Mar 01, 2024
प्रेम

सरप्रायझिंग प्रेम

Read Later
सरप्रायझिंग प्रेम

सरप्रायझिंग  प्रेम

 
रात्रभर प्रसादच्या डोळ्याला डोळा काही लागेना. झोपच नव्हती लागत त्याला अंथरुणातून ग्यालरीत आणि ग्यालरीतून अंथरुणात. डोक्यात सतत एकच विचार  "कधी हि रात्र सरेल ? आज वेळच का ती सरत नाही भरभर ? एक शक्ती हवी होती रात्रीचा दिवस करायची एका चुटकीत ?" एव्हडा उतावीळ होऊन दिवस उजाडायची वाट पाहणारा प्रसाद शेवटी सकाळ होता होताच गाढ झोपी गेला होता. आता सकाळचे नऊ वाजून गेले होते. प्रसादाची आई प्रसादला उठवायला त्याच्या रूम मध्ये गेली तर तिने तिथे प्रसाद ला खुर्चीतच झोपलेला पाहिलं. ती वैतागली आणि म्हणाली "आजकालच्या मुलांचं काही लक्षण नाही ठीक, रात्रभर टी.व्ही. आणि मोबाईल बाकी काही नको." आईने प्रसादला आवाज दिला उठ आता, बघ किती वाजलेत घड्याळात, सूर्य डोक्यावर आलाय", प्रसाद जागा झाला आणि ओरडला "बापरे.. नऊ वाजले, आई मला आज लवकर का नाही उठावलंस", आई म्हणाली "कधी तू रोज लवकर उठतोस जो आज उठणार होतास, आणि आज असं काय आहे खास". प्रसाद म्हणाला तुला नाही कळणार, प्रसाद थोडा नर्वस झाला होता, पटापट अंघोळ वगैरे आटोपून हॉल मध्ये आला आणि त्याच्या बाईक ची चावी उचलत आई ला म्हणाला "आज मला नाश्ता नको, मी बाहेरच खाईन काही तरी , येतो ग लवकर". आई पुन्हा डोक्यावर हात मारत म्हणाली "काय म्हणावं बाई या पोराला".

प्रसादच इंजिनिअरिंग पूर्ण झालं होत आणि तो घरापासून जवळच एका कंपनीत कामालाही होता. प्रसादला आज सुट्टी होती कारण आज रविवार होता आणि रविवार म्हणजे त्याचा हक्काचा दिवस. म्हणजे रिफ्रेशमेंटचा. प्रसादच रिफ्रेशमेंटचा फंडा काही वेगळाच होता. दार रविवारी त्याच्याच एरियातल्या एका मूकबधिर मुलांच्या शाळेत जाऊन त्या मुलं बरोबर खेळायचा, एन्जॉय करायचा आणि त्यांच्यातच राहायचा आणि तसेत त्या शाळेतल्या मुलांनाही तो खूप आवडायचा. त्या मूकबधिर शाळेतच त्या मुलांचं हॉस्टेल होत. ती मुलं खूप दूर दूर वरून तिथे ऍडमिशन घेऊन राहत आणि शिकत होती. त्या मुलांचे पालक हे रविवार सोडून इतर दिवशी त्या मुलांना भेटायला येत असत असा त्या शाळेचा नियमच होता पण हा प्रसाद मात्र दार रविवारी त्या शाळेत येऊन त्या मुलांसोबत खूप खेळायचा. त्याच मुलांमधला एक मुलगा त्या प्रसादला खूप आवडायचा. तो मुलगा बारा वर्षाचा असेल. त्याच नाव सोहं होत. सोहं हा त्या शाळेतील सगळ्या मुलांपेक्षा थोडा वेगळा होता. कारण बिलकुल ऐकू येत नसल्या कारणाने तो बोलू शकत नव्हता आणि त्यातच त्या सोहमला लहानपणीच पोलिओ झाला होता. त्यामुळे त्याला कुबडी घेऊन चालावं लागत. पण हा सोहम खूप सय्यमी आणि जिद्दी होताच आणि तसाच तो स्वावलंबीहि होता. कोणतीही गोष्ट तो कोणाचाही सहारा न घेता करण्याचा प्रयत्न करायचा. आणि वर्गातही तो खूप मन लावून अभ्यास करायचा. सतत सर्व शिक्षक त्या सोहंचीच तारीफ करत आणि त्या सोहंचच उदाहरण सर्व मुलांना देत असत.

आज या सोहमचा वाढदिवस आहे आणि तो मस्त साजरा करावा अशी हि इच्छा सगळ्या शिक्षकांची आणि या प्रसादचीही होती. सगळ्यांना सोहमला सरप्राईझ द्यायचं होत.आणि हे सरप्राईझ कस द्यायचं आणि हा वाढदिनिवास कसा साजरा करायचा हे सगळं काम प्रसाद कडे होत. प्रसाद खूप क्रेझी असतो अशा गोष्टींचा. आणि हे जर आपल्या आवडत्या आणि जवळच्या माणसासाठी करायचं असेल तर त्याला झोप ती लागत नाही.

