Mar 02, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

सूर जुळले भाग १०(अंतिम)

Read Later
सूर जुळले भाग १०(अंतिम)

सूर जुळले भाग १०(अंतिम)


"मानव, तुम्ही नॉनव्हेज खाता ना?" मानसीच्या आईने मानवला विचारले.


"मी नॉनव्हेज खातो, पण मी डिनरसाठी बाहेर जाणार आहे. मी ज्या एक्सिबिशन साठी इथे आलो होतो, त्यांनी डिनर ठेवला आहे. बऱ्याच मोठया लोकांशी भेट होते." मानवने सांगितले.


"असं आहे का? आम्हाला वाटलं होतं की, आज तुमचं आदरातिथ्य करायला मिळणार." मानसीचे पप्पा म्हणाले.


"मी मानसीला सोबत घेऊन जाऊ का? काही लोकांसोबत मानसीची ओळख करुन देतो, तेवढीच पुढे जाऊन तिला नोकरी मिळायला सोपं जाईल." मानवने विचारले.


"हो, चालेल ना. तुम्ही तिला सोबत घेऊन जा." मानसीच्या पप्पांनी सांगितले.


मानसी मानवकडे आश्चर्याने बघत होती.


काही वेळातच मानसी व मानव तयार होऊन घराबाहेर पडले.


"आता न नाटक करता हे सगळं काय होतं, सांगशील का?" मानसीने गाडीत बसल्यावर विचारले.


"यावर मानव म्हणाला,

"हे बघ, मला तुझी खूप आठवण येत होती. सकाळी उठल्यावर काही करुन तुला भेटायला यायचंच, हे ठरवलं होतं. विचार करुन प्लॅन केला, त्यात नशिबाने साथ दिली.


नाशिकमध्ये आल्यावर प्रिया वहिनींच्या वडिलांना फोन केला, तर ते नाशिक बाहेर गेल्याचे कळले. त्यांनी तुझ्या पप्पांना फोन केला आणि माझं काम अजूनच सोपं झालं. त्यात तुझा मॅसेज आला. आपली टेलीपथी बरोबर जुळली. घरी आपल्याला बोलता आलं नसतं, म्हणून तुला बाहेर घेऊन येण्याचा विचार केला. 


प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. थोडं खोटं बोललं तरी काही बिघडत नाही."


"मानव, तू इतका भारी आहे ना, म्हणून तर मी तुझ्यावर इतकं प्रेम करतेय." मानसी म्हणाली.


"एवढ्या लांब तुला भेटायला आलो आहे, तर मला एक कीस मिळायलाच हवं." मानव म्हणाला.


"आता सगळं काही लग्नानंतर." मानसीने सांगितले.


"घरी गेल्यावर तुझ्या आई-वडिलांकडे तुझा हातचं मागतो." मानव म्हणाला.


"मानव, इतकी घाई करु नकोस." मानसी म्हणाली.


"माझा नेमका महत्त्वाचा प्रोजेक्ट सुरु आहे, त्यात लग्नाचा विषय काढणे मला परवडणार नाही. घरच्यांना समजून सांगायचं म्हटल्यावर मोकळा वेळ आणि एनर्जी लागेल. अजून एक-दोन आठवडे थांबू, मग सांगू." मानव म्हणाला.


मानव व मानसीने जेवण करता करता बऱ्याच गप्पा मारल्या. मानसी मानवला तिची आवडती देवांग कुल्फी खाण्यास घेऊन गेली. काही वेळाने मानसी व मानव घरी गेले. मानसीच्या पप्पांसोबत इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या.


दुसऱ्या दिवशी सकाळी मानव निघून गेला. दुपारच्या वेळी जेवण झाल्यावर मानसीचे पप्पा म्हणाले,

"मनू, मला तुझ्यासोबत जरा महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे."


"हं, बोला ना." मानसी म्हणाली.


"मनू, आता तुझं शिक्षण संपल आहे. तू कॉलेज पूर्ण होईपर्यंत लग्नाचं नाव घेऊ नका, असं म्हणाली होतीस. मी तुझं ऐकलं. आता आपण लग्नाचा विषय घ्यायला काही हरकत नाही.


तुला मानव कसा वाटला?" मानसीच्या पप्पांनी डायरेक्ट विचारले.


"पप्पा, मला तुमच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही." मानसी कळून न कळल्यासारखी म्हणाली.


"काल मानवसोबत माझ्या बऱ्याच गप्पा झाल्या. मुलगा चांगला वाटला. त्याच्या घरचेही चांगले आहेत. ओळखीतील स्थळ असल्याने काही अडचण येणार नाही. मलातरी मानव आवडला आहे. तुझा होकार असल्यास मी लगेच दादा व अजय रावांसोबत बोलून घेतो." मानसीचे पप्पा म्हणाले.


"पप्पा, तुम्हाला जर तो माझ्यासाठी योग्य वाटत असेल, तर माझी काहीच हरकत नाहीये." मानसी बोलून तिच्या रुममध्ये निघून गेली.


मानसीच्या पप्पांनी त्यांच्या भावाला फोन केला, त्यांनी अजय व प्रियाला सांगितले. अजय मानव व त्याच्या आई- वडिलांसोबत बोलला.


सगळ्यांनाच मानव व मानसीचे लग्न व्हावे असे वाटत होते. मानव आणि मानवचे आई-वडील नाशिकला मानसीला बघण्यासाठी आले व लग्न फायनल केलं.


मानसीचा निकाल लागण्याआधी मानसी व मानवचे लग्न सगळ्यांच्या संमतीने पार पडले. 


"मनू, इच्छा असली की आपोआप मार्ग निघतात. आपण उगीच जास्त टेन्शन घेत बसलो होतो. आपल्याला काही करावंच लागलं नाही. सगळं काही आपल्या घरच्यांनी केलं आणि आपलं लग्न झालंही." मानव म्हणाला.


"मलातर हे सगळं स्वप्नात घडल्यासारखं वाटत आहे." मानसी म्हणाली.


"आता तुला हे स्वप्न वाटणार नाही." बोलत मानवने तिच्या ओठांवर आपले ओठ अलगद टेकवले. मानव व मानसी कायमचे एकमेकांमध्ये हरवून गेले.


भेट झाली,

प्रेमात पडले,

मनी वसले,

सूर जुळले.


समाप्त.


©®Dr Supriya Dighe
 ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//