"अधरा, किती शांत झोपली आहे ही! बर झालं आज मी लवकर आलो. घाबरवून सोडलं होतं मला हिने… कोमेजून गेलेय माझी रातराणी… रोज अशी बहरलेली बघायची सवय आहे ग तुला… सुगंध होऊन आली आहेस तू माझ्या आयुष्यात! माझी स्वीट वेडी… बालपणीची एखादी मैत्रीण भेटल्यासारखं वाटतं तुझ्याकडे बघून… सहज आपली खोडी काढणारी, खळखळून हसणारी, स्वतःच्याच विश्वात रमणारी, लगेच बवरून जाणारी, निरागस, सालस आणि प्रसन्न…! कधी कधी वाटत समजायला लागलो आहे तुला, पण क्षणात अस सुद्धा वाटत की तू अनोळखी आहेसच कुठे… फार जवळची आहेस तू… एखादी बालिश, प्रेमळ मैत्रीण… जिला मी सगळं सांगू शकतो… अगदी सर्व! अधराsss… वेड केलं आहेस तू मला!"
"अधरा, ए बाळा… उठ चल, आलो आपण!"
"आलो पण…",अधरा डोळे किलकिलत उठत म्हणाली.
"हो, थांब इथेच मग जाऊ घरात… मी आलोच गाडी लावून!"
अधरा मग तो गाडी लावेपर्यंत झोपाळ्यावर जाऊन बसली.
"चल आत, हवेवर नको बसू…"
"छान वाटतंय इथे…"
"हो माहितेय, पण ताप वाढेल… बरी झालीस की बस!"
"हम्म…"
"काय खायचं आहे तुला, सांग बनवतो…"
"नाही जात जेवण…", अधरा बारीक तोंड करून म्हणाली.
"मी बनवतो, खाऊन तर बघ…"
"ठिके…"
"झोप आलीये का बाळा ?"
"नाही पण एकदम असं शांत बसावं वाटतंय…"
"वर जातेस की इथेच बसतेस…?"
"वर जाते… इथे नको!"
"ठिके चल…"
"अहो… गॅलरीत बसू…?"
"थंडी वाजतेय ना…?"
"बसते ना…"
"बरं जा…"
"झोपाळ्याचं वेड काही कमी होणार नाही…"
अधरा झोपाळ्यात जाऊन बसते. ओजस कपाटातून तिला शाल काढून देतो.
"नको ना शाल…घातला आहे ना मी स्वेटर"
"तरी पण घे वरून, नाहीतर आत बस…"
अधरा तिथेच तोंड फुगवून बसली.
"अवघड आहे!"
ओजसने जाऊन तिला शाल पांघरून दिली. तिने मात्र त्याच्याकडे बघितलेसुद्धा नाही…
"तशी कॅडबरी आणली आहे मी, पण जाऊदे… इथे कोणी खाईल, असं वाटत नाही मला…"
तो असं म्हणल्यावर, अधराने हळूच मान वर करून त्याच्याकडे बघितले तर तो इकडे तिकडे बघून खाली जायला निघत होता. तिला तरी असेच वाटले!
"अहो…", अधराने त्याला आवाज दिला तरी तो तसाच न वळता हळूहळू पावले टाकीत खाली निघाल्याचं भासवत होता. अधरा पटापट चालत त्याच्या समोर येऊन लहान तोंड करून उभी राहिली.
"अहो…"
"माझ्याशी बोलतेयस…?", ओजसने हे विचारल्यावर तिने हळूच वरखाली मान हलवली…
"अहो…"
"पुढे बोल आणि सरक मला जाऊदे खाली…"
"अहो…"
"पुढे…"
"मला…"
"हा…"
"मला ना…"
"पुढे…"
"मला चॉकलेट हवंय!", अधरा धीर एकवटून लहान आवाज पटकन बोलली. ओजसला कळालं होतं ते…
"काय, कळालं नाही गं मला…", तो हे म्हणाला तशी अधराने हळूच मान वर केली. तिचे डोळे भरलेले होते…
"अगं… रडायला काय झालं… मस्करी करत होतो बाळा मी… हे धर! असं नाही रडायचं सारखं सारखं…", ओजस पटकन तिला कॅडबरी देत म्हणाला. त्याने कॅडबरी दिल्यावर तर अजूनच रडू आलं अधराला…
"काय झालंय बाळा… खूप आठवण येतेय का आईची ?", तो तिचे डोळे पुसत म्हणाला.
