सुर्यास्त (चित्रकाव्य)

सुर्यास्त (चित्रकाव्य)

चित्रकाव्य

*सुर्यास्त*


मावळत्या रविचा नजारा
खुलवी केशर पिवळ्या छटा,
प्रतिबिंब पाहताच डोकवून
कवेत घेती सागर लाटा.

पंख पसरुनी उंच झाडे,
पाण्यामध्ये राहली उभा,
निळ्या नभाच्या छताखाली
निसर्ग सौंदर्या आली शोभा.

अथांग जलाशया पलिकडे
निघाला रवि डोंगराआड,
कारतवेळीच्या सौंदर्याने
तृप्त होती मनाचे कवाड.

सुर्यास्ताची चढता लाली
नभ पंघरुन खुलली सांज,
डोळे भरुन मनात टिपावे
दृश्य सुरेख हे दिसते आज.
-------------------------------
सौ.वनिता गणेश शिंदे©®

🎭 Series Post

View all