नाही मागच्या वेळेस फोटो पुसायला हात लावला तर साहेब ओरडलेच , म्हणून विचारलं !
अहो मावशीबाई , साहेब आता घरी नाहीत , पुसून घ्या !
साहेबां समोर नका हात लावू कधी !
बरं बाप्पा , तुम्ही आहे म्हणून ! स्वभावाने गरीब पडल्या तुम्ही ! दुसर्या कोन्त्या बाईन असा फोटो ठेवू दिला असता ? दुसर्या बाईचा !
विमल बाई ,,,ते सोडा , ती माझी पण मैत्रीण होती आणि ती आता आपल्यात नाही , म्हणून बोलण्यात काही अर्थ नाही ,
लागा कामाला , तो पर्यंत मी माझी बेडरुम आवरते , म्हणत भार्गवी आत गेली , सगळं घर आवरुन झाल ,
अंजली च्या जन्माने काही अंशी त्यांच्या जीवनातील लतिकाची कमी भरुन निघाली होती .
संध्याकाळी अवी लवकर घरी परतला ,
बाहेरुनच अंजलीला आवाज देत तो आत आला , अंजली सोफ्यावर बसून टिव्हीकडे बघत बसलेली , तिने काहीच हालचाल न केल्यामुळे , अवी मनातच हसला ,
आणी मोठ्यांने म्हणाला , अरे बापरे ! एका मुलीचा राग नाकावर जाऊन बसला वाटत ! अरे नाही हा गालावर ऊतरला ! अरे अरे हा तर पळाला ,,,,
हे बघ अवी मी खुप रागात आहे , अरे बापरे ! माझी आज्जे , साॅरी ना ! कान पकडून अवी तिच्या जवळ बसला ,
तू माझा फोन घेतला नाही , आणी मला फोन केला नाही परत , आणी आज मला न भेटताच आॅफीस मधे गेलास ! मला नाही तुझ्याशी बोलायच अवी , जा तिकडे !
अरे बापरे फारच रागात आल आहे लेकरु ,
चल साॅरी ना पिला ,
उ हुँ मी नाही !
बघ बर मी गुदगुल्या करणार तुला मग ,
नक्को ना अवी !
ए काय गं अंजली , ही काय तर्हा , बापाला नावाने हाक मारते , काय रे तू पण काहीच म्हणत नाहीयेस तिला , अरे कारे बोलते तुझ्या सोबत ,
अगं काय होते मग , मला आवडतं ती तशी बोललेली ,
रागवू नकोस तिला , तू नाही का मला अवी म्हणतेस ,
बापरे मग काय म्हणू , मुलगा आहेस तू माझा ,
हो ना , मग ही माझ्झी आज्जी आहे , माझी मैत्रिण आहे ,
तशी अंजली त्याचा गालावर पापा घेत गळ्यात पडली ,
काय बाबा ! बापलेकीच प्रेम आहे , म्हणून सुशीला बाई कौतुकाने त्यांना बघायला लागल्या , अंजलीचा राग कुठल्या कुठे पळाला होता , बेटा मी मिटींग मधे व्यस्त होतो म्हणून फोन नाही केला , तसेही लवकरच यायच होत घरी , म्हणून फोन नाही केला परत , बरं पप्पा ठिक आहे , कळल मला !
एवढा वेळ बापलेकीच कौतुक भार्गवी लांबूनच बघत होती ,
ती पाण्याचा ग्लास घेऊन आली तिथे , झाल का सगळ ठिक , हो हो झाल ना ! माझ लेकरु फारच समजदार आहे ,
जास्त वेळ रागात नाही राहू शकत , बरं मग हातपाय धुवून तयार व्हा , चहा बनवते आणि मग खरेदीला जावू आपण ,
हो ठिक आहे म्हणत , अवी तयार व्हायला आत गेला ,
थोड्या वेळातच तिघेही खरेदीला बाहेर गेलेत ,
ऊशीरा बाहेर जेऊनच ते घरी परतले ,
एव्हाना रमाबाई जेवण करुन टिव्ही बघत बसल्या होत्या , आले का ? हो आई ! जेवल्याना तुम्ही ? हो हो जेवले की ,
अगं तुला सांगायलाच विसरले मी ,
सुशीलाला बोलावले ऊद्या मी , एक क्षण थांबुन त्यांच्याकडे बघुन , ठिक आहे ना ! बरं झाल तुम्ही आधीच त्यांना फोन केला ते , मी विसरलेच होते त्यांना फोन करायला ,
चला झोपा मग आता , सकाळी लवकर ऊठाव लागेल ,
हो हो झोपते मी , अंजली तू येते का माझ्याकडे झोपायला ,
हो आजी येते मी म्हणत अंजली आजीच्या बेडरुम मधे गेली , मी पण थकलो गं भार्गवी , झोपतो मी पण , आणि तू पण ये लवकर झोपायला , हो हो आलेच , हे थोड आवरते आणि येते , तो गेल्यावर भार्गवी ने भराभर सगळा हाॅल पुन्हा एकदा नीटनेटका केला , सजावटीसाठी आणलेले बॅनर आणि फुलांच्या माळा हव्या तिथे अडकवून ठेवल्या , फुलांची आरास ही करुन ठेवली , काही फुगे फुगवून हाॅलमधे सोडून दिलेत , सकाळी ऊठल्या ऊठल्या अंजलीला हे दिसायला हवं , मनातल्या मनात हसत भार्गवी म्हणाली .
सकाळी भार्गवी लवकरच ऊठली बघते तर काय अंजली आज्जी सोबत अंगणात फेर्या मारत होती , अरे माझ्या आधी ऊठली तू तर अंजली , happy birthday पिल्लू , तिला जवळ घेत तिचा पापा घेतला तिने , भार्गवीच्या गळ्यात पडत
अंजलीने पण तिला मिठी मारली , आज माझ लेकरु पुर्ण पाच वर्षाच झाल आहे , हो ग पाहता पाहता पाच वर्ष कसे गेलेत कळले नाही , अंजली खुप आनंद घेऊन आपल्या जीवनात आली आहे , रमाबाई म्हणाल्या ,
बर पण आता दुसर्या अपत्याचा विचार करा , हिला पण सोबत हवीच ना , भाऊ किंवा बहीण कुणीतरी हवच , तशी लाजून भार्गवी म्हणाली , बघू नंतर , चला आत , तयारी करुया आणि अंजलीकडे वळून म्हणाली , आवडली का सजावट ?
हो मम्मी खुप छान केलीस , ती सजावट बघत म्हणाली ,
अरे बाबा ! काहो आई ही अंजली बघा ना , तिच्या वयाच्या मानाने फारच मोठी वाटते मला , किती गंभीरपणे म्हणतेय , छान सजावट , हो गं खरेच ती खुपच समजदार मुलगी आहे , नाहीतर तिच्या वयाच्या मुलांना एवढे समजदार मी नाही बघीतलय ! आई पण हसून म्हणाल्या .
मग आत येऊन त्यांनी आंघोळी वगैरे करुन पुजेची तयारी केली , अवी थोडा ऊशीराच ऊठला , पण लगेच तयार होऊन बाहेर आला , साडे नऊला भटजी आले सगळे पुजेला बसलेत , पुजा होता होता सुशीला बाई आल्यात ,
अरे सुरु पण झाली पुजा , या या काकू अवी ने त्यांच स्वागत केलं ,
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा