Login

स्वप्नांजली.16

It is a continuous novel !! but due to the limitations of words, it is presented in parts, reveals the story of mystry in lives of two youngs in love,with interesting twists....

तिकडे किचन आवरता आवरता शिला ने भार्गवीला म्हंटले , का गं मी नेहमी बघते तुझी अंजली पण अवी च्या फारच अंगावर आहे , सदानकदा पप्पा ,,, पप्पा,,, आमच्या मुली कश्या आमच्यासोबत कुठेही येतात , तुझ्या सोबत तू अंजली ला नाही आणत कुठेही ? 

अगं काय गं हे शिला , कुणाच्या मुलांना आईचा लळा असतो आणि कुणाला वडीलाचां लळा असतो जास्त , त्यात काय ? मला वडीलांच प्रेम मिळाल नाही , ज्याला आज पण मी तरसते , अंजलीला वडीलांच प्रेम भरभरुन मिळत आहे,,, असेच मिळत राहो भगवंता ! हात जोडून ती म्हणाली , 

मग शिला कडे वळून म्हणाली , 

तिला अवीसोबत राहायला आवडत , मग काय ? 

हे बघ मला त्या दोघांच ट्युनिंग फारच आवडत , 

तिच्या मुळे अवीच्या जीवनातील माझ स्थान पक्क झालं आहे , हे मला माहीत आहे ! हसून आणि कौतुकाने ती , अवी आणि अंजलीला निहारु लागली , 

बस गं बाई तुझ कौतुक , बघ ना किती प्रेम ओसंडुन वाहतेय तिच्या डोळ्यातून , कौतुक बघ किती नवरा आणि मुलीच , आणि सगळ्याच हसल्यात .

एव्हाना सगळं आवरुन झाल होत , तेव्हढ्यात अंजलीचा केक पण आला , गप्पा टप्पा करता करता संध्याकाळ कधी झाली ते कळलच नाही , मग सगळे ताजेतवाने होऊन आलेत , 

भार्गवीने मैत्रिणींच्या मदतीने केक वगैरे टेबल वर ठेऊन औक्षण ची तयारी केली , सुंदर सा निळा फ्राॅक घालून अंजली तर परी दिसत होती , सगळे खुप कौतुकाने तिला बघत होते , सुशीलाबाईंनी तर तिची दृष्टच काढली , 

तसे अंजलीने सुशीला बाईंना मिठीच मारली आणि शिला ने मोयनाला कोपरखळी , आणि डोळ्यांनीच इशारा केला , 

बघ तिच्या कित्ती अंगावरची आहे ती म्हणून ! 

अंजली ला आवडतात म्हणून दिवे बंद करुन काही मेणबत्याच लावल्या होत्या , अंजली चे भार्गवी , मोयना , शिला , विभा आणि सुमतीने औक्षण केले , 

मेणबत्ती विझवित मग केक कापला अंजलीने , 

सर्व एकत्रित म्हणाले , 

happy birthday to you anjali , 

केक कापून अंजलीने आधी अवीला खाऊ घातला नंतर तिने केक सुशीलाबाईंना खाऊ घातला मग रमाबाई नंतर तिने भार्गवीला केक खाऊ घातला , 

इथे मात्र भार्गवी दुखावल्या गेली कुठेतरी , 

तरी ही कसनुस स्वतःला सांभाळून तिने अंजलीला जवळ घेतले , शुभेच्छा दिल्या , तिची पप्पी घेतली , 

मग सगळ्यांनी शुभेच्छा देऊन केक खाल्ला , 

तिला भेटवस्तू दिल्यात , अंजलीतर आज फारच खुश होती !

थोड्या वेळाने सुशीला बाई भार्गवीला म्हणाल्या आता रात्र झाली आहे मी निघते , बरं मावशी तुम्हाला आॅटो मिळेल ना जायला , हो गं आता निघाली तर नक्कीच मिळेल , 

नंतर मग थोडा वेळच लागेल , 

इथून ऊशीरा निघाली तर , 

बरं ठिक आहे मावशी या मग ! चला अंजली बेटा निघते मी ,अरे कुठे चाल्ली आज्जी , 

मी आता घरी जाते ना ! रात्र झाली गं , 

थांब ना तू ,,,,! 

