सूर तुझे लागता...-५

एका चांदणीचा तिच्या प्रकाशपर्यंतचा प्रवास...


"बापरे, आज खुपचं गडबड झालीये… ट्रेन मिळाली म्हणजे झालं!", असं म्हणत अधरा सकाळी गडबडीत घराचे लॉक लावत होती.

"हॅलो मॅडम, निघालात कॉलेजला ?", ओजस जॉगिंग वरून आला तेव्हा त्याने तिला विचारले.

"हो पण आज खूप उशीर झालाय, मला उशीर झाला उठायला… १५ मिनिटं उशिरा उठलेय मी!"

"मग आता ?"

"आता काय, निघालेय…! बोलू नंतर, बाय…"

"बरं जा!", असं म्हणून ओजस आत निघून गेला आणी अधरासुद्धा चालायला लागली.

पाच मिनिटं चालली नसली की, मागून कोणीतरी हॉर्न दिला. ती तिच्या धुंदीत असल्याने थोडी दचकली आणि चिडून मागे वळून बघायला लागली. ओजस बाईक घेऊन उभा होता.

"काय आहे, किती घाबरले मी… असं मागून हॉर्न देतात का? आणि नका ना…"

"चल सोडतो तुला, गाडीवर बस आणि ओरड हवं तेवढं! ओके?", ओजस तिचे बोलणे मधेच तोडत म्हणाला.

अधरा दोन सेकंद शांत झाली आणि गाडीवर बसली कारण, खरंच उशीर झालेला! पाच मिनिटं झाली नसतील की तिनेच बोलायला सुरुवात केली,

"आज का बरं जॉगिंगला गेलात? रोज तर मला दिसत नाही आणि रात्री उशिरा आलेलात ना?", तिने विचारलं तरीसुद्धा ओजस शांतचं होता.

"अहो बोला ना?", अधरा थोडं मोठ्याने म्हणाली.

"झालं? एवढेच प्रश्न होते का… मला वाटलं अजून आठवून विचारतेस की काय?", ओजस हसत म्हणाला आणि अधराचा चिडलेला चेहरा त्याने आरशात बघितला.

"अगं दोन दिवस खूप धावपळीत गेले म्हणून जात न्हवतो आणि मी रात्री उशिरा आलो ते खरं आहे पण, तू काय माझी वाट बघत बसलेलीस का?"

"ते… हे… म्हणजे नाही, असं का विचारताय?", अधरा हळू आवाजात म्हणली.

"कारण मॅडम रात्री तुम्ही एकट्याच अंगणात बसलेला आणि तिथेच झोप लागलेली तुम्हाला! मी तीन वाजता आलो तेव्हा बघितलं आणि पाठवलं तुला… गेटसुद्धा उघडचं होतं! कोणी आत आलं असतं तर?"

"कळालं नाही मला कशी झोप लागली ते! म्हणजे मला आठवतंय की मी अंगणात बसलेले पण त्यापुढे काही आठवत नाही. सकाळी उठले तर आतच होते मी!"

"ठिके, पुढच्या वेळी लक्षात ठेव. एकतर एकटी राहतेस!"

"ते ठीक आहे पण शेजारी एवढे डी. एस. पी. राहत असल्यावर कसली भीती!", अधरा हसत म्हणाली आणि पुढे काही वेळ फक्त अधराचं बोलत होती.

बातें कुछ अनकही सी, कुछ अनसुनी सी होने लगी…
काबू दिल पे रहा ना, हस्ती हमारी खोने लगी…
शायद यही हैं प्यार…
शायद यही हैं प्यार…

"थॅंक्यु!", अधरा गोड हसून म्हणाली आणि ओजसने तिच्याकडे बघत हसून मान डोलावली. त्याच्या तशा बघण्याने अधरा लाजून मान खाली घालुन आत निघाली.

"अधरा…"

"हां…", सगळ्यांसमोर त्याने आवाज दिल्याने अधरा थोडी भांबावून म्हणाली.

"आज पण बासुंदी…", असं म्हणून ओजस निघून गेला.

अधराने पण हळूचं मान डोलावली आणि आत निघून गेली.


मैं कभी भूलूँगा ना तुझे, चाहे तू मुझको देना भुला…
आदतें जैसी तू हे मेरी, आदतें कैसे भूलूँ भला…

सौदा ये वादों का हे, यादों इरादों का है,
लेले तू वादे चाहे, तू तो मुकर भी ले…
सौदा इशारों का है, चाहत के मारों का है,
लेले इशारे मेरी, इनका असर भी ले…

सीधे सादे सारा सौदा, सीधा सीधा होना जी…
मैंने तुमको पाना है या, तूने मेको खोना जी…
आजा दिल की करे सौदेबाज़ी क्या नाराज़ी,
आरे आरे आरे आ…..

"मस्त वास येतोय…", ओजस किचनमध्ये अधाराच्या जवळ येत म्हणला.

"हम्म!", त्याच्या जवळ येण्याने अधरा क्षणभर स्तब्ध झाली.

" गाणं छान आहे…"

"थॅंक्यु!"

"अहोssss… गरम आहे ते, भाजेल ना!"

"सॉरी!", ओजस बारीक तोंड करून म्हणाला.

"ठीक आहे…", अधराला त्याच्याकडे बघून हसायला आलं.

"मग उद्या सुट्टी ना?"

"हो…"

"मी पण थोडं लवकर येईन उद्या, आपण ती झाडं लावून घेऊ! आणि सकाळ मला झाडांना पाणी घालायला नाही जमणार तर तेवढं घाल…"

"हो…अहो फ्रीजमधून टोमॅटो काढून द्या ना!"

"अधरा ऐक ना, पुढच्या बुधवारी मी लवकर येईन. पडदे घ्यायचेत, येशील माझ्याबरोबर?", ओजस फ्रीज उघडत म्हणाला.

"हो…" असं म्हणून त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. दोघेही आता बऱ्यापैकी खुलले होते. जेवून सगळं आवरून झाल्यावर दोघे अंगणात पायरीवर बसले होते.

ओजस खालच्या पायरीवर बसलेला आणि अधरा कामं आवरून येऊन त्याच्या वरच्या पायरीवर बसली.

"अधरा एक बोलू?", ओजस वर आकाशाकडे बघत म्हणाला. रात्रीच्या नीरव शांततेत पायरीवर बसून गप्पा आणि सोबतीला नेहमीचेच… चाफा आणि रातराणी!

"बोला ना…"

"तुझ्याकडे बघितलं ना की आईची आठवण येते गं…"

त्याच्या या वाक्यावर अधराने त्याच्याकडे बघितलं तर आज त्याच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू होते!

"कशा होत्या आई?"

"अगदी तुझ्यासारखी! हसरी, बोलकी आणि न घाबरणारी… प्रसन्न चेहऱ्याची… माझ्या आयुष्यात फक्त आई होती, फक्त आई! तुझ्यासारखीच बासुंदी बनवायची तीसुद्धा… साड्या वैगेरे तर भयंकर आवडायच्या तिला… संगीताचे वर्ग घ्यायची ती… त्या दिवशी तुझा आवाज ऐकला आणि असं वाटलं आईचं गातेय!", ओजस आता तिच्या पदराच्या टोकाशी खेळत म्हणाला. आवाजसुद्धा बऱ्यापैकी खालावला होता. अधरादेखील स्तब्ध होती.

"एक विचारू?"

"हम्म…"

"तुम्ही असं का म्हणालात की फक्त आई, म्हणजे बाबा?"

"आईने मला दत्तक घेतलेलं…लग्न न्हवतं केलं तिने!", ते ऐकून अधरा एकदम शांत झाली. तिच्या विचारांची चक्र फिरू लागली.

"अहो, आईंचं नाव काय होतं?", अधराने अस्वस्थ होऊन विचारलं आणि डोळे मिटून घेतले. कदाचित उत्तर ऐकण्याची तिची तयारी न्हवती!

"धरा बल्लाळ…", आणि अधराने ते ऐकून एकदम डोळे मिटून घेतले. आनंद व्यक्त करावा की दुःख या दुविधा अवस्थेत ती होती… तिने ओजसकडे एक कटाक्ष टाकला तर, तोसुद्धा डोळे बंद करून बसलेला! त्या चेहऱ्याला ती टक लावून बघत होती.

"ओजस तुम्हाला कल्पना पण नाहीये की तुम्ही किती जवळचे आहात माझ्या… लवकरचं सांगेन मी तुम्हाला…", अधरा मनातच म्हणाली.

इस हसीन रात का भी मुझपे एक एहसान हैं,
बोहोत इंतजार के बाद मुझे मेरा चांद अदा किया हैं…

🎭 Series Post

View all