स्वप्नांच्या पलीकडले (भाग 1)
नमस्कार
मी लेखिका गीता सूर्यभान उघडे
आतापर्यंत तुम्ही सर्वांनी जो प्रतिसाद दिला त्या बद्दल मनःपूर्वक आभार
असाच स्नेह राहू द्या हीच विनंती
आता भेटुयात एका नव्या वळणावर
प्रेम च
पण लग्नानंतर चे हळूहळू बहरात जाणार प्रेम,
चला तर मग कळवा तुमचे काही किसें, आठवणी किंवा अविस्मरणीय क्षण
मी गुंफेल त्यांना शब्दाच्या जाळ्यात
चालेल ना
अनुभवू आनंदाने सर्वजण ,
धन्यवाद
"मी मयुरी"
या घरची थोरली सुनबाई
किचनमध्ये कामे आवारात बसले होते तेवढ्यात माझ्या नंदेचा म्हणजे प्रिया ताई चा आवाज कानावर आला .
"वहिनी ..................
ये वहिनी .................
आई कुठे आहे सांग ना ??? "
प्रिया ओरडत आली.
मी
""का??
काही काम आहे का?? "
"नाही , ते ....….....
काहिनाही जाऊ दे ."
प्रिया म्हणाली
मी
"सांगा ना काय झालं"
प्रिया म्हणाली
"कुणाला च नाही सांगणार ना ? "
मी
"नाही, सांगणार "
"अग , अमोल भेटायला येणार आहेत
पण आई व दादा ला काय सांगू,
प्रिया लाजत म्हणाली.
अमोल म्हणजे
"प्रिया चा होणारा नवरा,
आताच साखरपुड झालाय त्यांचा. "
"तुम्ही जा , मी घेईल सांभाळून "
मी आश्वासन देत म्हणाले.
"वहिनी खरच ,
माझी लाडकी वहिनी"
असे म्हणून प्रिया ने मला मिठी मारली.
"हो हो बस झालं जास्त नको
पण आई येण्यापूर्वी लवकर घरी या बर
नाहीतर विसरून जाताल
की अजून लग्न नाही झाले तुमचे "
मी ताई ची खेचत म्हणाले
"वहिनी बस ना आता,
जाऊ मी ??"
ताई केविलवाण्या स्वरात म्हणाल्या,
"हो जा,
व लवकर या "
मी दम भरत म्हणाले.
प्रिया आनंदाने बागडत निघून गेली,
घरी कुणी च नव्हते,
अभिमान ऑफिस ला गेलेत,
आई बाहेर
बाबा बाहेरगावी व आता प्रिया देखील बाहेर गेली,
म्हणजे माझ्यासाठी ही पर्वणी च होती.
पर्वणी यासाठी की जेव्हा जेव्हा मला असा एकांत मिळतो
मी तेव्हा तेव्हा माझ्या आवडीची गाणे ऐकते.
आज देखील या वेळेचा सदउपयोग मी तोच करणार होते,
सगळी कामे आवरून मी कानात हेडफोन टाकून सोफ्यावर पडले.
सहजच न बघता एक गाणे लावले
म्हणजे पूर्ण डाउनलोड गाणे च माझ्या आवडीचे होते पण त्यातील हे जरा जास्तच होते,
मी कानात गाणे ऐकत होते,
सोन सकाळी गात भोपाळी
येई पहाट वारा
सारी वादळे मुठीत बांधून
हासतो हा किनारा
दारापुढती रोज रेखते
मी आशेची नक्षी
आनंदाची ओवी गाई
खुळ्या मनाचा पक्षी
तरी अचानक वाट बदलते
एक वळणावरती
काळोखात सोबतीस मग
सावल्या न माघे उरतो
गुज सुखाचे कधी कुणाला
आजवरी उलगडले
मी शोधते एक गाव
स्वप्नांच्या पलीकडले
हे गाणे माझ्या खुप जवळचे होते,
हे गाणे मी तेव्हा ऐकायचे जेव्हा माझा साखरपुडा झाला होता,
खरच एक मुलगी किती स्वप्न डोळ्यात ठेऊन दुसऱ्याच्या घरी प्रवेश करते ना,
पण प्रत्येकीला च तिचे स्वप्नातील गाव मिळते च असे नाही ,
पण मला मिळाले होते
म्हणजे मला स्वप्नांच्या ही पलीकडले मिळाले होते,
जाणून घ्यायचे का???
चला तर मग ,
मी विचार करत
गाणे ऐकत ऐकत त्यातच हरवून गेले.
खरच किती वेगळं होत ना आमच्या वेळी.
