संसारा वर आलेले सावट......

Sutka


कशी आहेस सानू ’ मोबाईलवर आलेला मेसेज वाचून सानिका विचारात पडली.

‘मला अशा नावाने  हाक मारणारा कोण असेल? परेश तर नसेल ना? पण, त्याच्याकडे माझा हा नंबर कसा असेल? त्याला आठ वर्षांनंतर माझी आठवण  कां आली, पूर्वी जे होते ते सर्व कधीच संपले आहे. सानिका विचार करत  गॅलरी मध्ये बसून राहिली.

परेश तिचा भूतकाळ होता… कॉलेज मध्ये असताना परेश तिच्या आयुष्यात होता. तिचा भूतकाळ होता परेश...दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. परेश चे तिच्यावर खूप प्रेम होते.

परेश चे तिच्यावरील प्रेम पाहून सुरुवातील सानिका ला स्वत:चा खूपच अभिमान वाटायचा. इतके प्रेम करणारा प्रियकर असल्यामुळे सानिका हि खुश होती. पण हळूहळू परेश च्या प्रेमाचे हे बंधन तिला बेडयांप्रमाणे वाटू लागले. 

सानिका कॉलेज मधल्या कोणत्याही मुलाशी बोललेलं परेश  ला आवडत नसे. सानिका एखाद्या मुलाशी बोलली तरी  ते परेश ला सहन होत नसे. त्यानंतर त्याच्या रुसण्याचा आणि सानिका ने त्याची समजूत काढण्याचा क्रम नित्याचाच होत असे. असाच परेश दोन दोन दिवस रुसून बसायचा.

सानिका त्याची समजुत काढायची. त्याने बोलावे यासाठी मनधरणी करत बसायची … स्वत:ची काहीही चूक नसताना माफी मागायची. तेव्हा कुठे परेश राग विसरून शांत व्हायचा.

मात्र त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी सानिका ला त्याने चुकून कुठल्या मुलाबरोबर बोलताना जरी बघितलं तरी पुन्हा रागाने रुसून बसायचा.

हळूहळू सानिका च्या मनात त्याच्या अशा वागण्यामुळे भीतीने घर केले. इतर कुणाशीही बोलताना ती घाबरून जायची. तिचे सर्व लक्ष याकडेच असायचे की, परेश आपल्याला असे बोलताना पाहात तर नाही ना…तो बघत नसेल ना, त्याने बघितले तर … त्याची समजूत कशी काढू… त्याला काहीही कारण सांगितले तरी त्याला ते पटणार नाही...

अखेर कॉलेज चे  शेवट चे वर्ष संपायला आले असताना सानिका ने हे नाते तोडण्याचा निर्णय घेतला. तिला हे चांगल्या प्रकारे माहिती होते की, तिच्या या निर्णयामुळे  परेश दुखावला जाईल.

पण जर आता ती  भावनांमध्ये गुरफटली तर भविष्यात अजून अडचणी वाढतील.  परेश च्या संशयी स्वभाव काही बदलणार नाहीं हा सर्व विचार सानिका ने केला आणि तिने ह्या नात्याला पूर्णविराम दिला. परेश  ला सांगितल्यावर त्याने खूप गोंधळ घातला, तु असं करू चं कस शकतेस, मी तुझ्या शिवाय राहू शकणार नाहीं, वैगरे असं बरेच तो सानिका ला बोलला. पण सानिका तिच्या निर्णयावर ठाम  राहिली.

कालांतराने सानिका ने  तिच्या वडिलांच्या पसंतीच्या मुलाबरोबर आनंद बरोबर लग्न केले. मागील आठ वर्षात  खूप काही बददले होते. सानिका एका मुली ची आई झाली होती.

एका शाळेत सानिका टीचर  म्हणून जॉब ला होती.  तिच्या संसारात ती छान रमली होती. सुखी होती.

पण आज अचानक परेश च्या आलेल्या या मेसेज मुळे ती घाबरून गेली.

पुढील  पाच सहा दिवस कुठलाच मेसेज पुन्हा आला नाही. तरीही सानिका परेश कडे दुर्लक्ष करू शकत नव्हती. तिला त्याचा सनकी स्वभाव चांगल्या प्रकारे माहीत होता.

त्यानंतर बरोबर सात दिवसांनी ती तासिका संपवून स्टाफ  रूममध्ये बसली होती आणि तेवढयातच तिचा मोबाईल वाजला. फोन परेश चा चं होता. तिने घाबरतच तो उचलला.

हॅलो सानू...मी परेश बोलतोय.

‘‘मी तर तुला एक क्षणही विसरू शकलो नाही… तू मला कशी विसरू शकतेस सानू ’’ परेश म्हणाला.

सानिका नुसतं ऐकत  राहिली.

वर्षे लोटली… पण एकही दिवस असा गेला नाही जेव्हा तूझी आठवण आली नसेल… आणि तू मला विसरलीस? पण हो, एक गोष्ट नक्की… तू अजूनही तशीच दिसतेस… मी तुला फेसबुक वर बघितलं आहे.

 परेश काही बाही बोलत राहिला., दुसरीकडे सानिका ला काय करावे तेच सूचत नव्हते. आपल्या सुखी संसारा वर हे विपरीत सावट आले, भविष्यावर संकट आल्याचं तिच्या लक्षात आलं.

दिवसेंदिवस परेश  च्या मेसेज चीं संख्या वाढतच चालली होती. सानिका ब्लॉक करू शकत होती, पण तिला माहीत होते की, …परेश रागीट आहे खूप, रागाच्या भरात  न जाणो कोणते पाऊल उचलेल जे तिच्यासाठी धोकादायक ठरेल, उगाच घरी येऊन काहीही तमाशा  करेल, याची तिला भीती होती.

पण , ती त्याच्या कुठल्याच मेसेजला उत्तर देत नव्हती. स्वत:हून त्याला फोनही करत नव्हती. पण परेश चा फोन उचलत होती, जेणेकरून त्याचा पुरुषी अहंकार दुखावला जाणार नाही. 

फक्त हा, हा म्हणत फोन कट करायची.  परेश नेच बोलण्याच्या ओघात तिला सांगितले होते की, ज्या दिवशी तिचं लग्न झाले त्याच दिवशी त्याने आत्महतेचा प्रयत्न केला होता.  तीन वर्षे तो प्रचंड नैराश्यात होता.

 त्यानंतर कसेबसे त्याने स्वत:ला सावरले. आईवडिलांच्या आग्रहामुळे सुप्रियाशी लग्न केले, पण सानिका ला तो एक क्षणही विसरू शकला नव्हता. काही दिवसांपूर्वीच त्याची बदली या शहरात झाली इत्यादी…

परेश चे या शहरात असणे सानिका साठी त्रासदायक ठरत होते. ती शाळेत जाण्यासाठी निघायची तेव्हा एकदा तिचा पाठलाग करत तो शाळेपर्यंत आला होता. ती सतत याच काळजीत होती की, परेश ने काहीही चुकीचे वागू नये, ज्यामुळे तिला सर्वांसमोर मान खाली घालावी लागेल. तिच्या मनात  एक दोन दा हे हि आलं कि नवऱ्याला सांगून बघूया काय पण तो कसा रिऍक्ट करेल याची तीला भीती वाटत होती.

एकदा परेश  ने मेसेज केला मला तुला पुढच्या आठवड्यात बाहेर कुठंतरी  भेटायचं आहे असं.

‘ मला शक्य होणार नाही…असा सानिका ने रिप्लाय केला.

‘… जर तू आली नाहीस तर मी दिवसभर तुझ्या शाळेसमोर उभा राहीन,’’ असं परेश चा रिप्लाय आला.

सानिका बघू म्हणाली.

पण सहज सांगून ऐकणाऱ्यांपैकी परेश नव्हता. तो दर दोन दिवसांनी कधी मेसेज तर कधी फोन करून भेटण्यासाठी पूर्णिमावर मानसिक दबाव आणत होता.

त्याच आठवड्याच्या सुरवातीला तिच्या शाळेच्या प्रशासनाकडून तीला सांगण्यात आले की, तिला एका  प्रशिक्षण शिबिरासाठी 8 दिवस मुलांना घेऊन जायचे आहे. ती मनातून खूप खुश  झाली. परेश ला भेटण्यापासून वाचविल्याबद्दल  सानिका ने नियतीचे मनोमन आभार मानले.

‘‘मी पुढचा पूर्ण आठवडा शहराबाहेर आहे,’’ सानिका ने पहिल्यांदाच परेश च्या मेसेज ला उत्तर दिले.

‘‘कृपा करून माझ्यासोबत इतक्या कठोरपणे वागू नकोस… काहीही करून तुझे जाणे रद्द कर… फक्त एकदा शेवटचे माझे म्हणणे ऐक… त्यानंतर मी असा हट्ट कधीच धरणार नाही,’’ परेश ने मेसेज पाठवला.

यावेळी मात्र सानिका ने कुठलेच उत्तर दिले नाही.

‘‘कुठे जाणार आहेस, एवढे तर सांगू शकतेस ना?’’ परेश ने पुन्हा मेसेज केला.

