सुर्य नारायण!!

The Sun
हे सुर्य नारायणा
दया कर रे आम्हांवरी
बरसू दे ना रे
वर्षाच्या आता सरी

अंगाची झाली लाही
गरमीने सुचेना काही
घामाने भिजले अंग
सोसवत आता नाही

अशाच का तापत आहेस
तुला काय काम दुसरे
घरी बायको नाही का
तीच्या कडे पण बघ ना रे

एवढी उष्णता बरी आहे का
खाली माणूस बघ करपला
रंगभेद होता आधी जगात
आता एकची रंग झाला

असंच चालू राहिले तर
बाहेर पडणार नाही कोणी
कोरोना नंतर तुझ्याच नावाचं
लॉकडाऊन जगात बघ होई

थोडं कमी रागाव
जरा थंडपणा दे की
नसेल जमत तर मग
काही दिवस रजा घे की

तुझ्या मुळे चंद्र पण लपला
शीतलता त्याची झाली कमी
बाप लेकाच्या भांडणात
धरणी माय जास्तच तापली

बस झाला आता उन्हाळा
येऊ दे लवकर पावसाळा
दूर झालेल्या सर्व नात्यात
निसर्ग आणेल मग जिव्हाळा

बहरेल ती निसर्ग कन्या
उजळून येईल ते डोंगर
काळेभोर दाटता मेघ तेव्हा
नाचत राही जीवाचा मोर

----**----**----**----**----**----