स्वाभिमानी भाग 1

Swabhimani
स्वाभिमानी भाग 1

नवीन लग्न होऊन काही महिनेच झाले होते..
सुप्रिया सासरी रुळत चालली होती, तिला सासरची मंडळी स्वभावाने ,पदाने आणि श्रीमंतीने ,मानापणाने, खूप छान मिळाली होती, तिला मोकळं वातावरणात राहायची सवय होतीच तेच वातावरण तिला सासरी ही मिळत होते

सुप्रिया आणि विवेक दोघे ही नौकरी करत होते ,तिला विवेक नवरा म्हणून चांगला सपोर्ट करणार आणि प्रोत्साहन देणार समजूतदार जणू मित्रासारखा हवा होता अगदी तसाच मिळाला होता..


तिला समजून घेताना त्याला ही अवघड गेले नाही, उलट तो कमी पडतो की काय कुठे असे त्याला वाटत होते, तिची समजदारी पाहून स्वतःला खरंच नशीबवान समजत होता..तिने येताच आईकडे आपले डाग दागिने दिले हे पाहून त्याला खूप नवल वाटले ,पण तिच्या बद्दल आदर ही वाटला...आईचा मान आणि मन दोन्ही सांभाळले ह्याची मनोमन नोंद घेतली...मग काय पुढे जेव्हा ही कधी असा प्रसंग आला तेव्हा तेव्हा तिने त्याच्या मनात अजूनच अढळ जागा निर्माण केली.. त्याची निवड अगदी बरोबर आहे हेच पदोपदी सिद्ध होत गेले.. सुप्रिया मी खरंच लकी आहे...इतके ही चांगले वागू नकोस की तुला नजर लागेल.. आई बाबा ,रोहन, स्वरा ह्यांच्या अपेक्षा अजून उंचावतील आणि त्या पूर्ण करता करता तुला नाहीसे होईल..आता काही गोष्टी तुला मी सांगू असे वाटते..अति तिथे माती नकोय..

विवेकला मागील अनुभव होते ,वहिनी, काकू, ह्या जेव्हा नवीन होत्या तेव्हा ही असेच मोठे कौतुक आणि गुण करून गेल्या होत्या त्या, आणि त्यांच्या अति चांगुलपणामुळे त्यांना अपेक्षा पूर्ण करतात करता नाकीनऊ आले होते....अपेक्षा पूर्ण झाल्या ,किंवा होत आहेत म्हणून घरच्यांचा आधीकच अपेक्षा वाढल्या होत्या.. आणि शेवटी काही अपेक्षा पूर्ण होऊ न शकल्यामुळे त्यांना राग ही सहन करावा लागला होता..परिणामी वाद, त्यांच्यावर नकोते आळ घेऊन त्यांना घराच्या बाहेर काढून देण्यात आले...त्या वेगळ्या राहू लागल्या, एकत्र परिवार तुटला...आजी ने ही अबोला धरला..आई तर परत कधीच बोलली नाही काकी आणि वहिनी सोबत..

सुप्रिया तू अति चांगली वागू नकोस ,ह्या घराला ज्याची त्याची स्पेस हवी असते, उगाच तुला त्रास होईल असे ही वागू नकोस.. परिणामी तूच वाईट ठरवली जाशील...

क्रमशः..??

🎭 Series Post

View all