Login

स्वाभिमानी भाग 18

Swabhimani
स्वाभिमानी भाग 18

तेव्हा त्या दिवसांपासून दोघे एकमेकांना ओळखू लागले ,त्यांची भेट होत होती, भेटीचे रूपांतर प्रेमात झाले आणि प्रेमाचे रूपांतर लग्नातपर्यंत येऊन पोहचले..

इकडे त्याच्या घरच्यांनी होकार दिला तर तिच्या घरच्यांनी तिच्या प्रेमाखातर तिला होकार दिला..आणि लग्न झाले..ती मोठ्या सासरी आली

-------------------------

आज सासूबाईंनी पार्टी ठेवली होती, तिच्या येण्याची जणू बातमी शहरभर द्यायची होती, मोठया नावाजलेल्या बायका तिला बघायला येणार होत्या, त्यांना तिची ओळख करून द्यायची होती..त्यासाठी त्यांच्या घरच्या रीती प्रमाणे सासूबाईने तिला छान तयार होऊन यायला सांगितले तर होतेच पण ते मोठे केस ही कट करून यायला सांगितले होते...सुप्रियाचे बिलकुल मन नव्हते होत ते केस कापायचे...त्यात स्वरा ही खूप हट्टाला पेटली होती ,तू केस कापू नकोस वहिनी, नाहीतर मी बोलणार नाही ,आईचे ऐकू नकोस तू वहिनी ,दादा आणि मी तिला सपोर्ट करू आई समोर तुझी बाजू मांडू म्हणत ती ही ठाम होती, तू जशी आहेस तशीच सुंदर आहे ,तू नको बदल करू तुझ्यात..

ते दोघे आता त्या पार्टीसाठी आईने सांगितल्या प्रमाणे वन पीस घेण्यासाठी दुकानात गेले होते..

त्याने तिला भल्या मोठया दुकानात आणले होते

तिच्यासाठी खास वन पीस घ्यायचा हा आदेश होता...तिला हा लुक खूप छान दिसेल, साडी नेहमी नेहमी नकोय ,आता जरा वेस्टर्न दिसायला आणि कॅरी करायला हवे तीने, साधी साधी छान दिसत असशील पण ते तिच्या माहेरी, इथे जरा हा लुक हवा आहे .. सासूबाई म्हणाल्या आई विवेक च्या मनात नसताना ही त्याने होकार दिला?

सासूबाईंचा फोन होता म्हणजे नक्कीच काही तरी सांगितले असणार हो ना विवेक...सुप्रिया विचारत होती

हो अग आई म्हणाली तिला वन पीस घेऊन ये ,आणि येताना parlour मधूनच तो घालून ये घरी,सगळा मेक अप त्यावर ,त्यानुसार असू दे म्हणत होती...विवेक

आता रे कसं होणार हे सगळं अचानक..मला तर ह्याची सवय नाही, मी तर पैठणी आणली होती आईची....सुप्रिया