Login

स्वाभिमानी भाग 14

Swabhimani
स्वाभिमानी भाग 14

चिल चिल ,किती उगाच जिथे तिथे आपल्या रागाचा डोंब मिळवायचा, हे आपले हॉस्पिटल आहे, आणि त्याचे मालक आपण नाही आपले बाबा आहेत, हे लक्षात ठेव.. या उलट तूच कोणाला रागवण्याची संधी देता कामा नये..सगळे इथे आपला वेळ वाया घालून इलाजासाठी आले आहेत, इथे प्रत्येक जण किती वेळचा आपली संधी येईल याची वाट बघत उभा आहे.. आणि त्यांना काही घेणे नाही तू मालक आहेस की इतर कोणी...इथे रूल्स पाळतात सगळे ,किती ही मोठे लोक असो..तसा हा इथला नियम आहे, बाबांनी तो लावला आहे...सो तू थंड घे माझे बाई...


स्वरा...हे काय बाई,मी बाई वैगरे काही नाही ,सरळ स्वरा म्हण नाहीतर बेब म्हण..हे चिप बाई शब्द वापरू नकोस माझ्यासाठी...

तो...ok ,बाई

ती... तू दादा इथे आहेस नाहीतर चांगले बदडले असते तुला

स्वरा शांत बसते,सोबत विवेक ही असतो ,गप्पा करत वेळ जातो आणि आतून सुप्रिया चा आवाज येतो, नेक्स्ट पेशन्ट कोण आहेत या आत लवकर... आणि इतर पेशंट यांना उद्या बोलवा... आज 100 पूर्ण झाले आहेत..

101 नंबर स्वराचा असतो..आणि इतक्या वेळ वाट पाहून सुप्रिया उद्या यायला सांगते तेव्हा स्वरा अजूनच चिडते...

आता खरा खटका उडणार...

आता शांत बसलेली स्वरा अजूनच भडकते

ती सरळ सुप्रियाच्या केबिन मध्ये घुसते

तिला बाहेर यायला सांगते, कोण आहेत इथल्या डॉक्टर ,तुम्ही बाहेर या...स्वरा रागात आवाज देते

विवेक तिला सांभाळत असतो तर ती अजूनच भडकते..

विवेक...ऐक स्वरा ,अग हा त्यांचा रुल आहे, त्यात त्यांची चूक नाही, आपण उद्या येऊ हवे तर..

त्यांचा आवाज ऐकून सुप्रिया बाहेर येते

तिला हा गोंधळ काय आहे नेमके कळत नाही, कोण हा आरडाओरडा करत आहे ,आणि काय झाले आहे इतके ओरडायला म्हणून तिथली शिपाई भांडत येते..

शिपाई...ओ मॅडम का भडकत आहात तुम्ही इतक्या ,जावा उद्या या..

तिक्यात सुप्रिया बाहेर येईन शिपाई हिला बाजूला करून समोर येते, आणि तिला समोर स्वरा असून ती आधी विवेककडे बघते..

सुप्रिया... अरे तुम्ही,आज परत

तो... हो, खरे तर !!

ती... म्हणजे पुन्हा अस्वस्थ होतंय का हृदयात तुमच्या.. की परत चुकून ह्या क्लिनिक मध्ये आलात तुम्ही

स्वरा...रागात, माझ्याशी बोला, त्याच्याशी काय बोलत आहात तुम्ही, मला विचारा मी सांगते, काय होतंय ते..

ती... ok, तुम्ही कोण ??

स्वरा...मी पेशंट आहे 100वी

ती... हो पण 100 रुग्ण इतकीच लिमिट असते इथे

स्वरा..माझा नंबर शंभरावा आहे..मी माझ्या दादा सोबत भांडत असतांना दुसऱ्या मुलीने मध्ये नंबर लावला आणि मी मागे पडले..आता तुम्हाला मी ह्या चुकी साठी सरळ नौकरी वरून काढून टाकते की नाही पहा

स्वरा खूप टोकाचे बोलून गेली, दादा काय करतो पाहू..