स्वाभिमानी भाग 2

Swabhimani
भाग 2 स्वाभिमानी

विवेकने ठरवले होते सुप्रिया म्हणजे माझ्या आयुष्यातील आलेली एक समजदार ,मनाने सुंदर, मनकवडी ,तशीच घरपण जपणारी ,माझी हक्काची सखी मग तिला कोणी दुखवेल ते मला नाही आवडणार, तिच्या मनाची मला ही तिच्या इतकीच काळजी घ्यावी लागणार..आता तिला सत्य सांगावे लागणार ,आत्ता पर्यंत ठीक होते ,तिला संस्कार तसे होते ,सगळ्यांच्या मनात घर करायचे इथपर्यंत ठीक होते ,पण कोणाच्या स्पेस मध्ये जाऊन त्यांच्या कुठल्या ही गोष्टीत दखल करून त्यांना दुःख होणार नाही ,त्यांचे मन दुखावले जाणार नाही हे वेळेत सांगावे लागणार आहे...नवीन आहे म्हणून घरचे ही सहन करतील, पण हे अति स्वीट वागणे त्यांना डोईजड होईल आणि भावनेच्या भरात तिच्यावर कारण नसताना चिडतील..तिने ही भावनिक न होते जरा अंतर ठेवूनच नाती निभवायला शिकायला हवे, सगळेच तिच्या लेखी साधे, सरळ, मनात कपट नसलेले असे आहेत, पण शेवटी हे माझ्या घरचे आहेत ते माझ्या पेक्षा जास्त कोणाला माहीत आहे.. तिच्या सरळ ,निष्पाप भावना दुखवता कामा नाही, मी तेव्हा समजूत घालण्यापेक्षा आत्ताच समजून सांगून तिला जरा अंतर ठेवून वागायचा तडक सल्ला दिलेला कधी ही योग्य ,वाटुदे तिला आश्चर्य, किंवा मी वाईट होऊ दे तिच्या नजरेत, पण हा तिरसट सल्ला द्यायला हवाच.. तो ही आजच..ती वेडी ,नासमज, भावनिक जरी असली तरी तिला मला काय सांगायचे आहे हे नक्कीच कळेल..

विवेक ऑफिस मध्ये बराच वेळ रिकामा बसला होता,त्याला राहून राहून सुप्रियाला हे सांगायचे आहे पण काही कळत नव्हते कसे सांगू, तिला बोलावून घेऊ का ऑफिसमध्ये की घरी एकांतात सांगू, की कॉफी साठी एखादया हॉटेल मध्ये घेऊन जाऊ, तिला जिथे अगदी कॉम्फोर्टटेबल वाटेल अश्या तिच्या आवडत्या ठिकाणी घेऊन जाऊ, मी ही जरा फ्रेश होईल, आणि तिला आपल्या लग्नाच्या ह्या बेडीत अडकवले आणि त्याला आज 7 महिने पूर्ण होत आहे ह्याची पार्टी देण्यासाठी बाहेर घेऊन जातो..

विवेक फोन लावतो,

" हॅलो सुप्रिया आज काय खास काम नाही ना तुला तुझ्या ऑफिसमध्ये ?"

सुप्रिया,"आज होत थोडसं काम ,पण मी हवे तर उद्या येऊन करू शकते."

विवेक," हो कर तसेच कर, उद्या जाऊन कर ते काम ,तेच योग्य राहील "

सुप्रिया,"का आज काय खास प्लॅन आहे का?"

तो,"तसाच काही खास नाही,पण मला वाटलं की आपण अडकलो आहोत लग्नात आणि कुठे जरा मोकळीक ही नाही, तीच फॅमिली, तेच गोड गोड वागणे, सगळ्यांचे तेच चेहरे , म्हंटले तुला बाहेर घेऊन जाऊ ,तुला हवे ते ठिकाण सांग ,जाऊ आपण तिथे.."

ती, "अरे तसे खास कोणतेच ठिकाण नाही माझ्या आवडीचे ,मी खरं सांगू का मी कधीच बाहेर गेले नाही हॉटेलिंग साठी, पण तुझ्या आवडीचे ही चालेल ना ,मला ओके आहे तुझी आवड."

तो, "कशी ग तू अशी ,सगळी आवड माझीच तुझे काहीच नाही, मला हे नेहमी नाही आवडणार इथून पुढे तुझी चॉईस ती माझी चॉईस असे उत्तर नकोय..तू माझी बायको आहेस तर आज मी तुला सगळे ठिकाणे माहीत करून देईल, प्रत्येक ठिकाणी जाऊन बसून, तिथले खास काही तरी ऑर्डर करू म्हणजे मग तू तुझी चॉईस निर्माण करशील "

क्रमशः ??

🎭 Series Post

View all