Login

स्वाभिमानी भाग 22

Swabhimani
स्वाभिमानी भाग 22

सुप्रिया ने त्याने आणलेली पैठणी घातलेली असते ,तर स्वरा ने आज चक्क साडी घातली हे पाहून खूप खुश होतो, दोघी ही वेगळ्याच आणि उठून दिसतात... सुप्रिया चे मोकळे सळसळणारे केस, पाहून तर अजूनच मन भरून पहातो...


चला मॅडम, आणि छोट्या मॅडम सगळे वाट बघत आहेत, नुसती वाट नाही तर आतुरतेने वाट बघत आहेत, आता सगळ्यांची वाट लागणार आहे हे रूपवान चेहेरे पाहून, एक नणंद आणि एक वहिनी आणि बाकी सगळे फिके...तो

दोघी येताच सगळे त्यांच्याकडे बघतच रहातात..


सासूबाई तर रागातच बघत असतात... सासरे त्यांचे तर डोळ्यांचे पारणे फिटते, लेक आणि सुनेला पाहून.. ह्या घरात कोणी ही अशी परंपरा निभावेल आणि पार्टी मध्ये साडी घालून येतील असे कधीच वाटले नव्हते..

सासूबाई ...विवेक तू तिला सांगितले नव्हते का हे काय घालून आली आहे ती ,तिला काही स्टेटस वैगरे याचे भान नाही का, थोडे तरी जबाबदारीने वागायला काय हरकत आहे,आता ती ह्या घरची सून आहे...तू ही तेच केलेस

तो... खिशात हात घालून ,आईला सरळ उत्तर देत होता,त्याला आता हे स्टेटस ह्या गोष्टी फक्त दिखावा आणि तकलादू पणा वाटत होता पण तो कधी बोलला नव्हता, रादर तो ह्या फांदात न पडणे बरे म्हणून बाहेर कुठे ही निघून जात आणि सगळी आवरा आवर झाल्यावर, स्टेटस वाले पाहुणे निघून गेल्यावर परत येत असत आणि नाहीतर बाहेर मुक्काम करत...पण आता तसे होने नाही.. कारण आता सुप्रिया साठी हा लवा जमा बोलवला होता..म्हणून त्यांची उपस्थिती महत्वाची होती...दोघे ही हवे होते...
मोठा सुस्कारा सोडत तो म्हणालाच शेवटी, " आई तुम्हाला जे स्टेटस वाटत आहे ,ते ऑलरेडी ते माझ्या बायकोने कमावलेले आहे, तिचे नाव लौकिक हात पेक्षा किती तरी मोठे आहे, तिला हे लोक ओळखत नसतील ही भले पण तिला इतर खूप लोक चांगली व्यक्ती म्हणून ओळखतात, तिचे स्टेटस ह्या पेक्षा लाख पटीने मोठे आहे पण ती मिरवण्यात तिला कुठला ही रस नाही ,त्यासाठी कुठले ही महागडे कपडे घालून स्वतःला दाखवून पुढे पुढे करण्याची तिला मुळीच गरज नाही, ती साधेपणात मोठेपणा मानते त्यातच तिला आंनद मिळतो, उगाच तुला आवडेल म्हणून ती तिची आवड मागे टाकणार नाही...मी तिला ती जशी आहे तशी स्वीकारले आहे मग इतरांचा प्रश्नच येत नाही.. खरे तर माझं स्टेटस तिच्याच मुळे आहे...आणि मला खूप अभिमान आहे तिचा...आवडले तर ओळख करून दे नाहीतर हे आम्ही दोघे ही बाहेर पडतो तुझ्या ह्या पार्टीतून...

तो सुप्रिया चा हात धरून निघणार इतक्यात स्वरा ही म्हणते ,दादा मला ही इथे थांबायचे नाही, मी ही कंटाळले ह्या स्टेटस ला , बाबा तुम्ही ही का उगाच थांबत आहात तुम्ही पण चला आमच्या सोबत आपण बाहेरच जेवू सगळे...