स्वप्नांजली.17

It is a continuous novel !! but due to the limitations of words, it is presented in parts, reveals the story of mystry in lives of two youngs in love,with interesting twists....

अवी पाठमोरा होता , फोटोच्या समोर ऊभा राहून तो बोलत होता , " लते ,, का सोडून गेलीस गं मला,,, आजही मी तुला विसरलो नाही ,,, किती स्वप्नं बघीतलीत आपण दोघांनी ,,, ती सगळी स्वप्नं प्रत्यक्षात ऊतरलीत ,,, पण त्यात तूच नाहीयेस,,, तू म्हणाली होती ना आपल्याला पहीली मुलगी हवी,,, बघ आहे ना ! आज तिचा पाचवा वाढदिवस , तू जाऊन सात वर्षे झालीत ,,, तुला सांगू का तुझ्या आठवणीने आधी मी रडायचो , पण जेव्हा पासून अंजलीचा जन्म झाला , तेव्हापासून अस वाटत तू माझ्या अवती भवती आहे ,,, तुझ्या अधीकच जवळ आलो मी,,,,अगं तिच्या सगळ्या सवयी तुझ्या सारख्या आहेत गं ,,, कस काय हे,,,, ? ती सतत मला तुझी आठवण देते ,,, मी भगवंताचे आभार मानतो , मला त्यांनी अंजली च्या रुपात तू दिलीस , बरं तू आईची अजिबात काळजी करु नको मी आहे त्यांच्यासाठी ,,,, ! आणि भार्गवी आम्हा सगळ्यांची खुप काळजी घेते , चांगली आहे ती स्वभावाने , कधीच काही प्रश्न करत नाही,,,, हे ,, हे,, रागवू नकोस , सुशीला आईने तुझी शप्पथ देऊनच मला तिच्याशी लग्न करायला भाग पाडल ! म्हणूनच केल मी लग्नं ,,,! नाहीतर ,,,,,!

असो ,,, चल , ऊद्या बोलतो तुझ्याशी , शुभरात्री ! म्हणून अवी स्टडी रुम मधे गेला , आणि दार बंद केलं,,,,,,! 

त्याच बोलण ऐकुण भार्गवीचा रागाचा पारा चढला ,,, केवढी आनंदात होते मी ,, वाटल आमच्यातल अंतर मी कमी केलय,,,पण हे काय ऐकल मी,,,हा अजूनही लतिकाच्याच स्वप्नात आहे ,,, सहा वर्षे झालेत लग्नाला,,,काय मिळवल मी ह्याच्या कडून,,,, किती सेवा करते ह्याच्या आईची , घरादाराची आणि हा अजूनही हिच्याच प्रेमात,,,ती तावातावाने लतिकाच्या फोटो समोर आली आणि नजर रोखून रागाने तिच्या फोटो कडे बघू लागली ,,,, लतिका कधी माझा पिच्छा सोडशील बाई,,, मी विना बापाची वाढलेली पोर , असुरक्षित बालपण माझं,,, आई आणि मी , लोकांना घाबरुन , वचकुन राहायचो,,,, घराबाहेर पडायला आम्हा दोघींनाही भीती वाटायची,,, कसेबसे आम्ही जगत होतो गं,,,, त्यातून तू मला आवडायची लतिका,,,, पण तू माझ्याकडे कधीच लक्ष दिल नाहीस,,,, स्वतःमधे गुंग असायची,,,आॅफीसमधे मी एकदा तुला नमस्कार केला,,, ऊत्तर देऊन तू पुढे माझ्याशी बोललीच नाही,, सरळ निघून गेलीस,,, अवी दिसल्याबरोबर,,,,! मी तर आधीच बुजरी,,, तू माझी अवहेलना केली,,, त्यामुळे मी अधिकच दुःखी , खजील झाले,,, त्यातच मी अवीला बघीतले,,, आणि पहील्या नजरेतच मला तो खुप आवडला,,,हो हो,,, खर सांगते तुला,,,मला तो पहील्यांदा बघीतल्या बरोबर आवडला,,,त्यानंतर जेव्हा ही तो तुला घ्यायला आला मी त्याला बघत होते,,, पण तुम्ही दोघेही स्वतःमधे मश्गुल असायचे,,,,माझ्याकडे तुमच लक्षच नसायचं , एकदा तू कामात बीझी असताना मी मुद्दामहून बाहेर जाऊन अवी शी बोलले ,,, हो खरेच,,, कुठून हिम्मतं आली होती कोण जाणे , पण मी , तू कामात आहेस थोडा वेळ लागेल असा निरोप देऊन,,,,तुझी मैत्रिण म्हणून अवी शी ओळख करुन घेतली होती ,,,,हो,, गं,, त्यानंतर ही तुझ , अवीच घर पण बघून घेतल होत तुमचा पाठलाग करुन,,, मी ,,,, मी अजिबात वाईट मुलगी नाहीये लतिका,,,पण कुठेतरी तुम्हा दोघांच प्रेम बघून वाटत होत,,, मलाही असा जोडीदार मिळावा,,, नकळतच मी अवीच्या प्रेमात पडले,,, म्हणून तुझ्याशी मैत्री करायचा प्रयत्न केला,,, पण तू कधीच पुढे होऊन माझ्याशी बोलली नाहीस,,,,त्या दिवशी आपण ट्रिपला गेलोत,,,, मुद्दामहुन मी तुझ्या जवळ पटकन येऊन बसले ,,, केवळ तुझ्याशी मैत्री व्हावी म्हणून,,,,आणि खरेच तुझ्याशी खुप बोलता आल मला तेव्हा,,,,,,

