स्वाभिमानी भाग 19

Swabhimani
स्वाभिमानी भाग 19

आता पैठणी नकोय ,आता फक्त वेस्टर्न लुक हवा आहे, त्याचीच तुला ईथुनपुढे सवय करून घ्यावी लागणार आहे असे आई म्हणाली ...विवेक

मला जमेल का हे सगळे ,सतत काही होतंय अशी अवस्था होईल माझी सगळ्यांच्या समोर, हसू होऊ नये म्हणजे झाले...सुप्रिया

नाही नाही होणार असे काही, खूप सोपं आहे, तू हिल्स घालणार नाहीस बाकी फ्लॅट्स तर तुला सवयीच्या आहेतच ग...तो

तू करशील माझ्यासाठी चॉईस तो वन पीस ,वा मस्त तुला काय माहीत हे...सुप्रिया

अग थोडा तर फॅशन सेन्स आहे मला बायको..तो

त्याला एक वन पीस आवडतो, आणि तोच तिला ही आवडतो, आणि तोच फायनल होतो, तो घेऊन ते बाहेर निघतात...

इकडे ती parlour मध्ये आली होती

तिला नको त्या गोष्टी करायला भाग पाडण्याची खरंच गरज आहे का, तिला सवय नसताना फक्त आपल्या स्टेटस साठी हे करणे कितपत योग्य आहे असा ही विचार तो करत येत असतो..आईचे हे नेहमीचे आहे, त्याला आम्ही सहन करून घेतले आहे पण सुप्रिया ला ही तेच का करण्यासाठी भाग पाडते, ती तर डॉक्टर आहे, तिची पदवी हेच मोठे स्टेटस आहे, तिने ही नाव कमावले आहे ,तिचे मोठे कर्तृत्व सिद्ध केले आहेच ना तिने ही? मग का ही दिखाऊपणा ची नाटकं..

तिला त्याचे मन दुखवायचे नव्हते, त्याला तिचे हे केस आवडत होते हे आज तिला त्याने सुचवले तरी मी हे फक्त स्टेटस आणि वेस्टर्न दिसावे असा का अट्टहास असावा..

स्वराचे ही शब्द आठवत ती एक एक पायरी चढत होती..तिला आता कळत होते सगळ्यांचे एकसोबत मन राखणे हे किती कठीण असते, एकावेळी एकाचेच मन राखावे ,नाहीतर अशी फजिती होते...आज खऱ्या अर्थाने पाहिले तर सासूचे मन राखणे हे फक्त त्यांचे स्टेटस सांभाळणे आहे ,आणि नवऱ्याची इच्छा पूर्ण करणे म्हणजे त्याचे मन राखणे आहे..त्यात सगळ्यात जास्त महत्वाचे म्हणजे स्वतःची काय इच्छा आहे हे लक्षात घ्यायला हवे, जर ती इच्छा आपल्या नवऱ्याशी जुळती असेल तर प्रथम तर नवऱ्याच्या मनासोबत जायला हवे, त्याची इच्छा राखणे उत्तम होईल ,तो सगळी बाजू सांभाळून ही घेईल..तसा तो साथ देणारा आहे ,मी जे काही करेन तो त्याच्याशी सहमत असेल हे नक्की..त्याने माझ्यावर सोडले आहे...

ती लगेच आत जाते, तिचे स्वागत केले जाते, तेथील ब्युटिशीयन येऊन तिला ठरलेल्या असिस्टंट कडे घेऊन जाते..

ती..मला सर्वात आधी मी सोबत आणलेला वन पीस घालायचा आहे मग तुम्ही माझा लुक change कराल..

ती अजून ही ठरवू शकत नव्हती ,आणि सरळ सांगु ही शकली नाही..की मला कट करायचा नाही...त्या असिस्टंट ने तिला सरळ मेकप करून दिला आणि हेअर सलून सेक्शन मध्ये घेऊन गेली ,आणि तिने तिचे केस छान स्टायलिश करून दिले ,थोडे कर्ल्स केले आणि मोठा ब्रोच लावून तिला तयार केले, तिने डोळे उघडले तरी अजून तिने केसांना कात्री लावल्याचा आवाज कसा आला नाही याची वाट बघत होती..

क्रमशः ????????


🎭 Series Post

View all