सुशीला भाग २

बाईचा जन्म साधा नसतो
“सुशीला “

आधीच्या भागात……
सुशिलाच्या घरी गेलेली शालीनी दोन तास झाले तरी अजून परतली नव्हती म्हणून जयसिंग काळजीत पडला. स्वभावाने थोडीफार तापट असलेली शालिनी जुळायच्या आधीच तोडायला मागे पुढे पाहणाऱ्यातली नव्हती म्हणून जयसिंग ला टेन्शन आले होते…


पुढे…..


तब्बल दोन तासांनी शालीनी देवी डोळ्यासमोर अवतरली आणि जयसिंग ने सुटकेचा निःश्वास सोडला.पण आपल्या बहिणीमुळे सुशिलाच्या घरच्यांना त्रास तर झाला नसेल ना? आपली बहीण आहेच तापट त्यांनी जर लग्नाला नकार दिला असला तर ही बया त्यांच्याशी भांडून तर आली नसेल ना?एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात कालवाकालव करू लागले. जशी शालीनी जवळ आली तसा तिचा निर्विकार आणि किंचित निराश मुद्रा जयसिंग च्या काळजावर थेट वार करून गेल्या.
“आपण लवकर सांगून चूक तर केली नाही ना?” त्याचं अंतर्मन त्याला विचारू लागले.

“नाही नाही आपण सांगितलं नसतं आणि दुसरे कुणी तिला मागणी घातली असती तर…आपण तिला कायमच गमावलं असत.. कदाचित आक्कानेच काहीतरी गलफत केली असेल, त्यामुळे कदाचित त्यांनी नकार दिला असेल..” जयसिंग मनातल्या मनातच आपल्या मनाला समजुत घालत होता.

जयसिंग कडे रागाने बघतच शालीनी स्वयंपाक घरात गेली.आणि इकडे जयसिंग च्या चेहऱ्यावर बारा वाजले. बहिणीच्या चेहऱ्याने सुशिलाच्या घरचा नकार असल्याचे स्पष्ट संकेत दिले …

“जया…आर् तुझ्या मनासारखं झालं बघ…”शालीनी मूठभर साखर जयसिंग च्या तोंडात कोंबत बोलली.

“आ,, आ,, क्का” त्याला सरळ बोलताही येईना आपल्या बहिणीने साखर भरवली म्हणजे आपल्या मागणीला होकार आलाय हे पाहून त्यालाही आश्चर्य वाटले.

“ आर..खा तोंड गोड कर आधी…मी सगळ ठरवून आलिया..” शालीनीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

“आक्का, नक्की नव्हं?”

“व्हय, जया उद्या चार माणसं घेऊन पोर बघायचा कार्यक्रम आटोपून घे.. आईला आजच बोलावून घेऊ..”

“अग्ग, आक्का थोडा धीर धर की,आधीच जीवाला घोर लागलेली तू गेल्यापासून थोड सावरू दे मला”

“जया,तू बस निवांत आता काय करायचं ते सगळ मी करणार …आज लई खुश हाय मी माझ्या भावाच्या लग्नात कसली म्हणून कसूर ठेवणार नाय मी..” शेवटी मोठी बहीणच ती.. धाकट्या भावाचे लग्न म्हटल्यावर आनंद तर होणारच..!

शालीनीचा आनंदाला पारावार नव्हता. दिवसभरात चार घरात जाऊन पोरगी बघायला मोठी मंडळी म्हणून काही जणांना सांगून ही आली .आईला आणायला नामदेव ला लागलीच पाठवलं आणि मुलीला खन नारळाची ओठी सार काही ती जुळवाजुळव करण्यात व्यस्त झाली.

एका खोलीत खाटेवर पडून जयसिंग भावी सुखी संसाराची स्वप्ने बघत पडलेला. सुशीलाला लग्न झाल्याबरोबर मुंबईला घेऊन जायचच अस त्यानं मनोमन ठरवलं होतं. उद्या पहिली भेट होणार म्हणून तिच्याशी काय बोलायचं ?या विचारात गढलेलेला असतानाच आईचा आवाज त्याच्या कानावर पडला. शालिनी बरी पण आईचा राग म्हणजे आसमंत दणाणून सोडणारा होता.त्यात एक दिवस राहून परतनारा जयसिंग दोन दिवस राहिलेला आणि आताच इथली मुलगी पसंत करून उद्या सुपारी फोडायला निघालेला.. नाहीतर मुंबईत राहून नेहमी आपल्या मनाप्रमाणे जगून घेणारा.तेवढाच आई आणि बहिणीवर जीव असलेला जयसिंग लग्न करतोय म्हंटल्यावर जयसिंग ची आई भलतीच खुश झालेली.पण आई म्हणून लेकाला चार शिव्या सूनवण्यासाठी जणू तोंडाची धारधार तलवार घेऊन आलेली.अन् हे साहेब सुशीला सोबत लग्नाची सुपारी फुटायच्या आधीच रोमान्स मध्ये मश्गूल असलेले…चेहऱ्यावर एकदम खुशी आणि स्वप्नात असूनपन हसत हसत लाजनाऱ्या जयसिंगला पाहून त्याच्या आईने डोक्यावर हात मारून घेतला.आईच्या आवाजाने सगळ घर जमा झालंय तरी या साहेबाना साधी जाग देखील आलेली नव्हती.

तिथंच एका स्टुलावर पाण्याने भरलेला ताब्या होता.रागाच्या भरात आईने तो पाण्याने भरलेला तांब्या जयसिंगच्या अंगावर रिकामा केला.अन् स्वप्नाच्या दुनियेत रममाण झालेल्या जयसिंगची गाडी अलगद चार भिंतीच्या खोलीत परतली.थंड पाणी अंगावर पडताच दचकून जागा झालेला तो.. ऐन उन्हाळ्यात पाऊस पडतोय की काय असा असा प्रश्न त्याला पडला.क्षणभर आपण आपण घरात आहोत याची जाणीव झालेली.पण चेहऱ्यावर असलेली त्याची खुशी काही जास्त वेळ टिकली च नाही कारण समोर रागाने फणफणत बसलेल्या आपल्या आईकडे बघून क्षणभर तो ही लटपटू लागला..


“अग,आई कधी आलीस तू..?”

“आत्ताच आलिया “

“व्हय व्हय..मग काय खुश हाईस नव्हं?”जयसिंग लाडात बोलला.

“व्हय तर…माझ्या काळजाच्या तुकड्यांन कुठली दिवटी हुडूकली कुणास ठावं “


“गप्प ग, दिवटी म्हणे…लाखात एक सून हाय तुझी..बघशील तर मिठीच मारून बसशील..”


सुशीला आणि जयसिंग ची सुपारी फुटणार का? सुनेला बघितल्यावर जयसिंगच्या आईची काय प्रतिक्रिया असेल…?पाहू पुढच्या भागात…

क्रमशः…


©®सविता पाटील रेडेकर.



🎭 Series Post

View all