सूर तुझे लागता...-४

एका चांदणीचा तिच्या प्रकाशपर्यंतचा प्रवास...


"छान वाटतंय ना, थंडी पण आहे आज…", अधरा स्वतःभोवती साडीचा पदर गुंडाळून म्हणाली.

"हम्म, बऱ्यापैकी…"

"बसायचं थोडा वेळ इथे?"

"नको, थोडा वेळ चालूया… मग बसूया."

"बरं"

"अहो, एक विचारू…"

"हम्म…"

"मगाशी शांत झालात का एकदम?, म्हणजे तुम्हाला वाटलं तर सांगा… मी सहज विचारलं."

"आईची आठवण आली!", ओजस एकदम खालच्या आवाजात म्हणाला.

"कुठे असतात आई, आणा ना त्यांना इथे…"

"चार वर्ष झाली तिला जाऊन…"

बराच वेळ अधराचा आवाज आला नाही म्हणून, त्याने तिच्याकडे बघितलं तर अगदीच रडायला आलेली ती!

"अगं काय झालं रडायला? ए बाळा, काय झालं रडायला…"

"माझी आई पण…",असं म्हणून अधरा हुंदके देऊन रडायला लागली. ओजसने पण मग तिला जास्त विचारले नाही!

दोघेही शांत खाली बसून समुद्राकडे बघत होते. बराच वेळ गेला असेल आणि अधराचं डोकं त्याच्या खांद्यावर पडलं…

"झोपली पण… स्वीट वेडी! मला सांगते की मनात काही ठेऊ नका आणि स्वतः किती काही ठेवून आहे… आई गेल्याचं दुःख दोघांच्या ही नशिबी आहे म्हणायचं! खरंच शांत वाटतंय पण इथे… आणि सोबत हे गोड वादळ! आई तुझ्यासारखीच आहे गं ही…"

" अधरा… ए अधरा उठ बाळा! दमली आहेस ना… घरी जाऊन झोप चल…"

"उम्म…", अधराने त्याच्या दंडाला घट्ट विळखा घातला आणि झोपली.

"झोपळू…", ओजस पुटपुटला.

"अधरा उठ ना… घरी जाऊन झोप चल!"

"नाही ना… मला झोप आलीये!", अधरा झोपेतच रडकं तोंड करून म्हणाली.

"हो मग घरी जाऊन झोप ना… "

"तुम्ही खूप वाईट आहात…", अधरा चिडून उठत म्हणाली.

"माहितेय मला…"

"हुह्ह!"

"झालं?"

"का चिडवताय…", अधरा आता खरंच रडायला आली होती आता!

"बरं, बरं नाही चिडवत…"


दोघेही घराकडे निघाले. अधरा अजूनही झोपेतच होती. थंडीमुळे तिने पदर अजूनच घट्ट लपेटून घेतला. ते बघून ओजसने तिच्या खांद्यावर अलगद हात ठेवला.

"अहो…", अधरा डोळे मोठे करून म्हणाली.प

"काय?"

"हात का ठेवला…"

"तू का मगाशी खांद्यावर डोकं ठेवलंस?"

"ते… हे… मी केलं म्हणजे तुम्ही पण केलंच पाहिजे का?"

"सकाळ किती वाजता जातेस?"

"मी ना सकाळी ६.४५ ला निघते आणि मग दीड - दोनपर्यंत निघते. सकाळी आजिबात उठवत नाही मला, खूप झोप येते!", अधरा हळू आवाजात बडबडत होती.

"हम्म!"

"तुम्ही एवढ्या उशिरा का घरी येता ?"

"काम संपत नाही लवकर, एखादी अर्जंट केस आली तर मग नाही निघता येत…"

"अच्छा!"

"खूप थंडी आहे ना आज…"

"हो ना, पण छान वाटलं… आपण उद्या सुध्दा येऊ हा!"

"बघू…"

"बघू का…?", अधरा तोंड पाडून म्हणाली.

"अगं आताच सांगितलं ना तुला… एखादी केस आली तर मग नाही निघता येत लवकर!"

"ओके…"

"चला, आलं तुमचं घर!"

"हम्म, गुड नाईट…"

"अर्धी झोप झाली मॅडम तुमची…", ओजस हसत म्हणाला.

"हो, झोपा आता तुम्ही पण…"

"हो, बाय!"

"बाय…"

"स्वीट वेडी!"...


"परीकथेतिल राजकुमारा…
स्वप्‍नी माझ्या येशिल का ?
भाव दाटले मनी अनामिक,
साद तयांना देशिल का ?

