सूर तुझे लागता... - ७

एका चांदणीचा तिच्या प्रकाशपर्यंतचा प्रवास...

"अधरा, झोपलीस का…?",ओजसने मान वर करून तिला विचारले. ती त्याच्या डोक्यात हात फिरवत समोर नजर स्थिरावून बसलेली…

"अधरा…", त्याने पुन्हा साद दिली.

"हा…", या वेळी ती भानावर आली.

"काय झालं, कुठे हरवलीस ?"

"कुठे नाही…"

"झोप आली का…"

"नाही…", अधरा हळूच त्याच्याकडे नजर वळवून म्हणाली.

ओजसने पदरासाहित तिचा हात अलगद हातात घेतला आणि पुन्हा तसाच बसला… त्याच्या उष्ण, राकट हातांमध्ये तिचा हात एखाद्या छोट्या मुलीप्रमाणे भासत होता. डोळे मिटून शांत बसलेली ती दोघ पण एकमेकांचा सहवास अनुभवत होते…

थोडी सागर निळाई, थोडे शंख नि शिंपले…
कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले…
कधी उतरला चंद्र, तुझ्या माझ्या अंगणात…
स्वप्न पाखरांचा थवा, विसावला ओंजळीत…


"अहो, चला ना जेवून घेऊ…"

"नको, जा तू… मला झोप आलीये!", असं म्हणून ओजस तिथून उठला.

"ठिके…",असं म्हणून अधरासुद्धा झोक्यावरून उतरली आणि जायला निघाली.

घरी आली आणि किचन आवरायला लागली. चार वाजत आलेले… सर्व आवरून ती कॉलेजचं काम करायला बसली. दीड दोन तास गेले असतील आणि तिला स्वयंपाकघरातून आवाज आला. मांजर असेल म्हणून ती खाली बघायला आली तर खाली कोणीच न्हवतं! दारसुद्धा बंद होतं… स्वतःला भास झाला असेल म्ह्णून ती पुन्हा वर जायला वळली आणि जोरात किंचाळली.

"अगं मीच आहे, हळू…",ओजस हसत म्हणाला.

"तू… तुम्ही आत कसे आलात आणि असं कोणी घाबरवंत का… केवढ्याने दचकले मी…", अधरा त्याच्याकडे रोखून बघत म्हणाली आणि अचानक रडायला लागली.

"ए बाळा, काय झालं… एवढं काही नाही, मीच आहे ना… सॉरी!", ती रडायला लागली म्हणून ओजस भांबावला.

"रडू नको ना… काय झालं, एवढी का दचकलीस ?"

"काही नाही…", अधरा उलट्या हाताने डोळे पुसत म्हणाली.

"रडू नकोस ना मग… काय झालं एवढं रडायला…"

"काही नाही…", असं म्हणत परत रडू लागली.

"अधरा…", त्याने एक खोलवर साद दिली आणि क्षणात ती त्याच्या मिठीत गेली.

"मी…मी… मला भीती वाटते आई गेल्यापासून! नका ना घाबरवंत जाऊ असं… प्लिज…", अधरा हुंदके देत म्हणाली.

"ओके, ओके… सॉरी! शांत हो…",ओजस तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला.

ती शांत होई पर्यंत तिला थोपटत होता आणि ती तशीच उभ्याने झोपून गेली. तिचे वजन हळू हळू त्याच्या अंगावर येऊ लागली तसे त्याला जाणवले की ती झोपलेय…

बेधडक असणारे पोलीस ऑफिसर आज तिच्यासमोर मात्र मनाने हरले होते!

ती पूर्ण झोपेत आहे हे जसे त्याच्या लक्षात आले तसे त्याने अलगद तिला तिथेच सोफ्यावर झोपवले.

"आयुष्यात पहिल्यांदा एवढी निरागसता अनुभवतोय मी… किती निरागस आहे ही! रडायलाच लागली… तिचे हुंदके, ते छातीजवळ तोंड घुसळून रडणं… खरंच एवढ्या निर्मळ असतात मुली! आई नेहमी सांगायची, एखादी मुलगी जर हक्काने तुमच्या जवळ येतेय तर नक्कीच तिला मनातून तुमच्याजवळ सुरक्षित वाटते… अधराला पण वाटत असेल का… तिच्याकडे बघितलं की राहून राहून वाटतं हिच्याशी काहीतरी ऋणानुबंध आहेत माझे… खरंच असं काही असेल का… खरंच वादळ आहे ही, अचानक माझ्या आयुष्यात धडकलेलं! आई गेल्यापासून बोलायला जसं कोणी मिळालंच नाहीये… हीच आहे, माझी स्वीट वेडी…!", ओजस सोफ्यावर झोपलेल्या तिच्याकडे बघत मनातच बोलत होता…


साथ-साथ चलते चलते हाथ छूट जायेंगे,
ऐसी राहों में मिलो ना…
बातें-बातें करते-करते रात कट जायेगी,
ऐसी रातों में मिलो ना…..
क्या हम हैं, क्या रब है…
जहां तू है वहीँ सब है….
तेरे लब मिले मेरे लब खिले…
अब दूर क्या है जाना….
तेरे वास्ते मेरा इश्क़ सूफ़ियाना….
इश्क़ सूफ़ियाना….

साधारण आठच्या दरम्यान अधराला जाग आली. तिने डोळे उघडून आजूबाजूला बघितलं तर समोर शांतपणे खुर्चीत चित्र काढणारा ओजस दिसला. हवेत हलके उडणारे त्याचे केस, मग्न होऊन चित्र काढणारा तो… अजून काय हवं!

हळूच पावलांचा आवाज न करता ती खुर्चीच्या बाजूला जाऊन उभी राहिली आणि चित्र बघायला लागली. समुद्रकिनाऱ्यावर शांत बसलेली एक मुलगी आणि तिच्या बाजूला पहुडलेला एक मुलगा… हवेत उडणारे तिचे केस झोपूनच तो सावरत होता… दोघेही पाठमोरे होते… ते चित्र बघून अधरा तिथेच स्तब्ध झाली.

ती उठली तेव्हाच ओजसला समजलेले पण तिचं ते लहान मुलांसारखं वागणं बघण्याची संधी तो मुळीच सोडणार न्हवता. ती बाजूला येऊन एवढ्या तन्मयतेने चित्र बघत होती की त्याचे हात थांबले आहेत,हस देखील तिच्या लक्षात आले नाही. ती फक्त चित्र बघत होती आणि तो फक्त तिचं बाजूला असणं अनुभवत होता! तिचे ते मुजोर केस कानाला गुदगुल्या करत होते तरी तो शांत बसला होता…

पण त्या गोड गुदगुल्या असाह्यय झाल्यावर तो हळूच मागे वळला आणि अधराकडे बघितलं.

"आsssssss….", अधरा एकाएकी किंचाळली.

"अधरा काय झालं…?", ओजसने तिचं ते ओरडणं बघून तिचा पटकन हात धरला आणि पुढ्यातलं सामान बाजूला करून उभा राहिला. तोपर्यंत अधरा साडीत पाय अडकून धडपडली आणि ओजस हलकेच तिला पकडत पुन्हा खुर्चीवर मागे बसला गेला.

"अ… अहो…"

"काय ? काय झालं… का ओरडलीस एवढ्याने ?"

"अगं बोल…"

"ते… हे… म्हणजे तुम्ही अचानक वळलात मागे आणि मी चित्र बघत होते… मग मी दचकले…", अधरा गाणं गुणगुणल्यासारखी त्याला सांगत होती आणि तो शांतपणे ऐकत होता.

"कसं आहे चित्र ?"

"छान सुंदर…!", अधराला तो एवढ्या जवळ असल्याने काहीच सुचत न्हवते. शब्दांनी जणू असहकार पुकारला होता…!

"अधरा…"

"हम्म…"

"छान वाटतंय ?"

"काय…"

"इथे बसायला ?"

"हम्म…"

"ना… नाही! काहीही विचारू नका…", अधराला कळालं आपण काय बोलून गेलोय!

"नेहमीच एवढी भांबावतेस की फक्त मी जवळ आल्यावर..?"

"ना…ही, मी कशाला भांबावू ? मी नाही!"

"मग आवडतंय का इथे माझ्या मांडीवर बसायला…?", त्याच्या ह्या प्रश्नावर अधराने केविलवाणे तोंड करून हळूच त्याला बघितले.

"कारण तुझ्या लक्षात आलं नसलं तरी मी कधीच तुला सोडलंय!... म्हणून विचारलं आवडतं का इथे बसायला…"

त्याचं हे बोलणं ऐकल्यावर अधराला कळालं की आपण काय मूर्खपणा केलाय आणि ती झटकन उठून आत पाळली.
मागून त्याचे हास्याचे फवारे तिच्या कानी जे पडत होते!

कौन केहता हैं, जन्नत बोहोत दूर हैं…
उनका हमे चुपकेसे देखना, क्या किसीं जन्नत सें कम हैं!

🎭 Series Post

View all