सूर तुझे लागता… -९

एका चांदणीचा तिच्या प्रकाशपर्यंतचा प्रवास...


दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे ओजस जॉगिंगवरून परत आला तरी अधरा आज दिसली नाही. पाच मिनिटं थांबून त्याने वाट बघितली पण ती यायची चिन्हे दिसेनात तर तो आत निघून गेला. कदाचित ती आज लवकर गेली असावी या विचाराने तोसुद्धा आवरून निघून गेला.

अधराला सकाळी उठली पण अंगात थोडी कणकण असल्याने पुन्हा गुरफटून झोपून गेली. थोडं उशिरा जाग आल्यावर तिने रजेचा मेसेज टाकला आणि तशीच पडून राहिली. काही करायची इच्छा नसल्याने शांत झोपून होती फक्त… उठून एकदा खिडकीतून पलीकडे डोकावून बघितले तर त्याची गाडी दिसत न्हवती, म्हणजे तो कामावर गेला हे कळताच अजूनच मूड बिघडला. तशीच चिडत पुन्हा बेडवर येऊन झोपली. पुन्हा थोड्या वेळाने उठून आवरले आणि बाहेर गार्डनमध्ये जाऊन बसली. पण, रातराणीचा मूड काही ठीक होईना! तशीच मलूल होऊन सर्व घरभर फिरत होती. ना काही खाल्ले होते, ना औषध घेतले होते. थोड्या वेळाने गाणी ऐकत सोफ्यावर येऊन पडली. तिथे टेबलवर ओजसचा कालचा एक चित्र काढायचा ब्रश राहिला होता. कितीतरी वेळ एकटक त्या ब्रशकडे बघत बसलेली आणि मग तो हातात घट्ट धरून तशीच झोपीसुद्धा गेली.


ओजस आज थोडा बिझी होता. दुपारी जेवताना तिची आठवण आली पण एकमेकांचे फोन नंबर अजूनही दोघांकडे न्हवते. दुपारनंतर त्याचे काम आवरले आणि तो घरी निघाला. घरी येऊन फ्रेश झाला आणि अधराकडे गेला. दारावरची बेल वाजवली आणि उघडायची वाट बघत थांबला. दोन मिनिटे थांबून त्याने परत बेल वाजवली तरी काहीच प्रतिसाद नाही. तसं त्याने घाबरून चार पाच वेळा सलग बेल वाजवली.

अधराचा ताप एव्हाना वाढला होता. थंडीने कुडकुडत तशीच ती सोफ्यावर पडून होती. बेलच्या एकसलग आवाजाने ग्लानीतली ती हळूहळू उठून दरवाजाकडे जाऊ लागली. थोडा वेळ त्या कडीशी झुंजल्यावर, तिने कडी उघडली तर समोर ओजस…

"अधरा, बाळा काय होतंय ?"

"अंग… दुखतंय… थंडी… भूक… अहो…", एवढं बोलतानासुद्धा अधराला दम लागत होता.

"तू चल आत आणि एवढं सगळं होतंय तरी सांगितलं का नाही…"

"फोन नंबर…", अधरा तोंड बारीक करून म्हणाली.

"बरं ठिके, स्वेटर कुठेय तुझा… किती थंडी वाजतेय, आणि जा तोंड धुवून ये."

अधरा मान डोलावून वर निघाली.

"मी येऊ सोबत, चालायला जमतंय… राहूदे तू, बस इथे मीच आणतो. सांग रु कुठे आहे ते…"

"कपाट… खालचा कप्पा…"

"बर, ठिके… बस आता इथे शांत मी आलोच!", असं म्हणून ओजस वर निघून गेला आणि ती जाणाऱ्या ओजसला भरल्या डोळ्यांनी शांत बघत होती.

थोड्या वेळाने तो खाली आला आणि तिला स्वेटर दिला. तोंड धुवून तिला थोडं गरम दूध प्यायला दिले. ती दूध संपवेपर्यंत त्याने पटकन खिचडीभाताचा कुकर लावला आणि तिच्या जवळ येऊन बसला.

"अधरा काय गं तू अशी… एवढं सगळं होतंय आणि तशीच बसलीस एकटीच घरी… फोन कुठे आहे तुझा ?"

तिने टेबलाकडे बोट दाखवले आणि तो उठून फोन घेऊन आला.

"पासवर्ड…?"

"STARLIGHT"

तिने पासवर्ड सांगितल्यावर त्याने फोनचे लॉक उघडून त्यात त्याचा नंबर सेव्ह करून फोन तिथे ठेवला.

"अधरा आता जेवून थोडं आवर, डॉक्टरकडे जाऊन येऊ!"

