स्वाभिमानी भाग 20

Swabhimani
स्वाभिमानी भाग 20

सुप्रिया... तुम्ही अजून ही केस कट केले नाहीत हे कसे काय ,डायरेक्ट स्टाईल करून मोकळ्या झालात..

ड्रेसर...मॅडम तुमचे केस कट करण्याची इच्छाच होत नाही ,मग बराच वेळ थांबून राहिले ,पण कात्री ही चालू शकले नाही हे पाहून तुमचे आहो आत आले ,आणि तेच म्हणाले ,तिला मोठे केस छान दिसतात ,तेव्हा फक्त केस छोटे दिसतील अशी स्टाईल करा...म्हणून मी कर्ल्स केले आहेत, ज्यात तुमचे केस छोटे दिसतील...

सुप्रियाचे बरेच टेन्शन कमी झाले होते केस कापण्याची वेळ आली नव्हती, तिचे लांब केस जसे आहेत तसेच अबाधीत होते, नवऱ्याने वेळ सांभाळून घेतली होती..

ती बाहेर आली होती ,तो तिची वाट बघत होता, त्याच्या चेहऱ्यावर आंनद तर होताच सोबत तिच्या ही चेहऱ्यावर आंनद दिसत होता, तिला ही त्याचे मन राखले म्हणून छान वाटत होते ,आणि तिच्या मनात मुळात तिला ही केस कट करणे हा विचार पचनी पडत नव्हता...फक्त माझ्यासाठी ती तयार झाली होती हे दिसत होते..

ते दोघे मनोमन हसले, तिचे रूप अजूनच खुलले होते, त्याने साथ निभावली यात तिला अजूनच आंनद वाटत होता..त्याने तिचा हात पकडून गाडीत बसवले..

तो...खूपच सुंदर दिसतेस तू..

ते घरी येतात, तो गाडी लावून येईपर्यंत ती तशीच उभी असते, तिला नवीन अवतारात स्वतःला पहाणे जरा कठीण वाटत होते, स्वतः कॉम्फोर्टेबल नव्हती तर इतरांसमोर कशी अवघडल्यासारखे जायचे, त्यात ते सगळे नवखे..

स्वरा त्यांची वाट बघत होती, दादा वहिनी आले नाहीत म्हणून चिंता वाटत होती, तितक्यात तिला वहिनी समोरच दिसली, अगदी अवघडलेल्या अवस्थेत उभी होती..तिची दया यावी अशी..


स्वरा पळतच खाली आली

तिने वहिनीला हाताला धरून आत घेऊन गेली ते तिच्या रूम मध्ये आणि तिला तो अवतार बदलायला सांगितला, नको आता वेळ नाही ,तू तुला वाटेल का त्यात कॉम्फोर्ट ,नाही ना तर विचार सोड ह्याचा...वेळ नको घालवू.

क्रमशः???

🎭 Series Post

View all