स्वाभिमानी भाग 21
स्वरा...वहिनी तू आधी तुझी एखादी साडी नेस,
ती...अग आता वेळ आहे का स्वरा ,बरी आहे मी
स्वरा...कसली बरी आहेस तू ,आधी हे बदल
ती..नको अग आई रागावतील उगाच
स्वरा..बदल हे ,मला काही एक ऐकायचे नाही
स्वरा खूप हट्टाला पेटली होती,
स्वराने तिला ते कपडे बदलायला लावलेच
आता तिने तिच्या कपाटातून नवी कोरी पैठणी काढली जी तिने तिच्या वहिनीला गिफ्ट म्हणून आणली होती ,जी आज खास ह्या निमित्ताने देणार होती..
सुप्रिया... स्वरा ही काय, पैठणी
स्वरा..हो तुझं गिफ्ट, तुला हीच घालायची आहे आज आत्ता लगेच
सुप्रिया.. दादा
स्वरा...मी आणि त्यानेच ही घेतली होती ,त्याला खूप आवडला होता हा रंग
सुप्रिया नाही हो म्हणत साडी नसते, आणि हेअर style बदलते आणि साधे गजरे लावून पुन्हा तयार होते..
स्वरा आता वहिनीला मूळ आणि तिला शोभेल अश्या रुपात पाहून खूप खुश होते.. लगेच तिची नजर ही काढते ,आणि म्हणते तुझी आई अशीच नजर काढत असेल ना वहिनी, पण आमच्या कडे नाही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवला जात, पण त्यासाठी मुळात माणूस नजर लागण्यासारखा असलायला हवा ना हे मी मानते, तसे आमच्या घरात बाबा, दादा, आणि मी आहोत बर ,असे म्हणून वहिनीच्या गळ्यात पडते.
सुप्रिया.. स्वरा तू ही खूप गुणाची आहेस ,चल तुला ही नजर नको लागायला कोणाची ,मी तुझी नजर काढते.
ती.. चल ,चल आता नको मी झोपायला येईल तेव्हा काढ कारण तेव्हा सगळ्यांची खरी नजर लागलेली असेल मला ,का विचार मला.
सुप्रिया... का बरं सांग
ती... अग तुला तयार करून दिल्याबद्दल मला शाबासकी मिळेल आणि माझे कौतूक ही होईल ना ,ते ही बाब आणि दादाच करतील..
दोघी आता हॉल मध्ये यण्यासाठी निघतात...दादा तिकडून येतो आणि समोर आलेल्या दोघींकडे बघतच रहातो.. तो थकीतच होऊन जातो..
दादाला आईने सांगितलेले केले नाही ह्यामुळे राग येईल का सुप्रियाचा की आवडले त्याला हा लुक तिचा..
क्रमशः????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा