स्वप्नांजली.15

It is a continuous novel !! but due to the limitations of words, it is presented in parts, reveals the story of mystry in lives of two youngs in love,with interesting twists....

तशी भार्गवी म्हणाली , माझ्यासोबत बोलायला वेळ नाही अवीला पण न चुकता मावशीची भेट घेतो , काळजी करतो तिची , हो,,,हे काय गं तुझ्या नशीबात , 

तू ना खुपच शांत आहेस , काही बोलत नाही ह्यांना म्हणून तर त्यांची चुक त्यांना कळत नाही , 

बोलून काय करते गं , एक आई होती मला , ती ही तीन वर्षां पुर्वी वारली , आता हेच आहेत माझ्या साठी , रागावून कुठे जाते सांग बरं , दुःखी अंतकरणाने भार्गवी म्हणाली , 

हो पण वाईटच गं , सगळ ऐश्वर्य असून ही नवराच जर जीवाभावाचा नाहीये तर काय फायदा ? विभा हळहळत म्हणाली , बर तू एकदा अवी सोबत स्वतःहून बोल बर ह्या विषयावर , 

अगं विभा काय बोलू ग त्याला , मी कपडे म्हंटले की कपडे घेऊन देतो , वाढदिवसाला एखादा दागीना आणतो , वर्षातून एकदा सगळ्यांना आम्हाला फिरायला नेतो , घरात मी जे म्हणेल तेच होतं , मग काय बोलू त्याला ? हा फोटो का लावला ? मावशीला भेटू नको ? एवढी कोत्या मनाची बनू का त्याच्या नजरेत ? थोडी रागानेच भार्गवी बोलली , 

तश्या थोड्या चपापून चौघी एकमेकींकडे बघायला लागल्या , बरं मग मला सांग हा तर लतिकाच्या प्रेमात अजूनही दिसतो , मग अंजली कुठून आली ? विभा खट्याळपणे तिला कोपराने ढुशी देत म्हणाली , तशी रडता रडता थोडी हसूनच भार्गवी म्हणाली ,

वो अंदर की बात है , मै क्यो बताऊ ? 

बरं आता रडू नको आणि आमच्या कडून साॅरी , 

ह्या नंतर आम्ही ह्या विषयावर काहीच बोलणार नाही , 

हो ना मैत्रिणींनों ! yess म्हणत सगळ्यांनी तिला झप्पी दिली , बर चला मुलांना जेवणाच विचारु आणि चपात्या , पुर्‍या राहील्यात त्या करुन घेऊ , 

मग सगळ्या किचनमधे आल्यात , बाई ने हाॅल आवरला होता , टेबल वर प्लेट ठेवतच होत्या बाई , 

आम्ही चपात्या करतो तुम्ही भांडी घासा आता , 

ढिग पडला आहे बाई , विमल बाई हो म्हणून भांडी घासायला गेल्या , इकडे सुशीलाबाई म्हणाल्या आज मला लतिकाची खुप आठवण येत आहे , अंजली वेगळी दिसते पण , का कोण जाणे , तिला भेटले की लतिकाला भेटल्याचा आभास होतो आणि त्या रडायला लागल्या , 

रमाबाईंच्याही डोळ्यात पाणी आले , सात वर्षे झालेत लतिका जाऊन , पण आजही खरेच माझ्या नजरे समोरुन हलत नाही गं ! माझी ही हालत तर , 

तू तिची आई , तुला किती त्रास होत असेल ! कळत मला , आणी त्यांनी सुशीला बाईला जवळ घेतले , 

अगं भार्गवी आहे ना ! खुप छान सुन आहे गं , 

सगळ कस निमुटपणे करते , खुपच शांत आहे ,

तुला पण खुप जीव लावते , नेहमी आठवण काढते , 

माझ्याही आधी , अवीला तुझ्या भेटी साठी जायला सांगते , 

हो गं माहीत आहे मला , ती पण मला लतिका सारखीच आहे , चल काय आजच्या दिवशी रडगाण घेऊन बसलो , 

