आहे आमचा मुलगा स्वयंपाकी

Ahe Amcha Mulgaa Swampaki
स्वाती अग आईला फोन कर आज गुडी पाडवा आहे ,मी तर म्हणतो तू विडिओ कॉलच कर म्हणजे आई ही शुभेच्छा देईल त्यांना ....वसंता स्वातीला म्हणाला..

वसंता तू असे कर तूच तुझ्या सासूबाईला फोन करून बोलव म्हणावं या तुमच्या जाव्याच्या हातचा स्वयंपाक खायला...बघा कसा उत्तम स्वयंपाक करतो तुमचा जावई.. वसंताची आई त्याला आवर्जून म्हणाली..

आई आहो आईला हे पचनी नाही पडणार...स्वाती

अग पण आजकाल हे किती कॉमन आहे मुलाने स्वयंपाक करणे आता मोठी गोष्ट नाही राहिली ग समान काम करण्यात कसली आली लाज....सासूबाई स्वातीला सांगत होत्या

नाही आई ,अजून ही आमच्या घरी पुरुषाने घर काम करणे त्यात स्वयंपाक करणे तर सोडा स्वयंपाक घरात येणे ही आवडत नाही...हे साम्राज्य फक्त स्त्रियांचेच असा समज आहे...म्हणून आईला कधीच नाही आवडणार आपल्या जावयाने स्वयंपाक करणे...आणि त्यातलीत्यात जावई बापूने त्यांच्या हाताने काही करून सासूबाईला जेवायला वाढणे..तिच्या लेखी पाप म्हणते ती...तिला माहीत नाहीच आहे अजून की हे उत्तम स्वयंपाकी आहेत ते नाहीतर मला कितीदा सुनावले असते ह्याबाबत... स्वाती सासूबाईला सांगत होती



अग पण हे कोणत्या जमान्याचे विचार आहेत ग स्वाती, तुला तरी पटतात का हे... मी कधी ही भेदभाव केला नाही मुला मुली मध्ये की हे काम मुलीचे, हे काम मुलाचे.. हे मुलीनेच करायचे हे मुलानेच करायचे, आणि म्हणूनच तुझ्या नवऱ्याला स्वयंपाकाची आवड लागली आणि मी ही कधी अडवले नाही त्याला, आणि नीता ला तिचा व्यवसाय करण्यापासून ही थांबवले नाही...bike रेसर आहे आज ती पण तिला limts मध्ये कधीच बांधून ठेवले नाही बरं... पण असतात अजून ही अश्या विचार सरणीतील कुटुंब म्हणून तुझ्या आईला मी दोष देणार नाही मी...जेव्हा त्यांचा नजरीया बदलेल तेव्हा त्यांना ही ह्यात काही वावगे वाटणार नाही नक्कीच... सासुबाई स्वातीला सांगत होत्या


बरं चल आईला फोन लाव, नाही मी तर म्हणतो तू विडिओ कॉल लाव बघू दे त्यांना ही इथला नजारा जरा....वसंत


नको रे बाबा,तिला स्वयंपाक घरातील हा नजारा दिसला तर तिला चक्करच येईल ..स्वाती

अग लाव ग, काही होणार नाही...सासूबाई

ok, आई मी लावतेच विडिओ कॉल, होऊदे पोल खोल आपल्या घराण्याची...स्वाती

स्वाती आईला कॉल लावते

आई, कशी आहेस, happy गुडी पाडवा...तुला आणि आपल्या घरातील सर्वांना खूप खूप शुभेच्छा आमच्या परिवाराकडून.. "..स्वाती

काय ग हे स्वाती,हॅपी गुडी पाडवा काय हे, छान मराठीत शुभेच्छा देत जा , बरं आमच्या कडून ही तुमच्या सर्व परिवाराला खूप खूप शुभेच्छा सांग, आणि जावई कुठे आहेत, तुझ्या आई कुठे आहेत जरा त्यांच्या कडे ही फोन फिरव...स्वातीची आई

हो अग सगळे इथेच तर आहेत, हम्म बोल आईसोबत ...स्वाती

ताई तुम्हाला गुडी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा... स्वातीची आई

