मला हे जमणार नाही , मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही .
काय म्हणतो आहेस तु , कळतंय का तुला ? माझी अवस्था नाजुक आहे सुशांत !
मग मी काय करु ? तु देखील तयार होती ना ! मी काही एकटाच जबाबदार नाही !
हो , पण मी आधीच सांगितले होते ना , कि आपण आधी लग्न करू या , आणि मग ......
असं काय करतेस माझी राणी , अगं अजुन किती मोठं आयुष्य पडलं आहे आपल्या समोर .... मजा , मस्ती , हौस,मौज ........ उद्या आपण एका ओळखीच्या डॉक्टरांकडुन अॅबाशन करून घेऊ या ......म्हणजे तुही मोकळी आणि मी देखील ....
सुशांत , तु काय बोलतोय , असं , काय करतो .
माझा नाही तर निदान आपल्या बाळाचा तरी विचार कर ..... आपलं बाळ ,
ये तो सब चलता है , मेरी जान ...... फिक्र मत करो ........खांदे उडवुन त्याने हसुन ती गोष्ट टाळून दिली .
अरे , निदान दोघांच्याही घरी तरी सांगु यात आणि नंतर लग्न करु या .
कसलं काय ? तो तिला चिडुन बोलु लागला . तिने त्याच्या समोर हात जोडून विनंती केली ..... परंतु , त्याला पाझर फुटला नाही ......
रडुन रडुन तिच्या डोळ्यांतील पाणी सुध्दा आटले . पण , काय करणार .......
सुशांतने समताला दिलेले वचन , 'सब झुठ निकले "
असे म्हणुन , उद्या डॉक्टरांकडे जायचे असेल तरच मला फोन कर .... नाहीतर तुझा रस्ता वेगळा आणि माझा रस्ता वेगळा ......
अगं , कुठे आतापासुन हे लचांड गळ्यात अटकवते ..... आणि जन्म जरी दिला तरी बापाचं नाव काय लावशील ? त्यापेक्षा .....
समताने तो काही बोलायच्या आतच त्याच्या कानशिलात भडकावली .........
मी सक्षम आहे , बाळाला जन्म देण्यासाठी आणि पालनपोषण करण्यासाठी , एका स्त्रीला तु कमजोर समजु नकोस ...... तुझ्यासारख्या बापाच्या नावाची मला गरजच नाही .....
जा , परत मला तुझे असे ना मर्दाचे तोंड दाखवु नकोस .
इथुनच तिचा एकटीने जगण्याचा आणि लढण्याचा प्रवास सुरू झाला . एका नवीन संघर्षासह मुकाबला करण्यासाठी ती तयार झाली ......
कारण , समोर आई वडीलांचा क्रोधमय चेहरा , दादाचे मारणे , अपमानाचा डोंगर , अगतिकता , समाजाचे बोल , नातेवाईक आणखी काय काय ?
जगावं कि मरावं असं तिला होऊन गेलं .... तिचं मन आता वेगळाच विचार करू लागले ..... आत्महत्या करायची तर आपल्या पोटातील बाळाचा काय दोष ? आपल्या चुकीची शिक्षा त्या जगही न पाहिलेल्या बाळाला का ? तिने बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला .
घरच्यांनीही या तिच्या निर्णयाचे स्वागत केले . साथ दिली . समाज , आजुबाजुचे लोक काय म्हणतील याचा विचार न करता......
बघता बघता समताने एका गोंडस बाळाला जन्म दिला ..... आणि काही काळ का होईना घरात आनंदाचे वातावरण झाले .....
परंतु , बाळाच्या आणि समताच्या उज्जवल भविष्याचा विचार करून तिच्या आई वडिलांनी तिचे लग्न करण्याचा विचार केला .
समता म्हणाली , आई मला आता लग्नच करायचे नाही .....तुम्हाला मी जड झाली का ? मी सक्षम आहे .......या बाळाचा सांभाळ करण्यासाठी ..... मी काहीतरी करते ...... नोकरी करेन ....किंवा वेळ आलीच तर चार घरची धुणीभांडी करून माझ्या बाळाचा सांभाळ करेल .....
अगं , समता असं काय करते ? आम्ही आहे तोवर तुझे हाल आणि तुझ्या बाळाचे हाल होऊ देणार नाही .
बाबांनी तिच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवला .
त्यापेक्षा लग्न कर आणि सुखी हो .... आम्ही तुझ्यासाठी एक चांगले स्थळ आणले आहे .
अगं , आई तो का माझ्याशी लग्न करेल ? तेही मी एका बाळाची आई आहे ...हे माहित असतांनाही .....
अगं , तु फक्त हो म्हण , बाकी आम्ही बघतो ....बाबा म्हणाले .... खुप विचार करून तिने हो म्हटले ....
समता थोडी नाराजीनेच लग्न करण्यास तयार झाली . आई वडीलांना कोणतेही टेन्शन नको म्हणून ती काहीच बोलत नव्हती . मनात दुःख असुनही ती चेहऱ्यावर मात्र आनंदाचा भास निर्माण करायची . मोठ्या कष्टाने तिच्या घरच्यांनी तिचे हे लग्न जमवले होते .
समताची आई शालिनी पण या लग्नासाठी तयार नव्हती . पण , परिस्थितीने त्यांच्या समोर कसलेच पर्याय ठेवले नव्हते .
तिचे लग्न राजेश सोबत ठरले ......लग्न तर झाले ......परंतु , खरी कसरत तर आता सुरु झाली .
तिला वाटले आता तरी माझ्या जीवनात आनंद निर्माण होईल , मला आणि माझ्या बाळाला नवीन आयुष्य मिळाले , आमचे जीवन सुखी झाले .....
पण , तिच्या नशिबात वेगळेच काहितरी होते .....झाले ही तसेच ....,
समताच्या मनात मात्र काहीतरी सलत होते ...... शंकेची पाल मनात चुकचुकत होती ....... आणि ती शंका ......खरी ठरली........
पहिल्याच रात्री त्याचे , वागणे , बोलणे तिला खटकु लागले .....अगदी लहान मुलाप्रमाणे ......तिला धसका बसला ...... आपल्याला हा सांभाळणार किंवा आपण याला ? आता आपल्या मुलाचे काय ?
आपल्यासोबत विश्र्वासघात झाला , यासाठी तिने तिच्या कुटुंबीयांना सांगितले असता , सासुबाई आणि सासऱ्यांनी तिच्या समोर हात जोडले आणि प्रामाणिकपणे सर्व काही सांगितले .......
आमच्या नंतर आमच्या मुलाची काळजी तु चांगल्याप्रकारे घेऊ शकते , म्हणुन आम्ही......हि गोष्ट कळु दिली नाही ...
समता आज अशा वाटेवर उभी होती कि तेथुन मागे वळून पाहिले तर समोर फक्त अंधार होता ......
भुतकाळ आठवला तर अंगावर काटा आणि भविष्यकाळात डोळ्यासमोर काळोख दिसत होता ....
तिने निश्चय केला की आपण हे दिव्य पार करु आणि खरोखरच ती एक जबाबदार , स्त्री , पत्नी , आई आणि सुन म्हणुन सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यास सक्षम झाली . एका कुटुंबाचा आधार स्तंभ बनली . तिने नवीन संसाराची आणि नवऱ्याची योग्य प्रकारे काळजी घेणे सुरू केले ..... ती स्वत: खंबीरपणे स्वत:च्या संसारासाठी लढु लागली .
काही महिन्यातच तिने राजेशला त्याच्या अल्लड भुमिकेतुन बाहेर आणले.