मज्जा करत ,,,आनंदाने गाणे म्हणत आपली बस जात होती , आणि अचानक वळणावर तो अॅक्सीडेंट झाला,,,,,!

काही कळायच्या आतच गाडी चिरत फुटत खाली खाईत गेली,,,मला शुद्ध आली तेव्हा बघीतले तर दरीतल्या एका मोठ्या झुडपी झाडावर आपण पडलेलो होतो , अधांतरी,,,,, तू तर बेशुद्धच होती बाकी काहीच कळायला मार्ग नव्हता,,,,आणि अचानकच तू हालचाल करायला लागली आणि तू अवीला आवाज दिला,,,,, खरेच,,,, इथेच तुझं चुकल गं ,,,,,,माझ्या नजरे समोर अवी आला,,, आणि मी तुला झटका दिला,,,,,,,,!

आज तू फोटोत आहेस,,, आणि मी अवीची बायको आहे,,,, राहा कायम तू फोटोमधे,,,,,, आज ना ऊद्या तो माझा होईलच,,,,जीवाच रान करेन मी त्याला आपल बनवायला,,,

लग्न करुन आई तर बनलीच आहे,,,,, ऊद्या त्याच्या मनावरही राज्य करेन,,,,! तुला विसरायला भाग पाडेन मी त्याला,,,,

आज हो तू खुश,,,,,! माझ मन दुखवलस तू पुन्हा एकदा,,,,! 

बघ तू आता , तुला कशी विसरायला लावते ते,,,, बघच ,,,,!आणि विकटं , कुटील हास्य तिच्या चेहर्‍यावर आले,,,,,,!

हे सगळ संभाषण तिकडे वर विधाता , कर्ता करविता , प्राण हरणारा आपल्या सौभाग्यवतीसह मंद हसत बघत होता,,,,!

त्याला तसे हसताना बघून सौ. म्हणाली , राजे आपण का हसताय,,,, हि साधी , सालस वागणारी , 

दिसणारी मुलगी एवढी क्रुर कशी काय होऊ शकते,,,,,?

प्रेम , माया , इर्षा म्हणतात त्याला,,, ती आहे चांगली मुलगी,, पण परिस्थितीने,,, तिला संधी मिळाल्यावर तिच्या हातून हे क्रुर कांड झालं ,,,!

आणि तुम्ही हे होऊ कसं दिलत,,,?

भार्गवीला दंड व्हायलाच पाहीजे महाराज ,,,!

लतिकाला न्याय मिळालाच पाहीजे,,,!

हो,, हो,,, राणी सरकार ,,, लतिकाला न्याय मिळाला आहे !

आणि भार्गवी शिक्षा भोगतेच आहे !

कसे काय ? मला कळले नाही महाराज ?

अगं त्या दोघांच प्रेम बघूनच मी त्यांच्या इच्छा पुर्ण करायसाठी , त्यांना स्वप्नातले ते दोन दिवस दिलेत की ,,,,!

ओ हो , बरं , अस्स होय,,,,,! 

आणि जिचा मत्सर वाटला , जिला जगातून , ऊठविले , आज तिचीच ती सेवा करतेय,,,!

म्हणजे , मी समजले नाही ?

राणी सरकार , अंजलीच्या रुपात ,,,, लतिकेचाच जन्म झालाय,,, भार्गवीच्याच पोटी,,,,!

हे तिचेच कर्म आहेत,,, अंजलीची सेवा करत,,, तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत,,,एकप्रकारे भार्गवी लतिकेचेच कर्ज ऊतरवित आहे,,,,, नकळतपणे,,,,,,,!

धन्य धन्य विधाता ,,,कर्ता करविता,,,,,,!

धन्य धन्य तुझी माया,,,,,!

कर्म करा सदा चांगले

फळ मिळतील चांगले

समाप्त

———

🎭 Series Post

View all