अरे नाही गं , निघते मी , 

तसेच अंजलीने अवीला आवाज दिला , 

पप्पा ही बघा आज्जी घरी जाते , थांबवा ना तिला , 

अरे बेटा जाऊ दे मावशीला , एकट्याच राहतात त्या , ऊशीर होईलना घरी पोहोचायला , तिला समजावित भार्गवी म्हणाली , तेव्हढ्यात अवी तिथे आला , 

त्याने भार्गवीच बोलण ऐकल होत , 

तो तिला म्हणाला , अगं थांबव ना काकूंना , 

तू पण आपली त्यांना जाऊ देत आहे रात्रीच्या वेळी , 

ते काही नाही काकू , तुम्ही आता काही दिवस इथेच थांबायच आहे,,,,,! 

हो ,,, खरचं,,,, विषय इथेच संपला ,,,! रमाबाईंनी विषय संपवला , 

बरं बाबा थांबते मी ,, तिकडेच कोण आहे माझी वाट बघणारं ,,, झाल का मनासारख ,, हसून त्या अंजलीला म्हणाल्या ,, ये,,,ये,,, म्हणत अंजलीने आनंदाने टाळ्याच वाजवल्या , 

थोड्या वेळातच मुलांना भूक लागली मग सगळ्यांनीच सकाळच जे पण जेवण शिल्लक होत ते खाऊन घरी परतले , विमल बाईंनी पण कामे ऊरकलीत तसे भार्गवी त्यांना म्हणाली आता ऊद्या येऊन करा , जा तुम्ही घरी , विमलबाई ही घरी गेली , थकल्यामुळे रमाबाई , सुशीलाबाई झोपायला गेल्या अंजलीही त्यांच्या सोबत झोपायला गेली , 

अवी भार्गवीला म्हणाला तू पण आराम कर आता , थकली असशील ना ! सुखावलीच भार्गवी त्याच्या त्या शब्दांनी ,,,,,! 

हो ,, हो थकले पण आपल्या लेकीचाच वाढदिवस होता , तसा थकवा आला नाही मला , 

ऊलट ऊत्साह होता दिवसभर , 

बरं बरं जा झोप आता ! ठिक आहे जाते आणि तुम्ही ? 

हो झोपतो मी पण , दार बंद करतो , 

ठिक आहे म्हणत भार्गवी बेडरुम मधे गेली ,

ताजेतवाने होताना ती विचार करत होती , 

आजचा दिवस कसा मिश्र विचारांनी भरलेला होता ! 

राग , लाड , लोभ , मत्सर आज कधी नव्हे ती मैत्रिणींना मी माझी खंत बोलून दाखविली , 

रडले त्यांच्या समोर , 

पण अवी च्या दोन गोड शब्दांनी माझ्या जखमेवर फुंकरच घातली जणू ! 

खुप आनंद झाला मला आता , 

ही सुरुवात आहे असच समजते मी , 

माझं आणि अवीच नात इथून पुढे बहरणार हा संकेत मला मिळाला ! मनावरच थोड ओझ ऊतरल्यासारख वाटतय ! हुश्शsss

आनंदाने ती गाण गुणगुणत बाथरुम बाहेर आली , 

तिला पाणी प्यावेसे वाटले , बाॅटल बघीतली तर रिकामी , 

ओ हो , चल पाणी आणते म्हणत ती बेडरुम बाहेर आली , काॅरीडाॅर मधून हाॅल मधे येताना तिला बोलायचा आवाज आला , तसे ती थबकलीच , 

अवीचा आवाज होता ! मग हळूच ती हाॅलच्या कोपर्‍या पर्यंत आली , आणी लपूनच तिने आवाजाच्या दिशेने बघीतले , 

क्रमशः

ऊद्याचा अंतिम भाग राहील .

🎭 Series Post

View all