हे सगळं, अस लग्नापूर्वी भेटणे तर दूर साधे बघणे पण शक्य नव्हते,
आजकाल मुली लग्नापूर्वी च भेटतात, बोलतात काही सोबत राहतात देखील,
पण अमच्यावेळी असे काहीच नव्हते.
माझं लग्न झालं व मी सासरी आले,
आमचे लग्न म्हणजे ठरवून केलेले लग्न .
मी यांना अजूनही नीट पहिलं नव्हतं
हे जेव्हा बघायला आले तेव्हा फक्त यांचा हात दिसला होता व सगळे म्हणाले मुलगा छान आहे मग मी देखील म्हणाले,
असेल छान .......
लग्न झाले
जातीयेती झाली
मी दुसऱ्यांदा पुन्हा सासरी आले,
नवी नवरी म्हणून माझे कौतुक सोहळे चालू च होते,
मी जेव्हा दुसऱ्यांदा सासरी आले
तेव्हा ...........
"सगळ्यांचे दर्शन घे , "
मला आजी सासूबाई म्हणाल्या
मी सगळ्यांचे दर्शन घेतले व यांच्या समोर जाऊन उभा राहीले, काय म्हणावं हेच कळेना,
ते देखील अवघडले
"बघतोस काय दर्शन घेऊ दे तिला, "
आजीच्या या शब्दाने आम्ही भानावर आलो
त्यांचे दर्शन घेऊन
मी किचनमध्ये निघून गेले,
"मग...........
दादा
देवदर्शनाचे काय आहे, "
प्रियताई म्हणाल्या
"काय म्हणजे जाऊ ना आपण गाडीकरून "
अभिमान म्हणाले ......
"नको उगाच खर्च
तुम्ही दोघे च जा, "
आई म्हणाल्या
मी शांतपणे सगळं फक्त ऐकत होते
मग मी बोलणार तरी काय होते,
"ठरलं तर मग तू व वहिनी जा" प्रियताई
आता दोघांना बाहेर जायला मिळणार म्हणून मी खुश होते व कुठेतरी हे सुद्धा आनंदाने बागडत होते पण दाखवले आम्ही दोघांनी देखील नाही,
आम्ही तयार झालो,
मी छान गुलाबी रंगाची साडी घातली
त्यांनी सुद्धा त्यांचा लग्नातील फळाचा ड्रेस
घातला,
आम्ही मस्त तयार झालो आणि निघणार तोच.
आजी म्हणाल्या
"दोघे च नको
लेकरू पाठव सोबत एखादे, "
"आता लेकरू कशाला मध्ये असे मी मनातल्या मनात म्हणाले, "
मी चोरट्या नजरेने यांच्या कडे पाहिले
त्यांचा चेहरा तर बघण्यासारखा झाला होता,
खुप मोठा पोपट झाला होता त्यांचा....
पण शांत स्वभाव असल्यामुळे ते शांतच राहिले.
माझ्या मोठ्या चुलत नंनदबाई ची मुलगी श्रुती आमच्या सोबत आली,
आतापर्यंत खुशीत असलेली स्वारी आता नाराज झाली होती, मला तर खुप हसायला येत होते.
मी सारखी सारखी
"श्रुती तुम्हांला भुक लागली का?? "
"काही पाहिजे का??? "
"काही हवे असेल तर सागा असे म्हणत होते, "
व आमचे बोलणे ऐकून हे चिडत होते.
त्यांचा तो रडवलेला चेहरा बघून मला त्यांना चिडवायला अजून मजा येत होती.
आम्ही तिघे बाईक वर जवळच असलेल्या देवी च्या दर्शनाला गेलो,
तिथे पोहचल्यावर
आम्ही देवीला वाहण्यासाठी फुले व ओटी चे सामान घेतले.
माझ्या एका हातात ताट व दुसऱ्या हाताला श्रुती चे बोट होते.
आम्ही पायऱ्या चढून येत होतो व अचानक आमची दोघांची नजर एका नवविवाहित जोडप्याकडे गेली,
त्याच्या हातातील पूजेचे ताट
तिने एक हातात साडी पकडून दुसरा दिलेला त्याच्या हातात हात
हे दोघांच्याही नजरेतून सुटले नव्हते,
आता तर हे आणखी च रागाने बघत होते व मी हसत होते.
आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलो
गाभाऱ्यात खुप गर्दी होती व अंधार देखील हातातील पूजेचे ताट पुजारी काकांकडे देऊन मी मोकळी झाले,
मी त्यांना ताट देताच त्यांनी माझ्या ओटीत फळे टाकले,
आता काय म्हणावं
ताटाचे ओझे कमी झाले म्हणून मी सुस्कार टाकला नाही तोच ओटीत फळं पडले होते,
एका हातात श्रुती श्रुती चा हात
व दुसऱ्या हातात फळं
आता मला चालणे देखील अवघड झाले होते त्यात ती जमीन झाडत चाललेली साडी,
माझा रडावलेला चेहरा त्यांच्या नजरेतून सुटला नाही
"चल श्रुती माझ्याकडे "
म्हणून त्यांनी श्रुती चा हात पकडला,
गर्दीतून मार्ग काढत आम्ही बाहेर येत होतो
जशी जशी गर्दी वाढत होती
तसे तसे आमच्यातील अंतर कमी होत होते,
बाहेर पडण्यासाठी आम्ही दुसऱ्या बाजूने प्रयत्न केला, पण तिकडेही गर्दी च होती
चालताना कधी कधी त्यांचा हाताला होणारा स्पर्श मला रस्ता ही सुचू देत नव्हता,
नकळत झालेला की मुद्दाम केलेला
ते माहीत नाही,
आम्ही गडावरून खाली आलो,
तिथेच एका छोट्याश्या हॉटेलमध्ये जेवण करून घरी आलो,
अर्थात तोपर्यंत सगळे खानदान घरी जमले होते नवी जोडी बाहेर गेली कोणाला काय आणेल बघायला,
मी घरात प्रवेश केला तसेच लेकरं भोवती गोळा झाले ,
"मामी मला काय आणले??" चिऊ म्हणाल्या,
"तू थांब काकू मला सांग आधी काय आणले???" गोट्या म्हणाला
"दाखव ना मामी तुझी बॅग काय आणले "
चिऊ बॅग ओढत म्हणाल्या.
आता आमच्या दोघांची चांगली फजिती होणार होती
कारण घरच्यांना सोडा आम्ही सोबत नेलेल्या श्रुती ला देखील काही आणले नव्हते,
अरे देवा , .........
लग्नानंतर असे असते का???
आता काय सांगू यांना,
बर माझ जाऊ द्या यांनी तरी सांगायचे ना
मुलांना काहीतरी घे म्हणून,
मी केविलवाण्या नजरेने यांच्याकडे बघू लागले,
आमच्या चोरट्या नजरा
आई नि ओळखल्या.
"अरे जरा दम धरा,
तिथे काय ते यात्रेत गेले होते का???
तुम्हांला काही आणायला
यात्रा आली की मग आपण सगळे जाऊ मग तुम्हांला हवे ते घेऊ,
आता जा खेळायला "
असे सांगून आई ने वेळ मारून नेली.
"हो वहिनी बरोबर आहे,
तसेही यांना कुठे वेळ मिळणार होता.
कुणाला काही आणायला,
एकमेकांना बघण्यात च वेळ गेला असेल यांचा,
हो की नाही मयुरी "
निशा आत्या म्हनाल्या
व त्यांच्या या बोलण्यावर सगळे हसू लागले,
मला काही सुचेना,
"मी आलेच"
म्हणून मी पळ काढला व रूम मध्ये जाऊन मनसोक्त हसले,
यांचा चेहरा तर आणखी च बघण्यासारखा झाला होता,
तो आठवून मला अजूनही हसायला येत होते,
आज खुप खुश होते
मी अनोळखी लोक होती पण त्यातही आपलेपणा जाणवत होता,
अनोळखी जग सारे
मज स्वर्गासम भासते
तुझ्यात हरवून मजला
मी माझीच लाजते
मिळताच तुझा मज
हाती हात
जन्मोजन्मी मिळावी
फक्त तुझीच साथ
विसरुनी स्वतः ला मी
प्रेम तुझ्यावर जडले
अनुभवते आहे मी
एक गाव स्वप्नांच्या पलीकडले
मनातल्या मनात या ओळी आठवून
स्वतः च लाजत होते मी ...…...............
एक वेगळेच असते ना लग्नानंतर हळूहळू बहरात जाणारे ते प्रेम,
जाणून घेण्यासाठी या प्रेमाचा प्रवास सोबत राहा,
लेखिकेला फॉलो करा,
कथा आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका,
आणि हो शेअर करा तुमचे बहरात जाणाऱ्या प्रेमाचे काही आठवणीतले क्षण
पुन्हा अनुभवण्यासाठी लेखिकेच्या शब्दबंधाने,
आपल्या प्रतिक्रिया च्या प्रतीक्षेत ...........................
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा