सुयश ने गमावलेलं स्वरा च प्रेम ( भाग - 2 ) अंतिम भाग...

Suyash Swara Love Story

कालांतराने सुयश च लग्न होत, साक्षी नावाच्या मुलीशी, त्याच्या आई ने पसंत केलेली मुलगी होती ती, सर्व गुणांनी चांगली, संसार नीट करणारी, पहिले 6 महिने नीट गेले पण नंतर नंतर त्यांच्यात खटके उडू लागले.

छोट्या छोट्या गोष्टीनवरून भांडण होऊ लागली, सुयश  च्या आई ला ही कळेना कि ह्या दोघात भांडण का होऊ लागली. पण असच वर्ष निघून जातं, आणि सुयश च्या बायको ला दिवस जातात, त्यांना मुलगी होते, पण तरी ही रोज ची भांडण ही चालूच असतात.

आणि 1 दिवस साक्षी मुलीला घेऊन माहेरी निघून जाते, सुयश ला मुलीची खूप आठवण  येत असते पण साक्षी सासरी येईला तयार  नसते. सुयश  सर्व गोष्टींचा विचार करत असतो, का सारखी भांडण होतात. आणि एक दिवस तो असच एका कामासाठी पुण्याला गेलेला असताना त्याला त्याची आणि स्वरा ची कॉमन फ्रेंड रिया भेटते. ते दोघे खूप कॉलेज पासून च्या गप्पा मारतात आणि तेव्हाच सुयश  रिया ला विचारतो तुला माहिती आहे का रिया मला स्वरा का अशी अचानक सोडुन गेली ते त्यावर रिया हॊ म्हणाली.

रिया सांगू लागली अरे सुयश खरंच तुझ्यावर स्वरा च खूप प्रेम होत पण तुझं तिच्या बाबतीत असलेलं वागणं तिला पटत नव्हत, त्यावर सुयश म्हणतो अगं कसलं वागणं, सुयश तुझं सारखं तिला इथे, जाऊ नको तिथेच जाऊ नको, ह्या मुलाशी बोलू नको त्या मुलाशी बोलु नको, तसेच ती कुठे गेली असली कि सारखं तिला कॉल करून कधी येणार आहेस, किती वेळाने येणार आहेस, तुझा कॉल उचललायला उशीर  झाला कि तिच्यावर ओरडण, ऑफिस मधून तिला यायला उशीर झाला कि तिला सारखं इतका का वेळ होतो तुला ऑफिस मध्ये असे प्रश्न सतत विचारत राहणं ह्या सर्वाला ती फार कंटाळली होती, आणि जेव्हा तू आजारी असताना हॉस्पिटल ला ऍडमिट झालास  तेव्हाच तू त्या 8 दिवसात तिला तू आजारी असल्यामुळे काहीच विचारले नाहीस त्यामुळे तिला तुझ्या ह्या सर्व बंधनातून मुक्त झाल्या सारखं वाटल 8 दिवस, आणि मग तिने ठरवलं कि सुयश असच आयुष्यभर आपल्याला वागवत राहणार त्यापेक्षा आताच ह्या नात्यात इथेच थांबलेलं बरं. आणि तिने तुला सोडून जाण्याचा निर्णय घेतला.

तुला तिने सांगितलं असतं कारण -  पण तुझ्या लेखी तू वागत आहेस ते योग्य च होत तुला त्यात काहीच चुकीचं वाटत नव्हतं म्हणून काही,च कारण न देता ती तुझ्या आयुष्यातून निघून गेली...

सुयश ह्या सर्व च गोष्टींचा विचार करू लागला तेव्हा त्याला उमगले कि अरे आपण साक्षी बरोबर पण असच वागलो नेहमीच स्वतः च मत सर्व गोष्टीत पुढे करत राहिलो, मी म्हणेन तसेच साक्षी ने ड्रेसिंग कराव, जास्त फॅशन करू नये आणि ह्या सर्व च गोष्टीचा साक्षी ला सतत राग येऊ लागला आणि आमच्या दोघांमधली भांडण वाढत गेली आणि रागात साक्षी माहेरी निघून गेली.

पण वेळ निघून गेली होती, सुयश ला त्याची चूक कळल्यावर तो साक्षी ला आणायला गेला तिच्या माहेरी पण साक्षी ने साफ नकार दिलं ती म्हणाली आयुष्यभर मला तुमच्या बंधनात राहायचं नाही आणि माझ्या मुलीला पण मला असलं जगणं द्यायचं नाही आहे त्यामुळे मी सासरी येणार नाही.

सुयश ची चूक त्याला कळली पण वेळ हातातून निघून गेली होती, सुयश च्या वागण्यामुळे तो मुलीच्या आणि बायकोच्या प्रेमाला ही कायमचा मुकला...

नमस्कार.- सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( देवरुख - रत्नागिरी )

🎭 Series Post

View all