नवी पहाट... बोनस भाग

स्वरा आणि तेजू आज देखील जिवाभावाच्या मैत्रिणी आहेत. दोघींचे नवरे दखील त्यांच्या मैत्रीला सलाम करतात.


नवी पहाट (बोनस भाग)


नंदिनी चे लग्नं ठरताना खूप गमती झाल्या. भाषेची अडचण असल्यामुळे एक मेकाना समजून सांगण्यात सगळ्यांचा कस लागत होता.


तसे ते लोक मराठीच पण पिढ्यान् पिढ्या बँगलोर ला राहिल्यामुळे तेथीलच निवासी झाले आणि भाषा दाखील तिचं. पण मूळ मराठी असल्यामुळे जुनी मराठी जरा त्यांना येत होती. आणि त्यातूनच संवाद साधला जात होता.


लग्नं ठरवण्यासाठी दीपकराव, नीरजा, समर परत बँगलोरला गेले होते. तेव्हा यश कुमार च्या आई ने त्यांच्या तोडक्या मोडक्या मराठीत दीपक रावांना प्रश्न केला.


"मंग किती तोला सोना देणार?"


असं म्हंटल्यावर दीपकराव, नीरजा आणि समर च्या पायाखालची जमीन सरकली. कारण दक्षिण भारतात खूप सोनं देतात लग्नात. त्यांनी त्यांच्या मुलीच्या म्हणजे यश कुमार च्या बहिणीच्या लग्नात साठ तोळे सोने दिले होते हे दीपकरावांना त्यांनीच सांगितले होते.


त्यांच्या प्रश्नावर सगळे एकमेकांकडे बघत राहिले. झालेली गंमत यश कुमारच्या लगेच लक्षात आली.


"Sir. Don\"t worry. She means what you will give to your daughter."

असं ऐकून सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. आता ह्या गोष्टी आठवल्या की सगळे खूप हसतात. दुर्दैवाने करोणा च्या काळात यश कुमारच्या आईंचे निधन झाले. पण त्यांच्या आठवणी मनात आहेत.


सगळ्या योगाच्या गोष्टी असतात. नंदिनीने स्वरा आणि राजशी केलेली डील पण योगानेच पूर्ण झाली. नंदिनी एकाची दोन झाली तर, स्वरा आणि राज दोनाचे तीन झालेत. म्हणजे नंदिनीच्या लग्नाच्या वेळेस स्वराने नुकतीच गोड बातमी दिली होती. खरंच योगच असतात हे.
जशी स्वरा आणि राज शी नंदिनी ची डील होती तशीच यश कुमार ची त्याच्या बहिणीशी आणि जिजाजिंशी डील होती. तिकडे यश कुमार च्या बहिणीने गोड बातमी दिली आणि लग्न ठरले तर इकडे लग्नं ठरल्यावर स्वराने गोड बातमी दिली.


स्वरा आणि तेजू आज देखील जिवाभावाच्या मैत्रिणी आहेत. दोघींचे नवरे दखील त्यांच्या मैत्रीला सलाम करतात.


नंदिनीचे लग्नज्या मुळे ठरले म्हणजे ज्या व्यक्तीने यशकुमारची अचूक माहिती अमेरिकेत बसून काढून दिली तो स्वराचा मित्र, स्वराच्या मुलाला बघण्यासाठी स्वराच्या घरी गेला होता. दीपकराव आणि नीरजाने त्याचे खूप आभार मानले. खूप आग्रह करून देखील दुसऱ्यादिवशी ऑफिस असल्यामुळे थांबला नाही. परत येईल म्हणून निघून गेला पण ती त्याची शेवटची भेट ठरली. नेहमी हसत मुख असणारा संदीप आज ह्या जगात नाही. स्वरा ला भटक्यावर एका महिन्याने हृदयविकाराच्या झटक्याने त्याचे अकाली निधन झाले. पण त्याचे उपकार स्वरा, नंदिनी, दीपकराव, नीरजा समर कधीच विसरू शकणार नाहीत. आज ह्या कथेतून त्याला देखील भावपूर्ण श्रद्धांजली.


समाप्त
© वर्षाराज

🎭 Series Post

View all