सूर तुझे लागता…-१३

एका चांदनीचा तिच्या प्रकशापर्यंतचा प्रवास...
विस्कटलेले केस… हलकी चुरगळलेली साडी… मुठीत घट्ट पकडुन असलेली रातराणी पकडुन ती तशीच धावत त्याच्या घराकडे निघाली. बाहेर बघितलं तर त्याची गाडी होती. तिथेच तिचा बांध फुटला. तशीच पळत पळत ती वर निघाली. वर जाऊन धाडकन तिने दार आपटल…

नेमका त्याच वेळी ओजस फोन वर बोलून गॅलरीतून बाहेर आला.

त्याला समोर बघून तिने त्याच्याकडे झेप घेतली. त्याला वाटलं एवढी रडते आहे… एवढी पळत आली आहे त्याच्यासाठी… त्याने आनंदाने हात पुढे केले… तिला मिठीत सामावन्यासाठी…

पण ती अधरा होती…


पळत जाऊन त्याच्यासमोर थांबली आणि सनकन् कानाखाली दिली आणि त्याची कॉलर घट्ट पकडुन त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू लागली.

"समोरही येऊ नका पुन्हा… तुम्ही आणि तुमचं काम… खड्यात जा!", रडत असूनही कणखर आवाजात ती म्हणली… हुंदके आवरत न्हवते… नीट श्वास घेता येत न्हवता… कपाळावर हलका घाम जमा झाला होता… हात थरथरत होते… पण त्याहीपेक्षा राग आला होता…

2 मिनटे सर्वच शांत झालेलं… तिचे अविरत हुंदके फक्त तिथे घुमत होते. तिने त्याची कॉलर सोडली मागे वळली आणि चालायला लागली. दरवाजापर्यंत गेली असेल आणि ओजस पटकन समोर आला. मागे हात करून त्याने कडी लावली.

"बाजूला सरका…"

"शिस्तीत सांगतेय मी बाजूला व्हा… जाऊद्या मला… मला नाही थांबायचंय इथे… बाजूला…", तिचे पुढचे शब्द अर्धवटच राहिले कारण तो तिचे डोळे पुसत होता.

"सरका बाजूला…", ती हात झटकून म्हणली… एवढ्यात तर राग नक्कीच जाणार न्हवत! थोडे प्रयत्न अजून करावे लागणार होते…

तिचे हुंदके काही कमी होत न्हवते… ओजसने तिला तसच हात पकडुन बेडवर बसवलं आणि तो तिच्या पुढ्यात खाली जमिनीवर बसला… तिचे दोन्ही हात घट्ट पकडुन तिच्या मांडीवर अलगद डोकं टेकवले. ती अजूनही रडत होती… तिच्या शरीराची थरथर वाढू लागली तसा गुढग्यावर बसून तो तिला शांत करू लागला.

"अधरा शांत हो ना राणी… नको ना रडू…"

"कोण राणी… कोणी राणी नाहीये इथे… माझ नाव अधरा आहे…"

"आता हे पण रडून सांगायची गरज आहे का… किती रडणार अजून, बस ना! आलोय ना मी… बघ इकडे… हवं तर अजून एक कानाखाली मार…", असं म्हणून त्याने तिचा हात गालावर ठेवला. तो थरथरणारा हात त्याच्या गालाला लागताच तिला जोरात हुंदका दाटून आला आणि ती तशीच त्याला बिलगली…

जग जिंकल्याची भावना हीच असते का…

ओ रंगरेज़…
ओ रंगरेज़ तेरे रंग दरिया में…
ओ रंगरेज़ तेरे रंग दरिया में…
डूबना है बस तेरा बन के…
हाय नहीं रहना दूजा बन के…

एक भी साँस अलग नहीं लेनी…
एक भी साँस अलग नहीं लेनी…
खैंच लेना प्राण से तन के…
हाय नहीं रहना दूजा बन के…

"अधरा…"

"नाही बोलणारे मी तुमच्याशी… बाय", ती मिठी सोडून उठली. एवढा वेळ रडण्यात गेल्याने आपण काय केलं ह्याच भान होतच कुठे… जेव्हा आलं तेव्हा तर ती मिठीत होती! वरवर रागवून उठली असली तरी मनात लाजेचे हजारो तरंग उठले होते…

ती तशीच उठून आरशाजवळ जाऊन उभी राहिली… साडी आणी केस नीट करून दाराकडे निघाली आणि तशीच पुन्हा ओढल्याने आरशाजवळ आली.

"काय आहे… पदर का ओढलात… जाऊद्या मला… स्वतः कुठून कुठून फिरून आलेत देव जाणे!", ती आरशात त्याला बघत होती पण त्याची ती नजर तिला काही सुचू देत न्हवती. उगाच पोटात फुलपाखरं उडल्यासारख झालं…


"असं कसं जाऊद्या… बाहेरून कोणी दमून आलं की काही खायला द्यायचं असत… तशी कानाखाली खाल्ली मी… पण खरंच भूक लागलीये आता जरा…", ओजस तसाच तिच्या पदराशी खेळत बोलत होता… नजर मात्र तिच्यावरच होती…

"मग मला का सांगताय… घ्या बनवून आणि खा… असंही कोण आहे मी…"

"माझी रातराणी…!", ओजस क्षणाचाही विलंब न करता म्हणाला.

"अधरा…", त्याने तिला हळूच आवाज दिला…

"हम्म्म…"

"छान दिसतेस… लाल रातराणी!", ओजस हलक जवळ येऊन तिच्या कानाजवळ पुटपुटला…

आणि वाऱ्याच्या वेगाने अधरा खाली पळून गेली…


अपने ही रंग में मुझको रंग दे…
धीमे-धीमे रंग में मुझको रंग दे…
सौंधे-सौंधे रंग में मुझको रंग दे…
रंग दे ना, रंग दे ना, रंग दे ना…!


🎭 Series Post

View all