Login

स्वप्नांजली.2

ही पुर्ण एक सलग कादंबरी आहे , घरच्या कठीण परिस्थिती मधे , दोन प्रेमी जीव , एकत्रित यायला धडपडतात आ

अवी पहाटेच ऊठला , आंघोळ करुन तयार झाला , आईने जेवणाचा डबा तयार केला आणि नाश्ता पण एका दुसर्‍या डब्यात टाकला आणि अवीला म्हणाल्या ,

अवी गाडीत बसला की आधी नाश्ता कर मग बारा वाजता जेवण कर , काय तू पण कश्या ठिकाणी बदली घेतली , आई थोडी चिडूनच म्हणाली , आई किती वेळा तुला सांगीतले , ट्रेनींग पिरेड आहे हा माझा असच समज तू , तिकडे जायला सहसा परिवार वाले म्हणजे लग्न झालेले , जायला बघत नाहीत , तिथे खुप काही शिकता येईल मला , आॅफीसमधे नाव ही चांगल राहील , शिवाय पगार ही दीडपट आहे , तिथे जायला नाहीच म्हणू शकत नाही मी , आता अश्या दुर्गम ठिकाणी राहीलो की नंतर मग शहरातच राहता येईल गं !

आणि आई , जेवायची वेळ काय सांगतेस ! भूक लागेल तेव्हा लगेच जेवण करेन मी , तू काळजी करु नको . लतिका आज ट्रिपला जाणार होती , भेटशील तिला परत आल्यावर ,

बरं बेटा मला सांग तू पोहोचल्याचा निरोप आम्हाला कसा मिळेल .

अगं आई वायरलेस यंत्रणेवरुन मी तुला निरोप पाठवू शकेन पण तिथे जाऊनच बघावे लागेल ते ,

तसेही मी पंधरा दिवसाने सुट्टी काढून येतोच काळजी करु नकोस .

बरं बाबा ठिक आहे ! जा व्यवस्थित आणि लतिकाची काळजी करु नकोस मी लक्ष देईन तिच्याकडे .

मग आईच्या पाया पडून अवी रेल्वेनी निघाला अलीगडला .

संध्याकाळी सहा वाजता अलीगड स्टेशनला अवी ऊतरला ! स्टेशनवरच त्याला त्याचा ड्रायव्हर घ्यायला आला होता ! त्या स्टेशनवर ऊतरणारा तो तिसरा व्यक्ती होता , सोबतच एक वयस्क जोडप ऊतरल होतं म्हणून ड्रायव्हरला त्याला शोधणे जड गेल नाही .

माझ नाव दिनानाथ , गेल्या तीन वर्षापासून मी इथे आहे सर जी , माझ घर रायगड ला आहे , परिवारही तिकडेच आहे , अवीला नमस्कार करत दिनानाथ म्हणाला .

हो का ! चला तर मग जाऊया आपण रायगड ला ,

हो सर जी , पण रायगडपासून दोन किलोमीटर वर तुमच राहण्याच ठिकाण आहे ,

तिथे आपला खानसामा राहतो आणि चपराशी पण आहे ,

बरं मग चला दिनानाथ , 

दोघेही जीप मधे बसलेत , स्टेशन पासून थोडा पक्का रस्ता त्यानंतर कच्च्या रस्त्याने एका तासात ते रायगड ला पोहोचले , छोटस गाव होत ते , शंभरेक घरांची वस्ती असावी तिथे , मिनमिनते लाईट दुरुनच दिसत होते पण आजूबाजूची निरव शांतता गूढ वाटत होती , 

गाव सोडून पुढे तर ,

अजूनच भयाण शांतता होती , ती गाडीतही अवीला जाणवत होती , दाट झाडी असल्यामुळे गुढपणा वाढला होता , 

अरे बापरे हे काय वातावरण आहे हो दिनानाथ ! भयाण वाटतेय हो ! 

हो सर जी रात्र झाली की असच वाटतं , ऊद्या सकाळी बघा तुम्ही , छान वाटेल इकडच वातावरण तुम्हाला , तो बघा आपला बंगला दिसतोय , 

दिनानाथ ने समोर इशारा करत म्हंटले , 

मोठा जूना डाकबंगला होता तो इंग्रजांच्या काळातला , पण अवीला सगळच भयाण वाटले , मनातून तो चरकला ही , कल्पनाच केली नव्हती त्याने कधी अश्या जागेची , जसं वर्णन तिथल त्याला सांगीतले होते ते ऐकताना काही वाटलं नाही पण प्रत्यक्ष आता तिथे भयाण वाटतं होत .

जीप च इंजीन बंद करत दिनानाथ म्हणाला , 

चला सर जी आत , 

किर्रर्रर्रर्र किड्यांच्या आवाजाने अवी घाबरलाच ! 

का हो हा आवाज ,

सर जी रातकिड्यांचा आवाज आहे , मधेच मोरांचा आणि बाकी ही प्राण्यांचे आवाज येतात इथे !

अरे बापरे ,,, छातीवर हात ठेवत अवी बोलला,

पण सुरक्षीत आहे का हे ठिकाण ?

हो ,, हो,,, सर जी आहे सुरक्षीत म्हणजे आजपर्यंत तरी इथे काही अघटीत झाले नाही , म्हणजे माझ्या ऐकीवात नाही तस , नमस्ते सरजी , आवाजाने दचकून अवीने मागे बघीतले तर एक पस्तीस वर्षीय व्यक्ती ऊभे होते हात जोडून ,

नमस्ते , आपण ?

मी चपराशी आहो सरजी , माझ नाव राजू , बंगल्याच्या मागे खोली आहे माझी ,

एकटेच राहता, 

होजी सरजी , माझा परिवार अलीगडात राहतो , 

अच्छा आणि खानसामा कुठाय ?

तो गरम पाणी ठेवायला गेला , चहा पण बनवत असेल ,

तो पहा आला , बंगल्याच्या मागून एक राजूच्याच वयाचा माणूस त्यांच्या जवळ आला , 

हात जोडून त्यानेही नमस्कार केला ,

हा चिंतामण आहे सर जी ,

दिनानाथ ने सांगीतले , खानसामा आहे , ऊत्तम जेवण बनवतो , चहा तर पिऊन बघा , म्हणजे तुम्हाला कळेल, हाताला चव आहे त्याच्या , 

चिंतामन चा परिवार पण रायगडलाच राहतो , ड्रायव्हर ने माहीती पुरविली ,

बरं बरं चला सामान आत घ्या , मला आंघोळ करायची आहे आधी , मग चहा , नंतर जेवण , अवी बंगल्यात प्रवेश करत म्हणाला , 

मग सगळे आत आले , बंगला चांगलाच ऐसपैस होता ,

मोठा व्हरांडा नंतर मोठा हाॅल बाजूलाच डायनींग टेबल ठेवलेला , त्याला लागूनच स्वयंपाक खोली , हाॅल च्या दुसर्‍या बाजूला दोन झोपायच्या खोल्या सोबत दोन संडास बाथरुम , बाथरुम हे भलीमोठ्ठी , पाहून छानच वाटले अवीला , 

बापरे ही तर आपल्या घरची बेडरुम एवढी आहे ! मनातल्या मनात अवी म्हणाला , 

गरम पाणी आधीच बादलीत ठेवलेले होते , मग अवीने मस्त पैकी गरम पाण्याने आंघोळ केली , आंघोळ केल्याने दिवसभराचा क्षिण त्याचा गेला , 

क्रमशः

🎭 Series Post

View all