स्वाभिमानी भाग 7

Swabhimani
स्वाभिमानी भाग 7

तो..तुझ्या आवडीच्या प्रत्येक गोष्टीत माझी आवड दडलेली असेल, अगदी लॉंग ,शॉर्ट कसले ही कट कर मी तुला माझी बेस्ट चॉईस एव्हर असेच म्हणार...नो रीग्रेट्स

ती... तू सोबत आहेस तर मग मला ही बदलायला आवडेल, तुझ्यासाठी तुझी आवड जपायला आवडेल, बदलायला ही आवडेल, तुला शॉर्ट हवे असतील तर ते ही स्वीकारेन मी..

तो... अग बदल पण हळूहळू, लॉंग जर्नी आहे ,लगेच बदलून जा असे ही नाही, तुझ्यावर दबाव नाही..

ती.. चल चल, मी ठेवते फोन, तू गाडी घेऊन ये मी बाहेर थांबते, कारण आईंचा msg येतोय

तो... ओके

ती लगेच आवरा आवर करते, सगळे बंद करून ,केस आवरून, लिपस्टिक लावून, त्याने दिलेला perfume स्प्रे करून, त्याचा स्क्रीन वर save केलेल्या फोटोला किस करून बाहेर येते, सगळ्यांना bye करत ती निघत असते..

तिक्यात काही मैत्रिणी तिला तिच्या लांब केसांबद्दल कॉम्प्लिमेंट देतात,खूप सुंदर दिसत आहेस तू आज ,जरा असेच मोकळे सोडत जा तू केस असे म्हणतात...

दुसरी...तुला फक्त ह्या लांब केसांमुळे त्याने पसंत केले असणार नक्कीच ,त्याला ही तुझे हे लांब केस खूप आवडतं असणार सुप्रिया.. तू कापायचे म्हणालीस तर बघ कसा जीव कासावीस होईल त्याचा ,गुंतला असेल त्याचा जीव त्यात..

सुप्रिया.. नाही अग त्याला असे काही वाटत नाही ,त्याला आवडतात माझे मोकळे लांब केस पण मी केस कापू नये असे काही नाही..उलट तोच म्हणतो तू स्वतःला बदल...

मीरा...(तिची बॉस) सुप्रिया मी तर असे नाही मानत, खरे तर त्याला तुझे मन जपायचे असेल म्हणून म्हणाला असेल ,त्याला नक्कीच आवडत असेल तुझे केस...सुंदर ,काळेभोर,लांब, जणू दाट सावली, त्यात कोणाला नाही आवडणार हरवून जायला...( हसून )

सुप्रिया... इतका ही रसिक नाही तो, त्याला काळासोबत रहायला आवडते, आणि त्यांची फॅमिली ही तशीच आहे..

मीरा...किती खात्री आहे तुला त्याची..पण तरी बघ नाहीतर उगाच तू पछतावा करशील सुप्रिया..तुला कॉम्फोर्टेबल वाटणार नाही जर कधी तू केस कापण्याचा विचार केलास तरी..

सुप्रिया.. अजिबात नाही, मी एकदा मन बनवले तर मी मागे हटत नसते ,आधी वेगळे होते आता वेगळे आहे ,आता त्याची चॉईस आहे ,आणि त्याच्यासाठी मी माझा कॉम्फोर्ट झोन ही सोडायला तयार आहे...चल मी निघते तो आला असेल...तो वाट बघत असेल..


ती बाहेर येऊन थांबते...

त्याची वाट बघत अर्धा तास जातो

ती त्याला कॉल करते..

तो कॉल घेतो,

कुठे आहेस तू ??

क्रमशः

🎭 Series Post

View all