स्वाभिमानी भाग 13
हळूहळू ती ही विसरून जाते, पुन्हा आपल्या कामाला लागते, दिवस छान जात असतात आणि झाला तो प्रकार ती ही विसरलेली असते, डॉक्टर ही आपल्या कामात व्यस्थ असल्यामुळे ते ही विसरून गेलेले असतात...त्यांना आता फक्त वैद्यकीय कॅम्प आणि गावोगावी फिरायचे हेच काय ते टार्गेट असते..त्यात इकडे दवाखाना आणि त्याची सगळी व्यवस्था सुप्रिया छान प्रकारे सांभाळत असते, त्यांनी तिच्या हातात हा लवा जमा सोपवून दिलेला असतो..
हॉस्पिटलमध्ये आता सुप्रिया सोबत इतर डीपारमेन्ट चे इतर डॉक्टर ही आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडत असतात...तिला ही छान अनुभव गाठीशी येत असतो...आणि रुग्ण ही बरे होऊन जात असतात तसे छान लौकिक करून जातात...तर एकीकडे डॉक्टर सुप्रिया ह्या सगळ्यांसाठी मोठा विषय होऊन जाते...त्यांच्या हातून विलाज झाला म्हणजे 100% फरक पडतोच अशी पेपर मध्ये बातमी ही येते...तश्या काही मोठं मोठया हिरोईन,मॉडेल कॉलेज च्या मुली ही इलाज करण्यासाठी तिलाच पसंती देतात..
इकडे विवेकाची बहीण ही तिला अजमावून बघण्यासाठी त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये स्वतःचा आणि तिच्या मैत्रिणींचा स्किन चा उपचार घेण्यासाठी येते..तेव्हा तिला पहिल्यांदा सुप्रिया भेटते...मग बहिणी सोबत पुन्हा एकदा विवेक मुद्दाम येतो...सुप्रियाला भेटायला..
स्वरा विवेकची बहीण तिला आपल्या हॉस्पिटलमध्ये मध्ये अशी कमी खर्चाचे ट्रीटमेंट घेत आहोत आपण ,ह्याची लाज तर वाटते पण तिला कमीपणा ही वाटतो, तिला तिच्या मैत्रिणी समोर हे कमीपणाचे लक्षण वाटते..
स्वरा... किती चिप आहे हे हॉस्पिटल, आपलेच असून ही नको वाटते ह्या गरिबांसोबत बसून इलाज करायला, कोणी तरी मला म्हणावे या ,ह्या लाईन मध्ये बसू नका ,मी लगेच तुमची ट्रीटमेंट करते ,तुमची सोय करते..त्यांना माहीत असायला हवे मी ह्या हॉस्पिटल ची मालकीण आहे ,आणि मालकीण मॅडम ला असे बाहेर बसने बेशिस्त संस्कार आहेत..कुठे ही डॉक्टर तिला कोणी तरी सांगायला हवे मी कोण आहे ते...हा दादा पण कुठे गेला आहे ,त्याने तरी सांगायला हवे मी कोण आहे ते...
स्वरा आपला वेळ फुकट जात आहे म्हणून हॉस्पिटलमध्ये त्या स्किन ट्रेटमेंट वाल्या कॉरिडॉर च्या समोर बसून त्रागा करत होती, मूर्ख सगळे डॉक्टर त्यांना साधे manners ही नाहीत का, असे ट्रीट करतात का ??
स्वरा रागात फणफणत होती ,ती आता उठून सुप्रियाला ओरडायला जाणार इतक्यात समोरून विवेक येतो आणि तिला सावरतो..
स्वरा होईल का शांत की तिचा राग निघेल सुप्रिया वर