स्वाभिमानी भाग 12

Swabhimani
स्वाभिमानी भाग 12

सुप्रिया हैराण होऊन बघत असते, तिला जरा खजील झाल्यासारखे वाटते..

तो हात पुढे करतो हात मिळवण्यासाठी..

ती हात न मिळवता सरळ हात जोडते..

डॉक्टर... पेशाने तो खूप मोठा आर्टिस्ट आहे, आणि त्याची फर्म आहे आपल्या शहरात..

ती... हो सर ओळख झाली आमची इतक्यात पण अशी ओळख नाही करून दिली यांनी..

डॉक्टर...म्हणजे ग

ती... त्यांना अस्वस्थ वाटत होते काही वेळा पूर्वी ,अगदी हार्ट वर प्रेशर आले आले असे म्हणत आले होते...

तो... डॅडी मी ह्यांना भेटलो जस्ट ,तेव्हा अचानक लक्षात आले डाव्या बाजूला जरा चमक मारत आहे ,जणू वीज चमकवी असे झाले, आणि समोर ह्या ..

ती... सर मी ह्याची ओळख कधीच नाही विसरणार.. ग्रेट आर्टिस्ट आहेतच ते..

डॉक्टर... अग माझा मुलगा खरंच आर्टिस्ट आहे हे तुला कळले तसे मला ही माहीत आहे..जरा पद्धत चुकली त्याची..त्याने डायरेक्ट सांगायला हवे होते तुला की त्याला तू आवडली आहेस ते...

ती.. सर...काय बोलताय तुम्ही हे

तो... आहो बाबा, तुम्ही पण कमाल करत आहात, हे अस काही नाही..माझ्या मनात ही हे नाही आले

ती लगेच निघून जाते, डॉक्टर यांनी एकदम सरळ क्लीन बोल्ड करून मुलाची विकेट उडवली होती..कधी नवत त्याला कोणी मुलगी अवडली होती ,ती ही सुप्रिया सारखी होतकरू गुणी मुलगी ,जी केव्हा पासून त्यांना ही सून म्हणून आवडली असती ही असे वाटत..

इकडे डॉक्टरने ही आपल्या मनातले बोलून टाकले ,तसेच विवेक ला ही आवडली होती पण इतक्या लवकर असे काही होईल हे वाटले नव्हते..तर सुप्रिया ने तर दूर दूर वर हे काही अनपेक्षित घडेल ,अशी अपेक्षा ही केली नव्हती.. काय कोण तो विवेक अनोलखी म्हणून येतो आणि तो आपल्या सरांचा मुलगा आहे हे समजते, आणि तोच सर त्याच्या मनातले आहे ,नाही ह्याचा विचार न करता बेधडक त्याला मी आवडते असे काय बोलून मोकळे होतात...किती ऑकवर्ड वाटले असेल तिला..


क्रमशः..???

🎭 Series Post

View all