स्वाभिमानी भाग 8

Swabhimani
स्वाभिमानी भाग 8

मी आलोय तुझ्या ऑफिस जवळ ..समोर बघ


ती... ओके ,मग इथे का थांबला आहेस, रोड क्रॉस करून ये

तो...ok, पण तिकडून वन वे आहे

ती..आलेच मी तिकडे..

ती गाडी जवळ येत असताना तिचे केस हवेत छान उडत असतात, तो तिच्याकडे बघतच असतो, त्याला तिची अदा खूप मोहक वाटते, आणि त्यात तो लगेच कॅमेरा कडून तिचे फोटो घेण्यासाठी बाहेर येतो, प्रत्येक अदा ही मोहक तशी निराळी...तिच्या केसच्या त्या जाळ्यात जणू कैद होऊन जातो...ती जवळ आल्याचे ही त्याला कळले नाही...हेवेने तिचे केस त्याच्या तोंडावर येताच त्याच्या सुगंधाने तो हरकून जातो, क्षणभर काहीच सुचत नाही...त्या केसांच्या दाट सावलीत विसर पडतो की आपण रस्त्यावर आहोत आणि आपल्या मुळे इतर ही जण खोळंबले आहेत, मग तीच हॉर्न देते त्याला आणि तिचे केस अलगद काढून घेते...चुटिक वाजवत त्याला भानावर आणते...तीचे केस त्याच्या बाहीच्या बटणात अडकलेले असतात, ती झटका देऊन काढते...

तो...अग हळू ,किती कठोर होतेस त्या नाजूक केसांवर...त्यांना काहीही इजा होऊ देता कामा नाही, माझा जीव अडकला आहे त्यांच्या मध्ये..त्या घनदाट काळ्या भोर केसांमध्ये अडकले माझे मन सुप्रिया... मला आज मी हरवलो काही तरी क्षण ह्या केसांमध्ये तर त्यांची किंमत कळली..तू जप त्यांना...माझा जीव आहेत कारण तू ह्या केसांमध्ये किती सुंदर दिसतेस हे तुझे तुला ही माहीत नसेल..ते सौंदर्य आज मी डोळ्यांनी पाहिले..आणि टिपले ही..

ती..टिपले ही ?? म्हणजे काय डोळ्यात साठवून घेतलेस का ?? ती हसत त्याची खेचत टोमणा देते

तो... घे हसून !! मी डोळ्यात ठेवून ठेवणारा वाटतो का तुला, मी हाडामसाचा फोटोग्राफर आहे मॅडम, लगेच फोटो घेतो..

ती..खरंच का, मग घेतलेस का माझे फोटो तू?

तो... माझी बायको इतकी सुंदर दिसते तर मी ही संधी कशी सोडू..असे फोटो मी कधीच काढले नाहीत, इतके natural सौंदर्य आजपर्यंत नाही पाहिले मी कुठेच..मी हे कायम जपून ठेवणार आहे.. एक से एक सुंदर फोटो ,कोणी ही नजर लावेल असे...मॉडेल्स ला काय करते, सगळ्या फिक्या आहेत तुझ्या समोर ..

ती... अति नाही होत का ही स्तुती तुझी..!!

क्रमशः ????

🎭 Series Post

View all