ओजसला जाऊन आज तीन दिवस झाले होते… अधरा नेहमीप्रमाणे कॉलेज, अभ्यास, परीक्षा, काम यात गुरफटून गेली होती… अंगणातल्या चाफ्यापासून झालेली तिच्या दिवसाची सुरुवात, शेवट ही तिथेच करून जायची…
सर्व जणू शांत झाले होते… अगदी शांत… चाफ्याला जणू तिच्या अश्रुंचं पाणी पुरेसं होतं!
"अधरा…", त्याने डोळे मिटून अलगद सध्या दिली. अस्ताला जाणारा सूर्य, त्याला कवेत घेणारा समुद्र, घोघांवणारी हवा आणि शांत उभा तो…
जबाबदारीच्या ओझ्यात गुरफटलेला तो अगदी असहाय्यपणे उभा होता. आता या क्षणी तिची खूप आठवण येत होती. तीन दिवस झाले, तिचा आवाज कानावर पडला न्हवता. काही व्यक्ती आपल्या आयुष्यात वर्षानुर्षांपासून असतात पण तरीदेखील काल भेटल्या त्या एका व्यक्तीसोबत आपले ऋणानुबंध एवढे जुळतात की आपला आनंद आपण तिथे जगू लागतो.
"अधरा काय करत असशील ग… खूप रागावली आहेस ना माझ्यावर… आवडेल पण मला तुझा रुसवा घालवायला… माझी रातराणी… माझीच आहेस… स्वतःच्या आधीपासून… येईन मी लवकरच तुझ्याजवळ… वाट बघ माझी…"
"का एवढी उचकी लागतेय आज… कोण एवढी आठवण काढत आहे… ओजस असतील का… त्यांना कशाला आठवण येतेय… गेले मला सोडून… जाऊदे अदू… नको एवढा विचार करुस… सारेच आपल्या मनासारखे नाही होत… ना कोणी कायम राहत… जसे आले तसे गेले पण… पण खरंच खूप सवय लागलेली हो तुमची… त्या चाफ्याला बघून हुंदका दाटून येतो नुसता… या ना लवकर…"
आजची सकाळ फारच धावपळीची होती. कॉलेजमध्ये मराठी दिनाचा कार्यक्रम होता. छानशी पैठणी नेसून अधरा तयार झाली. डोळ्यात काजळ घालताना उगाचच डोळे दाटून आले त्याच्या आठवणीत… गजरा कुशीत घट्ट कवटाळला तिने… आणि पुन्हा केसात माळला.
आज एवढी घाईगडबड असून पण उगाच हुरहूर दाटून येत होती. सकाळपासून ओजसला खूप कॉल करून झालेले… स्विच ऑफ ऐकून पण मन मात्र ऐकायला तयार न्हवत. गजाऱ्याच्या बाजूला चाफा मळून उगाचच मनाची समजूत काढण चालू होतं. पुन्हा एकदा स्वतःला आरशात बघून ती निघाली.
कॉलेजमध्ये सर्वांनी तिला सुंदरतेची टिप्पणी दिली. कार्यक्रम अगदी उत्तमरित्या पार पडला. सर्व आवरून ती चारच्या दरम्यान घरी पोहोचली. दिवसभर उभ राहिल्यामुळे अगदी दमून गेली होती….
केसातला गजरा आणि चाफा काढून केस मोकळे सोडून तशीच सोफ्यावर कलंडली. राहून राहून तो जरा कोमेजलेला चाफा लक्ष वेधून घेत होता. त्या दोन चाफ्याचा फुलांना स्वतःच्या मुठीत घट्ट आवळून तिने हृदयाशी धरलं. फोन चालू करून तिने गाणे चालू केलं आणि डोळे मिटून बसली…
केसातला गजरा आणि चाफा काढून केस मोकळे सोडून तशीच सोफ्यावर कलंडली. राहून राहून तो जरा कोमेजलेला चाफा लक्ष वेधून घेत होता. त्या दोन चाफ्याचा फुलांना स्वतःच्या मुठीत घट्ट आवळून तिने हृदयाशी धरलं. फोन चालू करून तिने गाणे चालू केलं आणि डोळे मिटून बसली…
ये रातें अब नहीं धड़कती…
दिन भी सांस नहीं लेते…
अब तो आ जाओ मेरे सोनिया…
बातें रह गयी अधूरी…
मेरे लबों पे ज़रूरी…
आके सुन जाओ मेरे सोनिया…
तेरे बिन..
नहीं लागे जिया…
तेरे बिन..
अब तो आजा पिया…
तेरे बिन..
नहीं लागे जिया…
शांत झोपलेली ती हलक्याशा चाहुलीने जागी झाली. डोळे उघडुन नीट बसली. केस वर बांधताना अजून घट्ट बंद असलेली मूठ उघडली गेली आणि त्यातून दोन फुले बाहेर पडली….
पण, ती तर रातराणी होती…
तिने फोन बघितला तर गाणीसुद्धा बंद झाली होती…
हळू हळू सर्व प्रकार लक्षात येताच… तिचे डोळे भरून आले आणि तू जोरातच हुंकरली….