स्वाभिमानी भाग 3

Swabhimani
स्वाभिमानी भाग 3

ती ,"म्हणजे काय हे, चॉईस अशी इतकी पटकन decide करता येईल का, मी तर पुन्हा तेच म्हणणे तू म्हणशील ते, अगदी काहीही..साऊथ तर साऊथ, महाराष्ट्रियन तर महाराष्ट्रियन , चायनीज तर चायनीज ,आणि काही नाही तर चहा,कॉफी ,आणि नुसती आईक्रीम पण जमते मला,आणि घरी आल्यावर खिचडी "

तो,"तू साधीच आहेस ग, तू इतकी साधी चॉईस नको ठेऊस तुझी, तुला तुझी चॉईस निर्माण करावीच लागेल,माझ्या घरी निभाव लागणार नाही अश्याने.."

ती,"अरे काय बोलतोस, का नाही लागणार निभाव, फक्त चॉईस नाही म्हणून का ,असे कुठे असते का विवेक, मला साधं रहाण्याची सवय आहे ह्यात न जमण्यासारखे काय आहे,आणि होईल हळूहळू तुम्हाला आवडेल ते सुरू करून घेईल मी ही, मला दडपण येते लगेच त्या फेज मधून ह्या फेज मध्ये येणे, पण जमवता जमवता जमून जाईल मी.."

तो, "तू तर टेन्शन घेतेस ग, मी सहज म्हणालो, तू सगळे जमून घेत आहेस मान्य आहे पण हे जे जमून घेत आहेस ते इतरांचे मन ठेवण्यासाठी जमून घेत आहेस ,मला म्हणायचे की तू त्यांच्या किंवा माझ्या मनाचा विचार कमी कर ,आणि तुझ्या मनाचा विचार कर ,त्यानुसार तू जमून घे, बदल कर तुझ्यामध्ये, म्हणजे ऐन मध्यात तुला ना तुझी चॉईस रहाणार ना आमच्या चॉईस नुसार तुला वागता येईल, तेव्हा खूप कठीण होईल तुला बदल पचवणे आणि तो बदल निभावणे...बेटर तू तुझी चॉईस जप,आणि हवी तशी निर्माण कर इतकेच म्हणायचे आहे मला ."

ती जरा टेन्शन मध्ये येते आणि त्याला सांगते," मी नंतर फोन करते तुला ,आता मला काही काम आहे,आज नको भेटायला आपण ,मी सरळ काम उरकल्यावर घरी जाणार आहे ,आईनी त्यांच्या किटी पार्टीच्या मैत्रिणींना बोलावले आहे, त्यांना माझी ओळख करून द्यायची आहे, हा आत्ताच मला त्यांचा msg आला आहे...आणि येतांना मला parlour मध्ये ही जाऊन यायला सांगितले आहे ,तुम्ही ही घरी या ,जपून या मी येतेच ,ठेवते फोन "

क्रमशः ???

🎭 Series Post

View all