श्रीने जवळ जाऊन पाहिलं तर अनन्याच्या हृदयाचे ठोके बंद पडले होते. तो तिच्यावर छातीवर डोकं ठेऊन रडू लागला. पहाट होता होता पुन्हा अंधार झाला आणि काही वेळात उजाडलं. अनन्या निष्प्राण होऊन निपचित पडली होती. उजाडताच श्रीला अनन्याच्या हृदयाचे ठोके पुन्हा ऐकू येऊ लागले. तसा तो उठला आणि त्याने मित्रांच्या मदतीने तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. तिची एकूण अवस्था बघता नेमका काय प्रकार झालाय हे डॉक्टरांनाही उमगत नव्हतं. शेवटी तिला ऍडमिट करून घेतलं. तिच्या हृदयाचे ठोके चालू होते. पण ती अजून बेशुद्ध होती.
डॉक्टरांचे प्रयत्न सुरु होते, तिला शुद्धीवर आणायचे पण उपयोग शून्य. रात्र झाली, रात्री बारा एक च्या सुमारास एक नर्स अनन्याच्या वॉर्ड समोरून जाताना तिला एक विचित्र प्रकार दिसला, दिवसभर बेशुद्ध असणारी, त्राण नसणारी अनन्या, आता कोणाशीतरी बोलत होती, मध्येच रडत होती, मध्येच हसत होती. पण समोर कुणीच नव्हतं.
तिने लगेच जाऊन हा प्रकार डॉक्टरांना सांगितला. झाल्या प्रकाराचा तिच्यावर परिणाम होऊन ती अशी करत असेल, असा प्राथमिक अंदाज होता. पण मन काहीतरी वेगळं खुणावत होतं. डॉक्टर तिच्या वॉर्ड मध्ये गेले, तिला झोपेचं इंजेक्शन देण्यासाठी. पण ती डॉक्टरांना आवरत नव्हती. तीन चार नर्स आल्या. ती एवढ्या जणांनासुद्धा आवरत नव्हती. अखेर कसंबस तिला झोपेचं इंजेक्शन दिलं. पण आता तर ती जास्तच खवळली होती. स्वभावाने शांत अनन्या अशी का करतेय, हे कोडं श्रीला आता काही करून उलगडायचंच होतं. त्याने तज्ञाची मदत घेतली. डॉ. निधी म्हणजेच अनन्याची मावस बहीण. तिला तातडीने श्रीने बोलावून घेतलं.
आपल्या बहिणीसाठी तीपण निघून आली. तिने श्रीकडून सगळा आजपर्यंतचा वृतांत ऐकून घेतला. तिने तिच्या बॅगेतून काही जुने फोटो काढले आणि श्रीला दाखवले. ते फोटो बघून तिने यापैकी कुठल्या व्यक्तीचा फोटो कधी अनन्या जवळ पाहिला आहेस का, असं विचारलं. जुन्या काळातला तरुण मुला मुलींचा फोटो होता तो. त्याने नाही असं सांगितलं.
श्री, अनन्याला कुणीतरी मुद्दाम नाही तर हेतूपर छळतंय. पण कोण??, श्रीने विचारलं. तिची आई.
"पण ती तर"..- श्री
"हो, मावशी देवाघरी गेलीये." - निधी
"पण त्या का छळतील?? " - श्री
सगळं सांगते.
"तू आधी अनन्या शुद्धीवर आली का ते बघ. " - निधी
"आपल्याला उद्याच मुंबईला जायचंय. " - निधी
" अनन्याला या अवस्थेत कसं नेणार?" - श्री
दुसऱ्या दिवशी सगळेच मुंबईला निघतात. अनन्या सोडून. त्या घराजवळ पोहोचतात, जिथे काही वर्षांपूर्वी गेट टूगेदर रंगलेलं असतं.
"काही बोलू नका." - निधी
आतून बोलण्याचा, हसण्याचा आवाज येत असतो. अगदी माणसं बोलतायत असा. पण प्रत्यक्षात ती एक जळमट लागलेली वर्षानुवर्षं बंद असलेली खोली असते.
"हे अनन्याचं बालपणीचं घर. " - निधी
आजही इथे दर अमावस्येला गेट टूगेदर होतं. त्या दिवशी विभा म्हणजे अनन्याची आई, तिची अपुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून मेल्यानंतर आपल्या बालपणीच्या मित्राना बोलावते, नाचाच्या धुंदीत विभाचा म्हणजे मावशीचा त्या सगळ्यांना स्पर्श होतो आणि ते तिथेच मृत पावतात. तेव्हापासून आजही इथे गेट टूगेदर होतं.
विभा मावशीचा अनन्यावर जीव होता पण काकांच्या स्वभावामुळे आणि नोकरीमुळे तिला तिच्यासोबत वेळ घालवता आला नाही. कदाचित म्हणूनच ती आता अनन्यासोबत वेळ घालवण्यासाठी, तिचा तो बालपणीचा हरवलेला चिमुकला स्पर्श अनुभवण्यासाठी तरसतेय.
विभा मावशीचा अनन्यावर जीव होता पण काकांच्या स्वभावामुळे आणि नोकरीमुळे तिला तिच्यासोबत वेळ घालवता आला नाही. कदाचित म्हणूनच ती आता अनन्यासोबत वेळ घालवण्यासाठी, तिचा तो बालपणीचा हरवलेला चिमुकला स्पर्श अनुभवण्यासाठी तरसतेय.
आज जिथून हे सगळं सूरू झालं तिथे आपण तिला विनंती करूया, की तू अनन्याला सोड. सगळे हात जोडून विनंती करू लागतात, तोच एक आवाज येतो.
"बाळांनो, माझ्या मुलीला त्या चांडाळ माहिपासून वाचवण्यासाठी मला तिला त्रास द्यावा लागला. श्रीच्या पार्टीच्या दिवशी माहीने अनन्याला मारण्याचा कट रचला होता, तो उधळून लावण्यासाठी मला हे करावं लागलं. मी आता तिला त्रास देणार नाही पण जेव्हा कधी तिला माझी गरज पडेल तेव्हा मी तिच्यासाठी येईन. " - विभा
आईचं मुलीवरचं प्रेम मेल्यानंतरही न संपलेलं बघून सगळ्यांचेच डोळे पाणावले.