कोण असेल ती व्यक्ती जिचा फोटो घेऊन अनन्या रडत होती. हल्ली अनन्याचं रात्री अपरात्री घरी येणं वाढत चाललं होतं. दिवसेंदिवस गूढ वाढत होतं. आणि एक दिवशी श्रीराजचा अनन्याला फोन आला आणि त्याने दोघीनाही पार्टीचं आमंत्रण दिलं. दोघीपण छान तयार होऊन पार्टीला गेल्या. अनन्याला आतून कसलीतरी भीती वाटत होती. माही पार्टीत चांगलीच रमली. माहोल पार्टीच्या वातावरणाने भरला होता. बाराच्या सुमारास अचानक लाइट्स बंद झाले, गाणं बंद झालं. आधी सगळ्यांना वाटलं कि, लाइटचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. पण नंतर जे पाहिलं त्याने सगळ्यांनाच धक्का बसला.
ठप ठप पायऱ्यांवरून आवाज करत, हातात रक्ताने भरलेला चाकू घेऊन, घामाने चिंब झालेली, केस विस्कटलेली अनन्या बघून सगळेच घाबरले. आपण वाईट स्वप्न बघतोय की सत्य अनुभवतोय, हेच कोणाला कळत नव्हतं. तिचं एकेक पाऊल पुढे येणं, मध्येच छिद्मी हसणं थरकाप उडवणारं होतं.
तिने तिच्यासोबत काहीतरी ओढत आणलं होतं, अंधारामुळे ते नीट दिसत नव्हतं. ती पार्टीतल्या एकेका माणसाकडे जायची, त्याचा हात हातात घेऊन काहीतरी तपासून बघायची आणि मग सोडून द्यायची. असं रात्रभर चालू होतं. श्रीराजला काय करावं काही कळत नव्हतं.
पहाट झाली, तशी अनन्या आत निघून गेली. तिने सोबत ओढत आणलेली वस्तू आता जरा स्पष्ट दिसत होती. श्रीराज ने जवळ जाऊन पाहिलं तर ती दुसरी तिसरी कुणी नसून अनन्याच होती. त्याला शब्दच फुटत नव्हते. मग रात्री जिला पाहिलं ती कोण होती, अनन्या की अमानवी शक्ती. पण तिने का मारलं असेल साध्या सरळ अनन्याला की अनन्या जिवंत आहे, आणि आपल्याला भास होतायत. श्रीराज पुरता गोंधळून गेला होता.
झपाटलेली इमारत चा हा पुढील भाग आहे. काही तांत्रिक अडचणी मुळे त्याच नावाने हा भाग प्रकाशित करता येत नाहीये म्हणून नाव बदलत आहे.
खूप महिन्यानी भाग लिहिलाय. दिरंगाई बद्दल क्षमस्व. पुढचा भाग लवकरच येईल. वाचून नक्की कळवा कसा वाटला ते.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा