मी बोलू लागले "बग ना ग आई काल माझ्याकडून थोडे दूध वाया गेल आणि पातेलं करपले मग आई माझ्यावर ओरडल्या, 
कुणी इतकं रागावत का??
त्या इतक्याशा दुधासाठी आणि विशेष म्हणजे हे काहीच बोलले नाहीत फक्त बघत होते सगळं 

मग मी यांच्यासाठी घर सोडून आले ना 
मग यांनी बोलायला नको का ???
अस असत का ग कुठे ????
व प्रिया एरव्ही खुप बोलते मग आज माझ्यासाठी त्या त्यांच्या आई ला बोलू शकत नव्हत्या का? 
मी म्हणजे फक्त कामवाली नाही ये ग 
मला पण मन आहे कुणी बोलले की मला पण त्रास होतो 
माझी माणसे सोडून आलीये मी याचे भान नसू नये यांना

मी बोलत होते व आई ऐकत होती 
आई तू काही बोलणार आहेस की नाही मी आई वर ओरडत म्हणाले, 

"मी तरी काय बोलू 
आणि मी सांगितलेलं तुला पटणार आहे का ??" 
आई शंका दर्शवत म्हणाली 

"अस ग काय बोलतेस आई 
मी ऐकणार नाही तुझे असे कधी होईल का ?? "

मी थोडं लाड आणत म्हणाले 

"बर मग ऐक 
मुळात तू आता जे मला सांगितले त्यातच तुझ्या खुप चुका मला दिसल्या त्या कशा ?? 
तू म्हणालीस मी त्यांच्यासाठी घर सोडले, तुला फक्त त्यांनी बोलावे ही अपेक्षा होती  
म्हणजे तू बाकीच्या लोकांना अजून आपलं माणलेच नाही मग त्यांच्याकडून तू कशी अपेक्षा करू शकते त्यांनी तुला आपलं मानाव 

अग जशी मुलं जन्माला घालणे ही निसर्गदत्त देणगी परमेश्वराने फक्त स्त्री लाच दिली त्याचप्रमाणे त्याने तिला सहनशक्ती, सौंदर्य, बुद्धी , चातुर्य, हे गुण देखील दिलेत ते कशासाठी तर तिने तिच्या गुणांच्या जोरावर लोकांना जिंकावे, 
तू त्या घरात नवीन आहेत जशे तुझ्यासाठी सर्व नवीन आहे तसे त्यांना देखील तू नवीन आहेस, 
कुणी आपल्याकडे दोन पाऊले चालत चालत यावं अस वाटत असेल तर अगोदर तुला चार पाऊले त्यांच्या पर्यंत जावे लागेल व प्रत्येक स्त्री ला हे करावेच लागते तू काही पहिली नाहीस हे करणारी, 

तुझ्या सासूबाई व मी स्वतः देखील हे टप्पे पार केलेत, 
व मला कधीच आवडणार नाही माझ्या मुलीने कुना दुसऱ्याची जागा ओरबाडून घ्यावी, 

तू तुझे स्वतः चे अस्तित्व त्या घरात निर्माण कर 
प्रेमाने ती माणसे जिंकून घे मग हे छोटे छोटे वाद, हेवेदावे ,उरतच नाहीत,
राहिला प्रश्न जवाईबापू चा तर त्यांनी त्यांचे नियम तुझ्यासाठी का मोडावेत मुळात तुला त्यांच्या हृदयात तुझे स्थान इतके मजबूत करावे लागेल की घरातील कुठल्याही वादाचा तुमच्या नात्यावर लवलेश देखील राहिला नाही पाहिजे, 

तुझ्या सासूबाई तू दूध वाया घातले म्हणून नाही ओरडल्या त्यांनी कष्ट केलेत व त्यांना असे अन्न वाया जाणे आवडत नाही , 


मी तर सांगेन हक्कासाठी झगडण्यापेक्षा तू कर्तव्याशी प्रामाणिक राहा व मग बदल बग, 

अगोदर तुला कुणासाठी काहितरी करावे लागेल मग दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेव 
व तू जेव्हा कुणाच्या अपेक्षा पूर्ण करशील ना तर तुझ्या अपेक्षा न सांगता पूर्ण होतील, बग तू 
समजलं बाळ 

अग स्त्री चा जन्म च झिजण्यात जातो आपल्या माणसासाठी व त्यातच तिचे सुख दडलेले असते" 

आई आता खुप भावुक झाली होती 
ती बहुतेक रडणार म्हणून मीच 
थोडा विषय बदलला 


" ओ आईसाहेब झालं का ज्ञानामृत पाजून पण एक सांगू सगळं डोक्यावरून गेलं आता फक्त मी काय करू ते साग किंवा तेव्हा मी काय करायला हवं होतं म्हणजे पुन्हा अशी वेळ आली तर मी हे लक्षात ठेवेन व वाघेन

मी पुन्हा थोडा मूड बदलत म्हणाले, 

"आगाऊ पणा करू नको 
एकतर तू जेव्हा तुझ्याकडून चुकले तेव्हा च सॉरी म्हणून संपून टाकायला हवे होते व दुसऱ्यादिवशी त्या बोलत नाहीत म्हणून काय झाले तू लहान आहेस तू बोल ना, 
व आता त्यांना सांग आई माझे चुकले मी यापुढे लक्ष ठेवेन 
अग आपल्या गोड बोलण्याने कधी कधी मोठं मोठ्या चुका देखील झाकल्या जातात व कडू बोलण्याने लहान लहान चुका देखील डोंगर उभा करतात, 

प्रत्येक व्यक्ती स्वतः च्या जागेवर  योग्य च असतो हे कधी विसरू नको" 

आई पुन्हा चालू झाली हे समजताच मी मधेच म्हणाले 

" हो आई समजले चल ठेऊ उद्या बोलू " 

असे बोलून मी फोन कट केला, 
आता मला खुप हलके वाटत होते 
खरच अनुभवाने माणूस शिकतो असे म्हणतात ते खोटं नाही, 

आज आई चे बोलणे जरी मला शंभर टक्के पटले नव्हते तरी ते शंभर टक्के अमान्य देखील नव्हते , 

माणूस वाईट नसतो 
परिस्थिती वाईट असते
हे थोडं थोडं पटलं होत आज ,


होते कधी कधी 
 कटपुटली माणसाची
ईच्छा नसूनही ती 
दुसर्यासम जगती 


साठवून मनात
 सगळी दुःख 
चेहऱ्यावर हसू 
ठेवती 

नाहीत जमत सर्वाना 
व्यक्त होणं 
मनातील भावनांना शब्दांत 
रूप देणं 

आज हे वेड मन 
विचारात पडले
मी अनुभवत होते एक गाव 
स्वप्नाच्या पलीकडले 


क्रमशः  ..............

🎭 Series Post

View all