हो हो तुम्हाला ही अनेक अनेक शुभेच्छा स्वातीची आई...सासूबाई

मग आज काय खास असते तुमच्या कडे, कारण सगळेच काही पुरणपोळी करत नाहीत म्हणून विचारले....स्वातीची आई



अहो आज ही मंडळी जे स्वयंपाक करतील ते आम्ही सगळ्या बायका निमूटपणे खाऊ...सासूबाई

म्हणजे कोण मंडळी आहे स्वयंपाक करणारी ..आई

अहो आमच्या घरी आजच्या दिवशी सगळे पुरुष लोक स्वयंपाक करतात आणि आम्ही बायका त्यांनी जे तयार केले ते निमूटपणे खातो, हो पण आमच्या घरचे माणसे उत्तम स्वयंपाकी आहेत ,आम्ही बायका इतका उत्तम स्वयंपाक करत नाहीत इतका उत्तम स्वयंपाक हे लोक करतात बरं.... हे पहा जरा विडिओ फिरवते त्यांच्या कडे... सासूबाई

अहो हे काय, जावई, त्यांचे वडील आणि काका हे सगळे स्वयंपाक करत आहेत, हे काय नवीन बघते मी, स्वातीला सांगायचे ना हे ती सहज करून मोकळी झाली असती ताई..ह्या बायकांच्या कामात पुरुषांनी काम करणे शोभत नाही...आई

आहो ताई आमच्या घरची ही आजची पहिली पिढी नाही ही या आधी माझ्या सासर्यांनी ही केला आहे हो स्वयंपाक, आणि मग त्यांच्या मुळे त्यांच्या मुलांना ही सवय जडली, आणि ह्यांचे पाहून तुमचा जावई ही शिकला... सासूबाई

पण ताई हे आमच्याकडे अजिबात मान्य नाही...आम्हीच बायका हे करत असतो..आणि त्यांना वाढत ही असतो..यांना असे थोडे आवडायचे लुडबुड करायला पण एकदा सासरे ओरडले तेव्हा पासून त्यांनी कधीच मला मदत केलीं नाही हो पण यांना कधी कधी लहर येतेच पण आता सासूबाई मुळे नाही करत ते मदत ,मूळ म्हणजे मलाच नाही आवडत हे प्रकार...ज्याने त्याने आपली कामे करावी....आई

आई तू आता ही सवय करून घे, कारण तुझ्या जावयाला स्वयंपाक करायची खूप आवड आहे...तुला तर त्यांनी निमंत्रण ही दिलंय जेवायला यायचे ते ही त्यांच्या हातचे.. स्वाती

अग स्वाती हे शोभते का सांग बरं... आई

आई आमच्या घरी हेच शोभते...आणि म्हणूनच मी त्यांना पसंत केले होते ,कारण त्यांचाच एक bio data वेगळा होता ज्यात लिहिले होते मुलगा उत्तम स्वयंपाकी आहे.. आणि तू विचारत होतीस काय बघितलेस तर हे बघितले होते, मी जॉब करते आणि हा त्यांचा side जॉब आहे...स्वाती



अग बाबांना हे कळल्यावर काय वाटेल..आई

अग आई बाबांना हे आधीच माहीत होते,आणि हो बाबांना ही त्याच्या हातचे जेवण खूप आवडते बरं... अगदी म्हणतात तुझ्या आईच्या ही जेवणाला अशीच चव आहे...स्वाती

अग तू रेवाला नको सांगूस हे प्रकरण, नाहीतर ती तुझ्या दादाला ही लावेल नादाला...आई

आई रेवाला हे माहीत आहे आणि दादाला ही माहीत आहे, पण त्याला हे प्रकरण मान्य आहे..आणि तो ही थोडा थोडा स्वयंपाक शिकत आहे...आता वहिनी बाळांतपणाला
माहेरी जात आहे ,आणि तुझ्यावर सगळा भार नको म्हणून बाबा आणि दादा ही स्वयंपाक शिकत आहेत...तू जरा आराम करावा म्हणून..

स्वाती तसं इतकेच हे प्रकरण वाईट नाही असे हळूहळू वाटत आहे मला पण...सांग जावई बापूला की मी स्वीकारले आहे त्यांचे निमंत्रण ते...?

©®अनुराधा आंधळे पालवे