"हम्म… ती.. ती पण मला अशीच चॉकलेट द्यायची मी आजारी असले की…", असं म्हणून ती पटकन ओजसला बिलगली. तिचं ते एवढं निरागस रडणं बघून, क्षणभर ओजसचे डोळेसुद्धा पाणवले… तो तसाच शांतपणे तिच्या डोक्यावर हात फिरवत होता….
मेहरबानी जाते-जाते मुझपे कर गया…
गुज़रता सा लम्हां एक दामन भर गया…
तेरे नज़ारा मिला, रोशन सितारा मिला…
तकदीर की कश्तियों को किनारा मिला…
गुज़रता सा लम्हां एक दामन भर गया…
तेरे नज़ारा मिला, रोशन सितारा मिला…
तकदीर की कश्तियों को किनारा मिला…
सदियों से तरसे हैं, जैसी ज़िन्दगी के लिए,
तेरी सोहबत में दुआएं हैं उसी के लिए…
तेरा मिलना है उस रब का इशारा मानो,
मुझको बनाया तेरे जैसे, ही किसी के लिए…
तेरी सोहबत में दुआएं हैं उसी के लिए…
तेरा मिलना है उस रब का इशारा मानो,
मुझको बनाया तेरे जैसे, ही किसी के लिए…
अधाराच्या मनात गाण्याच्या ह्या ओळी नकळत पिंगा घालत होत्या… आणि खरंच होतं की ते, नाहीतर आयुष्याच्या ह्या वळणावर \"तोच\" पुन्हा भेटणार ह्याची कल्पना तिला न्हवती… तो आला, रातराणीच्या आयुष्यात तिचा चाफा बनून… सुगंध होऊन… पुन्हा एकदा!
कुछ तो है तुझसे राबता…
कुछ तो है तुझसे राबता…
कैसे हम जानें, हमें क्या पता…
कुछ तो है तुझसे राबता…
कुछ तो है तुझसे राबता…
कैसे हम जानें, हमें क्या पता…
कुछ तो है तुझसे राबता…
ती गाणं आठवत होती आणि तो… रातराणीच्या सुगंधात स्वतःचं अस्तित्व तयार करत होता… त्याच्याही नकळत!
तुम्हारी मेहेक की जादू, धडकने बढा रही हैं…
तुम्हारी जुल्फों की नरमाई, रुह सवारने लागी हैं…
तुम्हारे पलकों के साये, उम्मीदे जगा रहे हैं…
तुम्हारे अनकहे लफ्झ, नजरों मैं उलझने लगे हैं…
कुछ ऐसा हैं हाल हमारा…
कुछ ऐसा हैं राज तुम्हारा…
कुछ हमारे मन ने कहा, सुनो तो…
कौंन हैं वोह चांद तुम्हारा…!
चांद की ख्वाहिश अब हमे कहा…
सवेरे की फ़िक्र अब हमे कहा…
हम तोह तुम्हारे नशे मैं हैं,
जन्नत कीं तम्मना अब हमे कहा…!
तुम्हारी जुल्फों की नरमाई, रुह सवारने लागी हैं…
तुम्हारे पलकों के साये, उम्मीदे जगा रहे हैं…
तुम्हारे अनकहे लफ्झ, नजरों मैं उलझने लगे हैं…
कुछ ऐसा हैं हाल हमारा…
कुछ ऐसा हैं राज तुम्हारा…
कुछ हमारे मन ने कहा, सुनो तो…
कौंन हैं वोह चांद तुम्हारा…!
चांद की ख्वाहिश अब हमे कहा…
सवेरे की फ़िक्र अब हमे कहा…
हम तोह तुम्हारे नशे मैं हैं,
जन्नत कीं तम्मना अब हमे कहा…!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा