स्वाभिमानी भाग 17
आज तो खूप वेळ सुप्रियाची बाहेर बसून वाट बघत होता ,स्वरा आत गेली होती ,सुप्रिया तिला ट्रीटमेंट देत होती, सुप्रिया खूप काळजीपूर्वक स्वराला हाताळत होती, मन लावून सगळे करत होती इतर रुग्णांना करते तसेच. तरी स्वराला खूप बरे वाटत होते.. किती चांगली मुलगी आहे ही सुप्रिया, दादाला चॉईस आहे मात्र मुलींची, आणि सुप्रिया लाखात एक आहे...मनाने ही आणि दिसायला ही सुंदरच आहे ,माणुसकी आहे...दादाच्या life चे सोने होईल अशी मुलगी त्याच्या नशिबात आली तर..
हळूहळू ट्रेटमिंट पूर्ण झाली, सुप्रिया आणि स्वरा जणू आता खास मैत्रिणी झाल्या होत्या ,स्वरा वाट बघत होती ती आपल्याला पुन्हा कधी बोलवते त्याची...
ती काहीच बोलत नव्हती ,पण गोळ्या आणि काही क्रीम लिहून देण्यात मग्न होती, ती पावती स्वराचा हातात दिली.. आणि एक स्मित करत ,ये आता पुढच्या व्हिजिट ला..असे म्हणताच स्वरा ने तिला मिठी मारली..
ती... अग हे काय, मिठी का मारलीस
स्वरा...तुला पुन्हा भेटण्याची तू संधी दिलीस म्हणून
ती... कमाल आहे ,लोक नको म्हणतात पुन्हा भेटायला आणि तू आंनद व्यक्त करतेस
स्वरा...एक विचारायचे होते
ती... हो विचार ना अगदी
स्वरा...तुला कोणी आवडते का
ती...हा कसला प्रश्न ,तसे ही तू लहान आहेस तुला हे प्रश्न पडायला नकोत स्वरा
स्वरा...चल मग मी येते..येऊ
ती.. हो, भेटू परत, तुला जर मला भेटायचे असेल तर माझा हा नंबर आहे,
ती स्वराला आपला नंबर देते आणि तिला सोडवायला बाहेर येते, आणि आजूबाजूला तिची नजर फिरवते,पण तिला तो दिसत नाही..
स्वरा तिची नजर काय ,आणि कोणाला शोधते हे टिपत असते...
स्वरा...आज दादा आला नाही
ती...का ,का नाही आला दादा, तुला सोबत यायला हवे होते त्याने
स्वरा... त्याला सांगेन मी ,पुढच्या वेळी
इतक्यात दादा समोरून येत असतो, त्याला पहातच सुप्रिया खुश होते
स्वरा...दादा कोणी तरी तुला म्हणाले की मला एकटीला सोडून कुठे जात जाऊ नकोस, माझ्या सोबत येत जायला हवेस तू
सुप्रिया... हे काय स्वरा, not good
ती... तूच तर म्हणाली होतीस ना ,दादाने माझ्यासोबत यायला हवे ,तेच सांगितले मी ,तुझा निरोप
तो... हो का, मॅडम ,खूप बोलतेस तू.
ती... दादा चल पुढची तारीख मिळाली आहे तुला, म्हणजे मला
सुप्रिया... आणि काळजी घे, वेळेवर औषध गे
स्वरा...yes dear,
ती विवेक कडे बघत होती तो लांब जात असताना, तो जात असताना का इतके वाईट वाटत होते ,तो आला नसताना का त्याला नजर शोधत होती, माहीत नाही
त्याने मागे वळून पाहिले तर ती त्याच्या कडे।बघत होती ,हा इशारा त्याला समजला होता की तिला ही आपल्या बद्दल काही वाटते,
तिने हाताने इशारा करून सांगितले,फोन नो दिला आहे,पण त्याला काही कळण्याच्या आत स्वरा म्हणाली, अरे तिने तुला द्यायला फोन नंबर दिला आहे...तू आता फक्त समोर बघ
------------------------
क्रमशः???????
क्रमशः???????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा