स्वाभिमानी भाग 4

Swabhimani
स्वाभिमानी भाग 4

टेन्शन मध्ये येऊन आपण विवेकला उगाच बोललो, कारण नसतांना, बिचारा त्याला माझ्या भल्याचे बोलायचे होते आणि मी नको ते बोलून त्यांचा चांगला मूड खराब केला ,थोडा वेळ तर मला ही त्यांच्या सोबत घालवायचा होताच, त्यांनी अचूक ओळखले माझे मन, आणि मी बस्स टाकले धडधड बोलून...कशी बोलू मी परत त्यांना...


येर झऱ्या घालत ती फोन लावू की नको लावू म्हणत, डोळे बंद करून फोन लावते विवेकला.
मला पुन्हा विवेकाची मदत लागणार बहुतेक

की मी मुद्दाम त्याची मदत घेऊ ,??

त्याला वेळ द्यायला हवा, त्याचा असा मूड खराब केला ह्याबद्दल मी शिक्षा घेते..


सुप्रिया ला एक सवय होती ,कोणा खूप प्रेमाच्या व्यक्तीला आपल्या कडून त्रास झाला तर ती स्वतःला शिक्षा करून घेत..त्याला पार्टी देऊन..अशी वेळ बऱ्याचदा तिच्या मोठया बहिणीवर येते ,किंवा आईवर कधी चिडली तर....बाबांवर शक्यतो चिडणे होत नसे....कारण ते शब्द तिला आतून पोखरून टाकत, त्याची भरपाई नाही हेच ती म्हणायची..

आज ही विवेक वर चिडली ,मग मन तिला खात होते, हात थंड पडले डोळ्यात पाणी येत होते, त्याच क्षणी ठरवले ,त्याचे म्हणणे काय हे ऐकून घ्याचे वाटले ते पटत नाही तर सांगून मोकळे व्हायचे, पण असे अर्धवट ठेवून त्याला ही दुःखी नको करायला आणि आपण ही झुरत नको बसायला...जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत ह्या झुरण्यातून सुटका नाही


तीने फोन लावला होता ,त्याची बेल जात होती पण तिकडे फोन वाजत होता....

तो फोन का उचलत नाही ,काय झाले असेल..

क्रमशः ????

🎭 Series Post

View all