या डोळ्यांचे गूढ इशारे…
शब्दांवाचुन जाणुन सारे…
‘राणी अपुली’ मला म्हणोनी,
तुझियासंगे नेशिल का ?

परीकथेतिल राजकुमारा…
स्वप्‍नी माझ्या येशिल का ?
भाव दाटले मनी अनामिक,
साद तयांना देशिल का ?

मूर्त मनोरम मनी रेखिली…
दिवसा रात्री नित्य देखिली…
त्या रूपाची साक्ष जिवाला,
प्रत्यक्षातुन देशिल का ?

परीकथेतिल राजकुमारा…
स्वप्‍नी माझ्या येशिल का ?
भाव दाटले मनी अनामिक,
साद तयांना देशिल का ?

लाजुन डोळे लवविन खाली…
नवख्या गाली येइल लाली…
फुलापरी ही तनू कांपरी,
हृदयापाशी घेशील का ?

परीकथेतिल राजकुमारा…
स्वप्‍नी माझ्या येशिल का ?
भाव दाटले मनी अनामिक,
साद तयांना देशिल का ?

लाजबावरी मिटुन पापणी…
साठवीन ते चित्र लोचनी…
नवरंगी त्या चित्रामधले,
स्वप्‍नच माझे होशील का ?

परीकथेतिल राजकुमारा…
स्वप्‍नी माझ्या येशिल का ?
भाव दाटले मनी अनामिक,
साद तयांना देशिल का ?....."

अधरा स्वतःभोवतीचं गुणगुणत आज गाणं म्हणत होती! जेवून वैगेरे आवरून बाहेर अंगणात बसलेली… सोबत चाफा होताच की! आणि आता त्याची रातराणीसुद्धा…

"खूपच उशीर झाला वाटतं आज ह्यांना, अजून घरी आले नाहीयेत… कामच तस आहे म्हणा! कालची रात्र अविस्मरणीय होती पण… अशी कशी मी अचानक त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपले! झोप कधी लागली ते पण मला माहिती नाही… त्यांनी आईचा विषय काढला आणि मग मला पण रडावस वाटलं!

ते सुद्धा किती शांत झाले काल, आई गेल्याच दुःख माझ्याएव्हढं चांगलं कोण समजणार… आम्ही दोघसुद्धा आयुष्यात त्याचं वळणावर आहोत… आई, खूप आठवण येते गं तुझी… त्यालासुद्धा येतंच असेल ना त्याच्या आईची! थोडे शांत, विक्षिप्त आहेत पण छान आहेत…

त्यांच्याशी बोलण्यात तर मी आजिबात जिंकू नाही शकत… त्यांना काय वाटलं, ते मला बोलण्यात गुंतवून मूळ मुद्दा बाजूला सारतात ते मला कळत नसावं का?... मानसशास्त्र शिकवते मी… पण आवडतं मला त्यांच्या गुंतवण्यात गुंतून जायला… काल थंडी वाजत होती म्हणून खांद्यावर हात ठेवलेला आणि उगाच मला चिडवत होते! मला जरी समजत असलं सगळं तरी त्यांच्या समोर होतो तो वेडेपणा… सर्व समजून मला काहीच उमजत नाही… बस, असं वाटतं…

आता चाफ्याला रातराणीचा सोबत हवीये!"

"अधरा ए बाळा, उठ… इथे का अशी पायरीवर झोपलीयेस? उशीर झालाय, आत जाऊन झोप चल!"

"झोपू द्या ना थोडा वेळ…"

"आत जाऊन झोप ना…"

"हम्म, तुम्ही पण झोपा. गुड नाईट!"

"हो, नीट जा… दार लावून घे…"


"बापरे, अवघड आहे ह्या मुलीचं… कशी एकटीच झोपलेली तिथे! तीन वाजत आलेत रात्रीचे… भीती वैगेरे तर काही वाटत नाही…

किती गोड दिसत होती पण… ओढणी हवेवर उडत होती, केस थोडे विसकटलेले… चेहऱ्यावर मिश्र भाव आणि हलकं हसू! काल खांद्यावर डोकं ठेवून झोपलेली तेव्हा असं वाटलं,

सुकून मिलता है जब उनसे बात होती हैं,
हजार रातों में वो एक रात होती है,
निगाह उतारकर जब देखते हैं वह मेरी तरफ,
मेरे लिए वही पल पूरी कायनात होती है।…

🎭 Series Post

View all