बाहेर जाऊ , दोघीही ऊठून बाहेर आल्यात , भार्गवीने रमाबाईना म्हंटले , आई सगळ्यांना जेवायला बोलवा बरं , ताट वाढतच आहे मी , ठिक आहे म्हणत ,आई बाहेर आल्या , 

इकडे अवी , राजेश , सुरेश , प्रदीप आणि अशोक सोबत गप्पा करत होता , राजकारणावर जोरदार बहस सुरु होती त्यांची , तेव्हढ्यात आईने त्यांना म्हंटले चला या जेवायला , ताट वाढलेत , हो हो आई आलोच म्हणत सगळे ऊठून आत आलेत , सुशीला बाईंनी मुलींना पण बोलावले , सगळ्या खेळण सोडून जेवायला आल्या , भार्गवी अंजली कडे बघून म्हणाली , आज एका मुलीच्या आवडीचे पदार्थ बनले आहेत बाबा ! बघा बर काय काय बनवल ते ! 

बटर पनीर , बटाट्याची सुकी भाजी , छोले , गुलाबजामुन , मठ्ठा , व्हेज पुलाव , पुरी , चपाती , मूग वडे , सलाद , पापड ! वा वा एवढ सगळं , आनंदाने अंजलीने टाळ्या वाजवल्यात , अचानक सुशीलाबाई म्हणाल्या , 

माझ्या लतिकाला हे सगळे पदार्थ खुपच आवडायचे ! सगळ्यांनी चमकुन त्यांच्याकडे बघीतले , 

तशी भार्गवी म्हणाली , हो ना ! म्हणून तर बनवलेत पदार्थ , 

मग सगळेच गुपचुप जेवायला बसलेत , कुणी डायनिंग टेबलवर कुणी खाली , मग हसत बोलत जेवण आटोपले , तेवढ्यात काहीस आठवून अंजलीची मैत्रिण वैभवी म्हणाली , अगं आपण तुझा केक तर कापलाच नाही , 

हो गं वैभवी मला आठवण आहे , पण मी रात्रीच केक कापते , दुपारी नाही आवडत मला केक कापणे , 

मग आम्हाला संध्याकाळीच बोलवायच असतं ना ! 

वैभवी म्हणाली , हो तुम्ही सगळे थांबा ना संध्याकाळ पर्यंत , केक खाऊनच जा परत , मग सगळे एकसुरात म्हणाले ठिक आहे आज अंजलीच्या मनाने , जाऊ आरामात घरी , 

इकडे अंजलीच्या त्या वाक्याने अवी भूतकाळात हरवला , लतिकाचा वाढदिवस होता , तिला सरप्राईज द्यायच म्हणून अवी केक घेऊन तिला भेटायला गेला आॅफीसमधे , 

तर खुश व्हायच्या ऐवजी ती त्याला रागावली , 

तू आत्ता का घेऊन आलास केक , मला रात्री मेणबत्ती च्या प्रकाशात केक कापायला आवडतो , मी आता केक कापणार नाही , तू असाच घेऊन जा आणि संध्याकाळी घरी ये केक घेऊन , तिने काहीच ऐकुण घेतल नव्हत त्याच , 

शेवटी केक त्याला परत न्यावा लागला होता , 

तिची आठवण येऊन हलकेच हसू ऊमटल त्याच्या ओठांवर . 

पुन्हा सगळे गप्पा करत बसलेत , 

तसे अंजली अवी जवळ बसली गप्पा ऐकत , 

तिच्या मैत्रिणिंनी तिला खेळायला विचारले तर ती नाही म्हणाली , दोघीतर जेवल्यावर झोपल्याच , नाईलाजाने मग वैभवी आणि मोयना मोबाईल मधे गेम खेळायला लागल्या , 

क्रमशः

🎭 Series Post

View all