स्वाभिमानी भाग 15

Swabhimani
स्वाभिमानी भाग 15

विवेक तिला हातवारे करून सांगत होता ,मी हिचा दादा आहे, ही माझी बहिण आहे ,म्हणजे त्याला काय बोलायचे ते सुप्रिया समजून गेली होती..

म्हणजे हा जसा सरांचा मुलगा आहे ,तशी ही सरांची मुलगी आहे तर...सुप्रिया ने समजायचे ते समजले.. आणि हसली


सुप्रिया... ओ!! तर तुम्ही आमच्या सरांच्या कन्या आहात तर, सो स्वीट, किती तुम्ही सरांसारख्या दिसतात अगदी, तुमचे गुण आणि संस्कार किती चांगले आहेत की तुम्ही तुमची ओळख लपवली आणि सामान्य रुग्णांच्या सोबत लाईन मध्ये बसून नंबर लावला तुम्ही...खूप कौतूक तुमचे...या मी तुम्हाला चेक करते...

सुप्रिया चे वागणे बघून खुद तापट रागीट, स्वरा ही तिच्या सानिध्यात आणि चांगल्या गोड वागण्यापुढे फिकी पडली ,आणि शांत झाली...तिला सुप्रिया खूप आवडली...तिने सुप्रियाची ही छान स्तुती केली...

विवेकला ही सुप्रियाचे स्वरासोबत चे वागणे पाहून खूप बरे वाटले, तेव्हा पहिल्यांदा तिच्या रूपाचा दिवाना झाला होताच तो पण आज तिच्या स्वभावाचा ही दिवाना झाला होता तो...त्याला सुप्रिया खूप आवडली होती...बाबांची निवड खरंच खूप चांगली आहे...माझ्या घरच्यांना अशी सून हवी आहे...जी तिच्या स्वभावाने त्यांचे मन जिंकून घेईल..

तो...स्वरा काय वाटले तुला तिच्या बद्दल

स्वरा..कोणाबद्दल काय वाटले दादा

तो.. अग त्या डॉक्टर बद्दल ग

ती..कोण डॉक्टर दादा

तो.. (तिच्या डोक्यात टपली मारत..) ती स्किन वाली

ती...ओ ती जिने तुझे हार्ट चोरले ती...ती का

तो... समजले ना तुला ती म्हणजे कोण म्हणतोय मी

ती.... हम्मम, समजलं मला, ती ती,ती

तो.. हो हो ती ती

ती... भारी आहे ,छान ट्रीटमेंट देते ती, तुला ही छान ट्रीटमेंट देईल दादा ती आयुष्यभर

तो... नक्की ना ,म्हणजे तुला आवडली तर ती

ती... हो ,कायमच मी हिच्या कडूनच स्किन ट्रीटमेंट घेईन म्हणते मी

तो... मूर्ख, मी वेगळा विचार करतोय यार ,तू समजून घे ना जरा ह्या दादाच्या भावना

ती... हम्म, कळल्या मला ,पण ह्या भावना तिला कळायला हव्यात ना

तो...तेच तर तिच्या पर्यंत तर पोहचत नाहीत ना

ती...पोहचले नक्की, तिने मला पुढील तारीख दिली आहे ट्रीटमेंट ची ,तेव्हा पोहचवा


क्रमशः ..????

🎭 Series Post

View all