नाहीं सांगणार मी कुठं जातं आहे ते, 

‘ परेश तुला काय हवे आहे? स्थिरावलेल्या पाण्यात दगड मारण्याचा प्रयत्न का करीत आहेस? जर वादळ उठले तर खूप काही नेस्तनाबूत होऊन जाईल,’’ असा सानिका ने मेसेज केला. त्यानंतर परेश ने तीला 2 वेळा कॉल केला पण तिने फोन उचलला  नाहीं.

काहीतरी करावेच लागेल… पण काय? नवऱ्याला सर्व सत्य सांगू का? नाही नाही, पतीचे पत्नीवर कितीही प्रेम असले तरी इतर कुणी तिच्यावर प्रेम करीत आहे, हे त्याला कसे सहन होणार… तर मग काय करू?  सानिका विचारात पडली.

पुढच्या महिन्यात परेश चा वाढदिवस होता.  परेश पुन्हा एकदा त्या दिवशी तीला शेवटचे भेटण्याचा हट्ट करू लागला. सानिका त्याच्या मेसेजेसना प्रतिसाद देत नव्हती. मात्र  परेश वर त्याचा काहीच परिणाम होत नव्हता. त्याचे प्रयत्न सुरूच होते.

त्याचवेळी तिच्या डोक्यात एक कल्पना आली आणि तिने तिच्या कॉलेज मधल्या  2,3 मित्रांना कॉल केले आणि एका मित्राकडून परेश च्या बायको चा मोबाईल नंबर मिळवला.

आणि तीला कॉल करून सांगितले कि मी परेश  चीं जुनी मैत्रिण बोलत आहे आता परेश  ज्या शहरात बदली करून आला आहे तिथे चं ती राहत आहे, ती त्याच्या बायकोला म्हणाली कि परवाच परेश  भेटला होता तुझ्या बद्दल खूप बोलत होता, तुझी खूप आठवण  काढत होता.

तर तु पुढच्या  महिन्यात दिवस त्याचा बर्थडे आहे तेव्हा इकडे येऊन त्याला सरप्राईझ देना, त्याला मस्त एका हॉटेल मध्ये भेटायला जाऊन एन्जॉय करा तो दिवस, पण हा प्लॅन तु परेश  ला सांगू नकोस हा. परेश चीं बायको पण तयार झाली. तीला मस्त वाटले हा प्लॅन ऐकून. आता सानिका चं टेन्शन गेलं होत.

तिने परेश ला मी तुझ्या बर्थडे च्या दिवशी भेटायला येते असा मेसेज केला. आणि त्या दिवशी कधी आणि कुठे परेश  ला सरप्राईझ द्यायचे तो मेसेज पण त्याच्या बायकोला केला.

ठरल्याप्रमाणे परेश चीं बायको त्याला भेटायला आली. परेश सानिका ने मेसेज मध्ये लिहिलेल्या ठिकाणी तिची वाट पाहत बसला होता आणि अचानक त्याच्या समोर त्याची बायको गेली. परेश  बाचकला. तिने हॅपी बर्थडे म्हंटले. अरे तु इथे कशी परेश  ने प्रश्न केला. ती म्हणाली तुम्हाला सरप्राईज द्यायला आले.

परेश च्या लक्षात आले हे काम सानिका ने चं केल आहे, आता तो पुरता घाबरला.

तेवढ्यात सानिका ने त्याला मेसेज केला. कि परेश  मी आज तुझा  संसार बिघडवू शकत होते पण मी तस केल नाहीं कारण मला तुझं घर उध्वस्त करून काहीही मिळालं नसतं, कारण त्यामुळे तुझ्या मुलाच्या भविष्यावर त्याचा परिणाम झाला असता.

तुझी बायको हे सत्य समजल्यावर जशी वागली असती तसंच कदाचित माझा नवरा हि वागला असता. कदाचित … त्याने मला चरित्रहीन समजावे असे तुला वाटत होते कां.

त्यावर परेश चा रिप्लाय आला.

‘‘नाही, कधीच नाही. मला माफ कर सानू...तुला गमाविणे हे मला माझे अपयश वाटत होते आणि ते यशात बदलण्यासाठी मी कुठल्याही थराला जायला तयार होतो. मी फक्त माझ्याच बाजूने विचार करत होतो.

सानिका  ने जवळजवळ सहा महिन्याने सुटकेचा निःश्वास सोडला.

अशाप्रकारे सानिका आपल्या संसारावर आलेले सावट स्वतःच दूर केले.

नमस्कार... सौ. सोनल गुरुनाथ शिंदे ( रत्नागिरी )