सोहंच्या वाढदिवसासाठीची पूर्ण तयारी हि प्रसादने रात्रीच करून ठेवली होती. आणि त्या प्रमाणे त्याने केकची ऑर्डर हि दिली होती.

प्रसाद सकाळी घरातून गाडी घेऊन निघाला तो थेट सोहमच्या शाळेत. आणि आज प्रसाद जसा नेहमी सगळ्या मुलांबरोबर खेळतो तसाच खेळात होता आणि तो रामालाही होता त्यांच्यात. सगळ्यांचं ठरल्या प्रमाणे आज कोणीही सोहमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नव्हत्या. सोहम खूप नाराज होता. त्याला सतत वाटत होत, शाळेतल्या सगळ्या मुलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळतात नेहमी, पण मला आज कोणी का शुभेच्छा देत नाही. त्याला वाटलं कि बहुतेक सगळे विसरले असतील म्हणून त्याने त्याचा खास मित्र प्रसादही बोलता बोलता इशाऱ्याने एक हिंट दिली होते, सोहम इशाऱ्यात म्हणाला प्रसादला, "आज तुझा वाढदिवस आहे काय? प्रसाद इशाऱ्यातच म्हणाला "नाही रे..अजून यायचाय. प्रसाद पुन्हा थोडा विचार करत करत विचारलं "का रे ? तुला असं का वाटलं ? आज काही आहे का खास ? सोहम पुन्हा हिरमुसून मन हलवून "नाही का नाही " असं म्हणून शांत झाला. प्रसादने सोहमचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या मित्रांना सर्व सजावटीची कामे अंगावर दिली होती आणि त्यांच्या प्ल्यानिंग प्रमाणे प्रसादने सोहम आणि सर्व मुलांना शाळेच्या मैदानावर खेळात गुंतवून ठेवले होते. जवळ जवळ सगळी तयारी झाली होती आणि त्याचे अपडेट हे प्रसादला त्याचे मित्र सतत देत होते. दुपारचे बारा वाजले होते. जेवणाचीही तयारी झाली होती. आज सोहमचा वाढदिवसानिमित्त जेवणाचा मेनू हि खास ठेवण्यात आला होता जो नेहमी सोहम ला आवडतो, पुलावभात, गुलाबजाम आणि आईसक्रीम.

होस्टेलच्या ऑफिसच्या दरवाजावरची बेल वाजली, तिथल्या शिपायाने दरवाजा उघडला तर त्याच्या समोर दरवाजात एक मुलगी उभी होती , तिचे वय साधारण वीस एकवीस असावे. तिने तिचे नाव स्नेहल असे सांगितले. ती या आधी कधी आली नव्हती या हॉस्टेल मध्ये. स्नेहल हि सोहम ची मोठी बहीण होती ती पण सावत्र. स्नेहल हि तिच्या आई बरोबर वेगळी राहते आणि सोहम हा तिचा एकुलता एकच पण सावत्र भाऊ आहे. सोहमच्या आईला हि स्नेहल बद्दल वाईट वाटायचं आणि ओढही होती. सोहम तीला फक्त ओळखायचा बहीण म्हणून बाकी आणि काही जवळीक नव्हती दोघांच्यात कधी.स्नेहल हि इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात होती. ती आज खास सोहमला भेटायला आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला आली होती. तिथे स्नेहल ने सोहमलाभेटण्याची इच्छा सांगितली आणि रिक्वेस्ट हि केली कारण तीला तिथे जाऊन कळालं होत कि रविवारी पालकांना मुलांना भेटण्यास मनाई आहे. सोहमचा वाढदिवस असल्या कारणाने आणि सोहम बरोबर तिझ नात समजून होस्टेलच्या अधिकाऱ्याने तीला सोहमला भेटण्याची परवानगी दिली. प्रसाद सोहम आणि इतर मुले खेळात असतानाच शिपाई सोहम साठी निरोप घेऊन आला कि सोहंचे कोणी पालक आलेत सोहमला भेटण्यासाठी, हे ऐकताच प्रसाद थोडा गडबडला कारण थोड्याच वेळात सोहमला सरप्राईझ द्यायचं होत वाढदिवसाचं आणि त्यात हे सोहंचे पालक आले होते.

प्रसाद सोहमला घेऊन कार्यालय जवळ आला तिथे प्रसादने पाहिलं कि एक सुंदर मुलगी बसली होती त्याने तीला पाहिलं आणि तो जागीच तिच्यावर भाळला होता. प्रसादने तिथे जाऊन जाणलं कि ती व्यक्ती सोहंची सावत्र बहीण आहे आणि ती सोहमच्या वाढदिवसानिमित्त त्याला भेटायला आली होती. सोहमने स्नेहलला पाहताच त्याच्या डोळ्यात पाणी तरळले आणि ते पाहून स्नेहालचाही आसवांचा बांध फुटला. प्रसादने प्रसंगावधान राखून स्नेहलने सोहमला शुभेच्छा देण्या आधीच त्या स्नेहाला इशाऱ्याने बाजूला बोलावून सोहम साठी प्लॅन केलेल्या सरप्राईझ बर्थडे सेलीब्रेशन संदर्भात तीला कल्पना दिली. स्नेहल खूप खुश झाली होती कि तिच्या भावासाठी कोणी एव्हडं क्रेझी होऊन झगडतय. पुन्हा ती सोहमला जाऊन भेटली पण तिने काही सोहमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत आणि आणलेले गिफ्ट हि. सोहम पुन्हा नाराज झाला इशाऱ्यातच स्नेहल बरोबर काही गुजगोष्टी तो करत होता आणि ती हि त्याच्याशी. थोड्याच वेळात मैदानावरची मुले कॅन्टींग कडे जाताना सोहम ने पहिली. प्रसाद हि त्याच्या जवळून गायब झाला होता. सोहमच मन खूप दुखी झालं होत.

