स्वाभिमानी भाग 11
सुप्रिया ला ही काही तरी खटखट होतेच पण आता त्यांच्या विचारांशी थोडे तरी मिळते जुळते घ्यावे लागणार होते..
-------------------------------
सासू सुनंदा ह्या टॉप मॉडेल होत्या कधी एकेकाळी, त्यांना फॅशन सेन्स चांगला होता, दिर ही जिम ट्रेनर होता ,नणंद वेडींग प्लॅननेर होती ती ही नावाजलेली होती..ह्याचा घराण्याचे नाव होते ,तर सासरे मोठे डॉक्टर होते आणि त्यांच्या हाताखाली सुप्रिया प्रॅक्टिस करत होती तेव्हा तिची ओळख विवेकसोबत झाली होती..त्याला ती बघताक्षणी आवडली होती...तिची बोलण्याची आणि रुग्ण हाताळण्याची पद्धत पाहून तो ही तिचा रुग्ण झाला होता..
-----------------------------
सुप्रियाला माहीत नव्हते हा सरांचा मुलगा आहे, आणि हा खुद मुद्दाम रुग्ण म्हणून आला आहे, त्याला तिला जवळून पहायचे आणि जाणून घ्यायचे होते, मॉडेल चे फोटो किती तरी घेतले होते पण पहिल्यांदा कोणी इतकी सुंदर डॉक्टर पहात होता..जीचे मन ही सुंदर होते आणि डोळे ही, त्यात ती विलक्षण सुंदर दिसत असल्यामुळे सहज त्याची फोटोग्राफी सेन्स तिच्याकडे त्याला आकर्षित करून गेली..तेव्हा तो तिच्याशी प्रथम बोलण्यासाठी धडपडत होता
तो...हॅलो मॅडम मला खूप अस्वस्थ वाटत आहे,खूपच हृदय जरा बंद पडल्यासारखे जाणवते
ती हसून, तिकडे बरेच डॉक्टर्स आहेत, तुम्ही तिकडे जाल का ते तुमची अस्वस्थता दूर करतील,
तो..तुम्ही डॉक्टर नाहीत का
ती...आहे पण तुम्हाला तेच जास्त छान ट्रीट करतील, लगेच फरक होईल
तो.. तुमची ,तुम्हीच ट्रीट करा मला
ती...जमले असते पण खूप रुग्ण आहेत line मध्ये, आणि तसे ही मी स्किन ट्रीटमेंट देते, हार्ट ची नाही..
तो... निदान दोन शब्द प्रेमाचे तरी बोलू शकत नाहीत का तुम्ही स्किन वाले
ती... हो नक्की, तुम्ही या आता
तो... मला आता जरा बरे वाटते, हीच तर ट्रीटमेंट हवी होती..
ती... तुम्ही तर हार्ट साठी आला होता ना आणि लगेच बरे कसे वाटत आहे..
तो... हार्ट ला ठीक वाटण्याशी मतलब मॅडम
ती...कुठून कुठून मूर्ख येतात...
तो ही तिचे हे बोल ऐकून निघू जात असतो तेव्हा त्याचे वडील येऊन त्याला थांबवतात ,आणि त्याची ओळख सुप्रिया शी करून देतात..
सुप्रिया मिट माय सन, विवेक... सर ओळख करून देत म्हणाले
क्रमशः?????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा