सुवासिनीं तृप्त झाली

Suvasin
नवरात्री चालू झाल्या तश्या रेखा ताईंना प्रश्न पडला होता की ह्या वेळी कोरोनाचा काळात कोण सुवासिनी येणार घरी आणि माझा नवस कसा पूर्ण होईल ,कशी सोय होईल ,कसा नवस सिद्धीस जाईल. आता तर घरी कोणाला बोलवायचे म्हणजे कठीणच आहे .घरात आभा ही नव्हती त्यांची मुलगी, ना काम वाली जिला त्या बऱ्याचदा सुवासिन म्हणून आमंत्रित करत.जसे जसे दिवस जवळ येई तसे तसे त्यांचे मन त्यांना खात, कारण ह्या सुवासनी त्यांच्या नवऱ्याच्या आजरातून बरे होण्यासाठी घालण्याचे देवीला कबूल केले होते. आता काय करणार हे सुचेना त्यांना. तितक्यात त्यांना आठवले ,आपली सुनबाई रेणुका आहे तिला बोलवू. पण आठवले आपण किती तरी तिचा राग राग करत असतो, तिच्या मनात माझ्याबद्दल तर हया राग राग करण्यामुळे खूप द्वेष निर्माण झाला असेल.
मागच्या दसऱ्याला सगळ्यांना जेवायला बोलवले होते तेव्हा ती समोर येऊन ही मी तिला माझ्यातील तिच्याबद्दल असलेली रागामुळे मी तिला बोलवले नव्हते. तिने माझ्याकडे तेव्हा ही आशाळभूत नजर टाकली होती, तिला ही वाटले होते की सासूबाईने मला माफ करावे ,निदान प्रसादासाठी तरी मला बोलवावे, माझी ही ओटी सगळ्या सुवासिनी प्रमाणे भरावी, मला ही ते हळद कुंकू लावून मन द्यावा ,त्या 2 मिनिटात मला तिच्या मनातले कळले हे तिला ही कळले होते. पण कोणास ठाऊक मला का हिम्मत नाही झाली तिला बोलून ओटी भरण्याची ,शेवटी तीच माझ्या घराची लक्ष्मी आहे, तिलाच माझ्या नंतर हा वारसा चालू ठेवायचा आहे, तिच्या पावलांनी हे घर दिव्य करायचे आहे, जसे मुख्य सासू बाईने मला हाथ धरून सगळे सोपस्कार शिकवले आणि मी ते आज पर्यंत जपले तसे तिला ही मी हे देणे भाग आहे, होते, आणि असणार मग हा मनातील दुरावा अजून किती जपायचा, जर मी सुवासिनी जेवायला बोलवले तर हा दुजाभाव काय म्हणून मी करत आहे. कुठे फेडणार हे पाप .देव तरी मला माफ करेन का. जेव्हा मनात घाण असेल तेव्हा देवापर्यंत ही भक्ती हा नवस पोहचेल का.
तिकडे ती आस धरून असेल आणि मी लोकांना देव मानून एक सुवासीनीला जाणून बुजून त्रास देते हे कितपत पुण्य असणार.

आज पुन्हा काही तरी चुकल्या सारखे वाटत होते सकाळपासून सासूबाईला ,आदिनाथ ने जेव्हा लग्नाची बातमी सांगितली होती तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती, आई चा गुणी मुलगा साधी गाडी घेत तर तो आईला विचारून घेत होता, पगार झाला की आईच्या हातात आणून देत होता, खर्चाला पैसे हवे तरी आईला मागत होता, मग त्याने अचानक हा निर्णय का घ्यावा, तो ही love marriage चा, मुलगी कोण कुठली का कधीच कळू दिले नाही आणि फक्त सांगून गेला होता 12 वाजता लग्न आहे court मध्ये या, तुमचे आशीर्वाद हवेत. हे बोलणं झालं का, ही रीत झाली का लग्नाची ,आणि बायको करून आणली तर आणली ती येताच तिला वेगळ्या घरात घेऊन गेला. आज जसे रिकामे रिकामे वाटत होते, उदासी भरली होती मनात तसेच त्याने न सांगता केलेल्या लग्नामुळे झाले होते, जीवनाला अर्थ उरला नव्हता. त्या नवऱ्याचा bp शूट झाला होता, मरता मरता वाचले होते, तो ही आला धावून पण त्याचे कारण ही तोच तर होता ना, त्याच्या ह्या वागण्यामुळे हे घडलं होत ना, त्यात ती नवी नवरी ती ही तितकीच जबाबदार होती ना, मग कसे माझे मन होईल तिला घरी बोलवायचे ,कशी तिला मी लक्ष्मी मानू मी .

पण आज त्यावर मीच माती टाकणार होते, आणि पुन्हा नव्याने सुरुवात करणार होते, मी तिला सून तर माणणारच नाही हे त्यांनी ठरवले होते. पण जे झाले ते भूतकाळ होता, कटू म्हणाल हवा तर.

आज सासूबाईने ठरवले तिला सून मानतांना त्रास होतो तर का नको तिला मी माझी सुवासिनी मानून घरी आणू, ज्याने तिच्याकडे बघाण्याचा माझा दृष्टीकोन बदललेल आणि तिला ही हक्काची आई मिळालेल जी राग राग करणार नाही. ती तशी ही बिन आईची पोर आहे ,थोडा जीव लावला तर मनात जागा ही करता येईल.
आई म्हणून मला ही तिचे कोड कौतुक करता येईल.

त्यांनी सुनेला हाक मारली, आणि तिला कळले नाही क्षणभर की त्याच हाक देत आहेत, त्या सासुबाई मलाच बोलवत आहेत. दोनदा हाक मारल्यावर तिला विश्वास बसला, तिला गगना इतका आंनद झाला. सासूबाईने तिला तिला घरी बोलवले. ती ही हसत आनंदी मुखाने आली, घर जून ती येताच भरून निघाले, लक्ष्मी आली घरी घरची.

तिला सुवासनी आणि त्याच्या नवसाबद्दल सांगितले. ती आज घरातील सुवासिनी आहे हे ही तिला समजले, आज दोघींच्या ही आनंदाला पारा नव्हता. ती लगेच पदर खोचून कामाला लागणार इतक्यात सासूबाईने तिचा हात धरला आणि म्हणाल्या ,तू आज माझी सुवासिनी आहेस, देवीचे रूप आहेस आणि आज तू एकही कामाला मदत करणार नाही .आज तुझी तृप्ती महत्वाची आहे.
तुझ्या कृपाशीर्वादाने घर भरून जाणार आहे .

तिला जणू आई दिसत होती त्या हक्काच्या बोलणाऱ्या सासुबाई मध्ये, याआधी कोणी ही प्रेमाने असे बोलले नव्हते तिला कधी.

ताट वाढले, तिची पूजा केली ,तिला तिचे आवडे सगळे ताटात वाढले होते, आज तो खऱ्या अर्थाने मनसोक्त जेवण करत होती, आंनद वाहत होता तिच्या चेहर्यावरुन ,ते पाहून सासुबाई ही सुखावली होती, त्यांना ही तृप्त तृप्त झाल्या सारखे वाटत होते.?

आता त्यांनी ठरवले होते ही माझी सुवासिनी कायमस्वरूपी ,ही माझी तृप्ती .