स्वाभिमानी भाग 23 अंतिम

Swabhimani
स्वाभिमानी भाग 23 अंतिम

सासूबाईंचा उगाच अपमान नको म्हणून सुप्रिया सगळ्यांना पकडून घरात आणते आणि स्वरा आणि विवेक ला ही आत घेऊन येते...त्यांना चेहऱ्यावर हसू आणयायला सांगते...


सगळे पुन्हा हॉल मध्ये येतात, पाहुण्यांची नजर नवीन सुनेकडे वळते तोच सगळ्या जमलेल्या तिला पाहून आश्चर्य करतात...


अरे ही तर मोठी नावाजलेली डॉक्टर सुप्रिया आहे ,हिच्या ट्रीटमेंट मी घेत होते खूप छान ट्रेटमिंट देते ती, खूप साधी पण खूप हुशार डॉक्टर आहे ती, मी तर माझ्या बऱ्याच मैत्रिणींना ही हिचे नाव सुचवले होते, आणि एक डॉक्टर असली तरी खूप छान counselling ही करते, माझ्या प्रियाला हिचाच गुण आला आहे ,ती किती डिस्प्रेस झाली होती, आता ती फक्त सुप्रिया ,सुप्रिया करत असते, तिचे style स्टेटमेंट फोल्लोव करत असते..तिचे ड्रेस,तिच्या साड्या, तिचे लांब केस ,वागण्याची बोलण्याची सगळी पद्धत ती समजून त्याचे अनुकरण करत असते..मला ही सुप्रिया खूप भावली मनाला, ती जशी आहे तशी किती तरी सुंदर दिसते ,मन तर खूप सुंदर आहे हिचे...

सासूबाईंच्या सगळ्या मैत्रिणी खूप भरभरून सुप्रिया ची स्तुती करत होत्या, सगळ्यांना सुप्रिया माहीत होती मग मला कधी का नाही भेटली , मला तिच्याबद्दल कशी माहिती नव्हती...माझी सून हेच किती तरी मोठे स्टेटस आहे ,तिचे नाव तर सगळ्यांना माहीत आहे..आणि मी उगाच तिला बदलण्याचा अट्टहास करत होते, विवेक बरोबर बोलत होता, स्वरा ही तिची किती काळजी करते, तिचे ही मन सुप्रिया ने जिंकले होतेच, नाहीतर ती ही कमी हट्टी नव्हती...

सुप्रिया... आई सॉरी काही चुकले असेल तर, मी पुन्हा नेक्स्ट पार्टीला तुम्ही म्हणाल तसा ड्रेस घालून तयार होऊन येईल..

तो... असू दे सुप्रिया ,आता झाला तो अट्टहास पुरे झाला तू जशी आहेस तशीच रहा, मी ,बाबा,स्वरा ही आहोत तुझ्या पाठीशी...

ती...नाही रे ,आई माझ्या चांगल्यासाठी म्हणत असतील हे समजायला हवे, बघ ना ह्या सगळ्या जणी किती भारी दिसत आहेत

तो...मला तर तूच भारी दिसते सगळ्यात ,आणि माझी सिस्टर तर कमाल करून गेली आज

सासूबाई...सुप्रिया मी उगाच स्टेटस स्टेटस घेऊन मिरते पण खरे स्टेटस तर तूच आहेस आमच्या घरातले, हे आज जाणवले आता तर मीच म्हणते तू म्हणशील तसे मी राहण्याचा प्रयत्न करेन नेक्स्ट पार्टीला..

ती आईला मिठी मारते, आई you are the best, तुम्ही अश्याच रहा, जरा ही बदलू नका...मला तर तुमचा हेवा वाटतो ,आज ही तुम्ही स्वतःला किती छान ठेवले आहे...तुम्ही तुमचा प्रांत सांभाळा, मी माझा प्रांत सांभाळेल.. मी बदलेल थोडं तुमच्यासाठी थोडे तुम्ही बदलला ..

त्या दोघी खुश होत्या तितक्यात मागून स्वरा येऊन दोघींना मिठी मारते, दादाला ही बोलवते आणि बाबाला ही मिठी मारते आणि म्हणते तुम्हीच आमचे खरे स्टेटस आहात आई बाबा,दादा वहिनी...

इकडे विवेक आणि सुप्रिया ची ओळख करून देण्यात आई बाबा मग्न असतात ,आज ते ही आमची सून आहे सांगताना खूप अभिमान वाटत होता...

©®अनुराधा आंधळे पालवे..

End...??


🎭 Series Post

View all