ती फक्त त्याच्याकडे डोळ्यात पाणी आणून बघत होती.

"आईची आठवण येतेय…?", ओजसने अलगद तिचा हात हातात घेत विचारले.

तिने भरल्या डोळ्यांनी हुंकार दिला आणि हाताची पकड घट्ट केली. पाण्याचा एक टपोरा थेंब तिच्या डोळ्यातून निसटून त्याने पकडलेल्या हातावर येऊन पडला. त्याने तो हात तसाच ठेवून दुसऱ्या हाताने तिचे डोळे पुसले आणि हलकेच डोक्यावर थोपटले.

भात तयार झाला तसा त्याने तिला खाऊ घातला आणि ती आवरून तयार झाली. त्याने तिचे घर लॉक केले आणि त्यांच्या घरी आले. अधराला खूप थंडी वाजत असल्याने बाईक न घेता त्याने कार बाहेर काढली आणि दोघे निघाले.

"अधरा, खूप थंडी वाजतेय का बाळा…?", त्याने गाडी चालवता चालवता तिचा हात घट्ट धरला आणि विचारले.

"हो…", ती मलूल चेहऱ्याने म्हणली.

"पोहोचू आपण लवकर, नाही जास्त लांब…", तो त्याच्या त्या गरम बोटांवर अलगद त्यांनी बोटे फिरवत म्हणाला. हाताची पकड अजूनही तशीच घट्ट होती…

"अहो…", थोड्या वेळाने अधराने हळू आवाजात म्हणाली.

"बोल ना…"

"गाणी लावू, प्लिज…"

"लाव ना, विचारतेस काय…"

आणि तिने हळू आवाजात गाणे लावले.

ये मोह मोह के धागे,
तेरी उँगलियों से जा उलझे…
ये मोह मोह के धागे,
तेरी उँगलियों से जा उलझे…
कोई टोह टोह ना लागे,
किस तरह गिरहा ये सुलझे…
है रोम रोम एक तारा…
है रोम रोम एक तारा…
जो बादलों में से गुज़रे…
ये मोह मोह के धागे,
तेरी उँगलियों से जा उलझे…
कोई टोह टोह ना लागे,
किस तरह गिरहा ये सुलझे…
तू होगा ज़रा पागल तूने मुझको है चुना…
तू होगा ज़रा पागल तूने मुझको है चुना…
कैसे तूने अनकहा,
तूने अनकहा, सब सुना…..

अधराने त्या ओळी ऐकून सहज त्याच्यावर नजर टाकली. तो शांतपणे गाडी चालवत होता. तिने एक नजर त्याने पकडलेल्या हातावर टाकली. जणू ते गाणं तिच्याच मनाचे प्रतिबिंब होते… फक्त ते होते सध्या एकतर्फी… ज्यात ती अलगद उतरत होती कारण हात त्याने पकडलेला, अलगद आणि घट्ट!

तू होगा ज़रा पागल तूने मुझको है चुना…
तू दिन सा है मैं रात,
आना दोनो मिल जाए शामों की तरह…
ये मोह मोह के धागे,
तेरी उँगलियों से जा उलझे…
कोई टोह टोह ना लागे,
किस तरह गिरहा ये सुलझे…
के तेरी झूठी बातें मैं सारी मान लूँ…
के तेरी झूठी बातें मैं सारी मान लूँ…
आँखों से तेरे सच सभी,
सब कुछ, अभी जान लूँ…

"ओजस… निशब्द आहे मी तुमच्यापुढे!", ती त्याच्याकडे बघून मनात विचार करत होती आणि त्याने तिच्याकडे बघून भुवई उंचावली.

"पोहोचू आपण पाच मिनिटांत… आलोय जवळ!"

तो काय बोलला, ह्याच्याशी तिला काही घेणेदेणे न्हवते.
ती फक्त मंद हसत होती… रातराणीचा सुगंधाप्रमाणे!

के तेरी झूठी बातें मैं सारी मान लूँ…
तेज़ है धारा,
बहते से हम आवारा…
आ थम के साँसे ले यहाँ…
ये मोह मोह के धागे,
तेरी उँगलियों से जा उलझे…
कोई टोह टोह ना लागे,
किस तरह गिरहा ये सुलझे…

डॉक्टरकडे जाऊन औषधं घेऊन ते पुन्हा घरी निघाले. एव्हाना रात्र झाली होती. सारेच शांत शांत होते, अगदी अधाराच्या मनासारखे…


आज फुलों की मेहेक कुछ ज्यादा ही नशिली थी…
पर अफसोस,
उनके आखों के नशे मैं हम पेहले ही धूत थें!

🎭 Series Post

View all