Login

स्वाभिमानी भाग 16

Swabhimani
स्वाभिमानी भाग 16


तो..खरंच का ??

ती... हो,पण सकाळी लवकर येऊन लाईन लावावी लागेल तुला

तो...नको आपला हा 100 नंबर लकी आहे ,तोच बरा
ती.. येतांना जेवणाचा डब्बा घेऊन येऊ आपण आणि इथेच जेवू,( ती हसून खिल्ली उडवत )

तो...त्यापेक्षा आपणच तिची duty संपल्यावर तिघे जेवायला बाहेर जाऊ, म्हणजे अजून मज्जा येईल

ती... तू वेडा आहेस ,तुमच्या दोघात मी कश्याला हवी आहे, तू असे कर तूच तिला घेऊन बाहेर जा, ओळख होईल आणि तिला फोन नंबर माग

तो... मी डायरेक्ट प्रपोज करू का??

ती...कसा रे वेडा तू असा दादा, असे वागतात का कुठे, मी गम्मत करते तुझी..

तो.. म्हणजे ??

ती...जेवण वैगेरे काही नाही,तू त्या दिवशी अजून मन मोकळेपणाने बोल तिच्याशी.. मुली सध्या असतात, त्या पटकन नाही बोलत्या होत..

तो...म्हणजे हळूहळू तिच्या मनात अनोळखी पासून ओळखीचा कोणीतरी होत जाऊ का मी..

ती...हो हेच प्रोपर राहील..ती खूप वेगळी मुलगी आहे ,तिला हे असे काही नाही पटणार इतक्यात..

तो... खूप lengthy प्रकरण होईल हे ग..

ती... म्हणजे तुला काय फास्ट फूड वाटले का हे, केली फरमहिश् की आले समोर

तो दिवस उजेडला, ते दोघे ही आले होते...आज रुग्ण ही कमीच होते ,त्यांचा नंबर सहज लागला होता...आज स्वरा जरा रुळली होती, अहंम भाव, गर्व, दवाखण्याबद्दल राग नव्हता, फक्त आज सुप्रियाला भेटण्याची त्याची जशी उत्सुकता होती तशी तिची ही होती...दादाची सेटिंग लावायची होती..