स्वाभिमानी भाग 10
तो...ठीक आहे तू चल parlour मध्ये, तुला आईसाठी हा लुक change करावा लागेल तर कर, माझे काय... नवऱ्यासाठी सगळेच त्याच्या मनासारखे होईल असे ही नाही ..तू काय सगळ्यांना विचार करण्यास बांधील आहेस, माझा मी करेन ऍडजस्ट, घालतो मी माझ्या मनाला मुरुड.. चल जाऊ या
तो नाराज झाला होता
ती समजून गेली, मी त्याच्या आवडीचे लांब केस ठेवून जरा change करणे अपेक्षित होते, आणि तरी आईसाठी मी त्यांच्या लुक्स प्रमाणे त्यांच्या मैत्रिणींसमोर येणे अपेक्षित होते... त्यांना आपली सून आपल्याच विचारांची आहे ,आपल्याच सारखी रहाते , तिला ही मॉडर्न राहण्याची , दिसायची आवडत आहे...हे दाखवून द्यायचे होते, आमची चॉईस किती आमच्या सारखी आहे हे जगाला दाखवायचे होते..म्हणजे आपली शान राखली जाईल..सुप्रिया एक कमावती मुलगी आहे ,तिच्या पायावर उभी आहे, तिचे लौकिक मोठे आहे ही ओळख निर्माण झाली की ती ही ह्यांच्या लायकीची आहे ही बातमी सगळीकडे होईल...
इकडे आईने सगळ्या मैत्रिणींना फोन करून बोलावले होते, गप्पा छान हाय फाय होत होत्या ,किती कोण कशी मोठेपणा मिरवते तिच्या वरून तिची समाजात काय प्रतिष्ठा आहे, नाव आहे, मान सन्मान आहे हे ठरवत होत्या, बदनामी झाली तरी नाव झाले ह्यात आंनद होता त्यांना, income टॅक्स ची रेड पडली म्हणजे ते खूप पैसेवाले आहेत ह्याचा असा अर्थ होतो त्यांच्यासाठी... पण तो चोर आहे ह्याचे काही घेणे नाही...
ह्या घरातील लोक सुप्रियाला ती जशी आहे तशी न स्वीकारता तिला पूर्णपणे बदलण्याचा अट्टहास करून बसले होते, तिने आता आपले पूर्वीचे राहणीमान बदलावे आणि तिने त्यांच्या सारखे रहावे..त्यासाठी सध्या तरी तिला कोणी काही बोलत नव्हते पण ती त्यांना आपले समजून घेत त्यांच्या आवडी निवडी जाणून घेत होती..त्यांच्या चॉईस नुसार काही गोष्टी आत्मसात करत होती, जेवण, रहाणे,बोलणे, नाते कसे सांभाळायचे, लोकांसोबत कसे वागायचे ,कसे बोलायचे ,घरातील नौकरांसोबत कसे अंतर ठेवून वागायचे, कसे कामापूरते बोलायचे ह्या गोष्टी तिला सासूबाईने शिकवायला सुरुवात केली होती...
पण सुप्रिया थोडे फार जे गरजेचे आहे ते स्वीकारत होती पण जे तिला मुळीच पचनी पडत नव्हते तिला ते जड जात होते...तिने हळूहळू बोलायचे, कोणाला काही कसलेच नसते प्रश्न विचारायचे नाही ,कोणाच्या space मध्ये उगाच ढवळाढवळ करायची नाही, आपली नणंद, दिर किती उशिरा घरी येतात ,किंवा कुठे जातात हे ही विचारायचे नाही...कोण पार्टी करते कोण मित्रांसोबत टेरेस वर दारू पीत आहे ही तुझी बाब नाही तू दखल द्यायची नाही ह्यात असे सांगितले नव्हते पण त्यांना तिने त्यांच्या कडे प्रश्नार्थक नजरेतून ही बघायचे नाही असे जणू सुचवणे होते..
क्रमशः ?????
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा