सुयश ने गमावलेलं स्वरा च प्रेम - भाग 1)

Suyash Swara Love Story

शाळेतले दिवस संपून कॉलेजचे दिवस सुरू झाले होते. बी.कॉमच्या फर्स्ट इयरला असताना उनाड मुलांच्या यादीत सुयश च नाव अग्रणी होतं. रस्त्यावर स्टंट करणे, कॉलेज कॅम्पसमध्ये मारामारी करणे यासाठीच सुयश ओळखला जायचा. या सगळ्या गोष्टींसाठीच त्याला वेळ पुरायचा नाही तर मुलींकडे पाहणंच सोडा. पण या सगळ्यात त्याला एक खूप साधी सरळ आणि अभ्यासू मुलगी आवडू लागली होती.

स्वरा च्या प्रेमात तो कसा पडला हे त्याचं तोही सांगू शकत नव्हता. पण त्याला स्वरा आवडू लागली होती हे मात्र नक्की. स्वरा आणि सुयश एकाच वर्गात होते. तिच्याशी मैत्री करावी म्हणून कित्येक महिन्यांनी सुयश ने वर्गाचं तोंड पाहिलं होतं. आता तो तिच्यासाठी का होईना वर्गात बसू लागला होता. हळूहळू त्यांच्यात मैत्री झाली.

आणि स्वरा ने त्याच्या त्या रावडी स्वभावाला स्वीकारले, तिला त्याच्यातला रांगडे पणा आवडू लागला. तिच्या सांगण्यावरुन तो अभ्यासही करु लागला होता. त्याचं कट्ट्यावर बसणं कमी झालं असलं तरी पूर्णपणे बंद झालं नव्हतं. स्वरा ला त्याचा तो स्वभावच आवडला होता.  दोघंही एकमेकांची कंपनी चांगली एन्जॉय करत होते.  सगळीकडे एकत्र फ़िरत होते, बघता बघता फायनल इयरची परीक्षाही जवळ येऊन राहिली होती. परीक्षेला काही महिनेच राहिले असताना सुयश ला काविळ आणि टायफाइड झाला. या आजारात सुयश फारच अशक्त झाला होता.

डॉक्टरांनी त्याला अॅडमिट करण्याचा सल्ला दिला होता. १५-२० दिवस रुग्णालयात गेल्यामुळे तो फार थकला होता. घरी आल्यावर अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे त्याने ठरवले. या दरम्यान त्याने स्वरा ला अनेक फोन करण्याचा आणि तिला भेटण्याचा प्रयत्न केला पण स्वरा ने त्याच्या कोणत्याच कॉलचे उत्तर दिले नाही. आपण असे नेमके काय केले की स्वरा रागवली? या प्रश्नाचे उत्तर तो आपल्यापरिने शोधत होता. पण तरीही त्याला त्याचे उत्तर मिळाले नव्हते.

प्रिलिमदरम्यान त्याने स्वरा ला कॉलेज बाहेर गाठले आणि थेट विचारले, ‘नक्की झालंय काय स्वरा ? तू अशी का वागतेस?… किमान मला तरी कळू दे…’ यावर स्वरा ‘मला तुझ्याशी काहीच बोलायचे नाही. प्लीज मला कॉल करु नकोस मला माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करु दे…’ अभ्यासाच्या ताणामुळे कदाचित स्वरा अशी वागत असेल असे सुयश ला सुरूवातीला वाटले. परीक्षेनंतर सगळे नीट होईल या आशेवर त्याने परीक्षेचा तो वेळ जाऊ दिला.


प्रिलीयम नंतर त्याने पुन्हा तिला तेच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण तिच्याकडून कोणतंच उत्तर आलं नाही. प्रिलिमनंतर कॉलेजमध्ये जाणं बंद होत असल्यामुळे त्यांचं भेटणंही बंद झालं होतं. मनातून तिचा विचार काही केल्या जात नव्हता. असं काय झालं असेल की ती माझा एवढा राग करायला लागली या प्रश्नाचं उत्तर त्याला काही केल्या मिळत नव्हतं. आधीच आजारपणामुळे तब्येत खराब झाली असताना त्याच्या डोक्यात सतत हेच विचार असल्यामुळे त्याची तब्येत जास्तीच खराब होत चालली होती. पर्यायाने त्याला बी.कॉमच्या फायनल एक्झामला मुकावे लागले होते.

प्रिलियमच्या परीक्षेनंतर स्वरा त्याला कधीच भेटली नाही आणि तिने अचानक बोलणं का टाकलं? तिने काहीही कारण न देता नातं का तोडलं? या प्रश्नांची उत्तरं त्याला शेवटपर्यंत मिळाली नाहीत.

स्वरा च्या त्या धक्यातून सावरायला सुयश ला बरीच वर्षे लागली. या मधल्या काळात त्याच्या आणखीही मैत्रिणी झाल्या पण आजही स्वरा तसं का वागली हा प्रश्न त्याला सतावतो. सुयश आजही स्वरा मध्ये गुंतला आहे असं नाही. तो केव्हाच पुढे निघून गेला पण निरुत्तर राहिलेले प्रश्न जास्त सतावतात. सुयश च्या बाबतीतही तेच झाले.

असाच काळ पुढे जातं राहिला आणि सुयश ला या गोष्टीची पूर्ण जाणीव होती की काही गोष्टी या जगण्यासाठी करायच्या असतात, तर काही गोष्टी जगणं सुकर करतात. तो करत असलेली नोकरी त्याचं आयुष्य सुकर करत होती. मात्र त्याला असणाऱ्या वाचनाच्या  छंदामुळे तो खरा जगत होता. पण त्याला सारखं वाटत राहायचं का स्वरा सर्व चांगल चाललेलं असताना मला सोडून गेली.

पण सुयश  ला स्वरा कोणतही कारण न देता का सोडून गेली आणि त्याला त्या गोष्टीचा कसा पच्छाताप होतो ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत.

नमस्कार. सौ. सोनल गुरुनाथ शिंदे. ( देवरुख - रत्नागिरी )

🎭 Series Post

View all