स्नेहल आणि प्रसादाचे ठरल्याप्रमाणे स्नेहल सोहमला इशाऱ्यातच म्हणाली "मी निघते मला उशीर होतोय, तुझी जेवणाची वेळ झाली असेल ना ? चल तुला तुझ्या कॅन्टींग पर्यंत मी सोडते आणि मग मी निघते" सोहम अंग झटकून इशाऱ्यातच तीला म्हणाला "मी जाईन माझा मी, तू जा " स्नेहल ने पुन्हा सोहमला समजावलं कि मी सोडते तुला कॅन्टींग पर्यंत आणि मगच जाते"

अजून सोहमच्या साधं ध्यानी मनीहि काही नव्हतं. स्नेहल सोहमला हळू हळू कॅन्टींगच्या दरवाजापाशी घेऊन गेली आतून दरवाजा कोणीतरी हळूच उघडला, सोहमने आत कॅन्टींगमध्ये पाहिलं तर पूर्ण कॅन्टींगला सजवलेली होती वेगवेगळ्या कलरच्या फुग्यांनी. सोहम दरवाजातून आत पाय ठेवताच त्यावर चकमकीचा वर्षाव झाला होता. सोहमला विश्वासच बसत नव्हता त्याच्या डोळ्यांवर. सर्व मुलांनी, शिक्षकांनी आणि प्रसादने ओरडून एकसाथ सोहमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सोहम आणि स्नेहल या दोगांनाही या सगळ्यांच्या प्रेम बद्दल अप्रूपच वाटलं होत. थोड्याच वेळात केक कापून वाढदिवस साजरा झाला आणि सगळ्यांचं जेवणही झालं. सगळे कशे खूप खुश होते. प्रसाद हा वाढदिवस साजरा होत असताना सतत स्नेहलला चोरून चोरून पाहत होता आणि हे कॅन्टींग मध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने तसेच सोहम आणि स्नेहल सगटजाणले होते. थोड्याच वेळात स्नेहल घरी जायला निघाली तेव्हा सोहम पुन्हा उदास झाला आणि तसेच प्रसादच्याही तोंडावरचा रंग उडाला होता. स्नेहल निघत निघत सोहमने प्रसादला जवळ बोलावून त्याची ओळख स्नेहल बरोबर करून दिली. ओळख करून घेताना दोघेही गालातल्या गालात हसून लाजत होते. स्नेहल प्रसादाचे सारखे खूप आभार मनात होती कारण प्रसादने तिच्या भावासाठी जे काही केलं होत ते आज खूपच भावनापूर्ण होते. स्नेहल जेव्हा सोहमला भेटायला आली होती आणि त्याच वाट पाहत कार्यालयात बसली होती तेव्हा तिथल्या अधिकाऱ्याने या प्रसाद बद्दल सर्व गोष्टी सांगितल्या होत्या स्नेहलला. तिथेच स्नेहलच्या मनात प्रसादबद्दल आपसूकच आदर आणि प्रेम निर्माण झालं होत. प्रसादवर प्रथमदृष्टीतच ती भाळली होती. स्नेहल घरी निघताना तिने प्रसादकडे एकदाच पाहिलं आणि ती त्याला नजरेने खूप काही सांगून गेली. सोहम आणि प्रसाद हे स्नेहल कडे एकटक बघत होते तेवड्यात तिने सोहंकडे पाहताना चोरून प्रसादकडे पाहिलं होत आणि सोहमच्या बहाण्याने इशाऱ्यातच सांगितलं कि " माझा मोबाइलला नंबर हा विझिटर रजिस्टरमध्ये आहे, कॉल करायला विसरू नकोस " आणि ती पुन्हा गालातच लाजून निघून गेली प्रसादला सरप्रायझिंग प्रेम देऊन. 

आता प्रसाद हा यापुढे कोणती रात्र झोपणार आहे हे त्यालाच माहित, कारण यापुढे रोजच काहीतरी सँपेशल आणि सरप्रायझिंग असणार होत त्याच्यासाठी.

  


मी अजय मनोहर म्हात्रे (अलिबाग)
 
मनातल्या विचारांना एका रूप देण्याचा एक साधासा प्रयत्न करत असतो सतत...
तुम्हाला जर हा प्रयत्न आवडला असेल तर लाईक करून माझ्या नावासहित शेअर करा...
तसेच तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया कमेंट्स करायला विसरू नका..  

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//